Saturday, December 10, 2016
Tuesday, December 6, 2016
Thursday, November 24, 2016
Wednesday, November 16, 2016
Thursday, October 27, 2016
अनेकांच्या प्रतिक्षेत असणारे आणि संपूर्ण जगभर वाचले जाणारे सा. व्यक्तिमत्व विकास दिपावली अंक 2016 वाचकांसाठी उपलब्ध झाला आहे.
सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
संपादक - श्री. मंगेश विठठल कोळी.
आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवावे ही विनंती.
Sunday, October 16, 2016
Friday, October 14, 2016
*वाचक बनविणारे व्यक्तीमत्व - डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम*
"वाट पाहत राहणाऱ्याला नेहमी तेवढेच मिळते जेवढे प्रयत्न करणारा मागे सोडून देतो, तुम्हाला यशस्वी होण्यासाठी तुमच्या ध्येयाला एकनिष्ठ होणे गरजेचे आहे" असे म्हणणारे आणि संपूर्ण जगातील युवकांचे स्फुर्ती स्थान असणारे डॉ. अबुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम (डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम) यांचा जन्म दिवस. त्यांच्या जयंती निमित्त आज १५ ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण देशभर "वाचन प्रेरणा दिन" म्हणून साजरा केला जात आहे. मराठीमध्ये एक म्हण आहे "वाचाल तर वाचाल" याचा शब्दशः अर्थ घ्यायचा झाला तर ज्या व्यक्ती वाचन करतात त्यामुळे प्रगल्भ ज्ञान त्यांना मिळते आणि जे यश मिळते ते कशा पद्धतीने मिळाले आहे हे समजून घेता येते. डॉ. कलाम आपल्या भाषणांमध्ये एक गोष्ट नेहमी सांगत असत की, नेहमी यशस्वी व्यक्तींचे आत्मचरित्र किंवा लेख, भाषणे ऐकण्या-वाचण्यापेक्षा अपयशी व्यक्तींचे जीवनचरित्र किंवा त्यांना आलेला अनुभव यांचे वाचन किंवा भाषणे ऐकली पाहिजेत म्हणजे त्यांच्या हातून ज्या काही चुका झाल्या त्या तुमच्या हातून घडू नये आणि यशस्वी होण्यास मदत होते.
डॉ. कलाम यांना लहानपणापासूनच वाचनाची आवड होती. त्यांचे वडील रामेश्वतरला येणार्यान यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला ने-आण करण्याचा व्यवसाय करीत होते. डॉ. कलाम यांचे प्राथमिक शिक्षण रामनाथपुरमला झाले. प्राथमिक शिक्षण घेत असतानाच अचानक वडिलांचे निधन झाले. घरातील कर्त्या पुरूषाचे छत्र गमावल्याने त्यांना शिक्षण घेताना आर्थिक अडचणी येऊ लागल्या. गावात वर्तमानपत्रे विकून किंवा शाळा शिकत गावातील लहान-मोठी कामे करून पैसे कमविल होते. शाळेत असल्यापासूनच त्यांना गणित आणि विज्ञान या दोन्ही विषयाची आवड निर्माण झाली. नंतर ते पदवीच्या शिक्षणासाठी तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये गेले. बी.एस्सी. पदवी घेतल्यानंतर त्यांनी ‘मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’मध्ये प्रवेश घेतला. या प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. त्यांच्या बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून पैसे दिले. एवढ्या कठिण परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांची वाचनाची जी जिद्द होती ती कायम तेवत ठेवली. अनेक पुस्तके त्यांनी वाचली आणि स्वतःच्या जीवनामध्ये बदल घडवून आणले. डॉ. कलाम नेहमी सांघिक कार्याला पाठबळ देत. ते नेहमी शाळेत शिकत असताना लहानपणी जेव्हा शाळेमध्ये पाढे पाठ करित असताना समुहाने आणि मोठ्या आवाजात एका सुरात म्हटल्यामुळे लवकर पाठ होत होते आणि दिर्घकाळ लक्षातही राहत होते.
बालपण अथक परिश्रमांत व्यथित करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या राष्ट्राच्या राष्ट्रपती पदी निवड झालेले डॉ. कलाम हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व. आपल्या आगळ्या वेगळ्या कार्यपध्दतीमुळे ते ‘सामान्यांचे राष्ट्रपती’ म्हणून लोकप्रिय झाले. भारत सरकारने त्यांना ‘पद्भूषण’, पद्मविभूषण आणि 1998 साली ‘भारतरत्न’ हा देशामधील सर्वोच्च किताब देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. पुढील वीस वर्षात होणार्यार विकसित भारताचे स्वप्न त्यांनी पाहिले. विज्ञानाचा परमभोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील होते. "साधी राहणी आणि उच्च विचारसरणी" अशा पध्दतीचे व्यक्तिमत्व. वाचनाबरोबर रुद्रविणा वाजविण्याचा आणि मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. डॉ. कलाम हे नेहमी विद्यार्थी वर्गाला उत्तमोत्तम मार्गदर्शन करण्याचे काम करत होते. त्यांनी स्वतः सिध्द करीत असताना काही महत्त्वाची वाक्ये आत्मसात करून घेतली. त्यामुळे एवढे मोठे यश संपादन करु शकले. मेहनत, सातत्य आणि इच्छाशक्तीच्या जोरावर आदर्श शिखरापर्यंत जाऊन पोहचले आहेत.
डॉ. कलाम आपल्या भाषणामध्ये तरूणांना प्रोत्साहित करीत असताना काही वाक्ये नेहमी सांगत होते की, तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वप्रथम स्वप्न पाहिले पाहिले.
1) स्वप्न असे नसायला पाहिजे की जे झोपेत पाहता येऊ शकते. स्वप्न असे असायला हवे की तुमची झोप उडून जाईल.
2) नेहमी स्वतःमधील, समाजामधील किंवा देशातील चांगले गुण स्वीकारले पाहिजे.
3) कोणत्याही व्यक्तिला यशस्वी होण्यासाठी कठीण गोष्टींचा सामना करावा लागतो. त्यानंतर मिळणारे यश खऱ्या अर्थाने आनंद देऊन जाते.
4) नेहमी आकाशाकडे पहावे म्हणजे तुम्ही एकटे नाही आहात संपूर्ण ब्रम्हांड तुमच्यासाठी अनुकूल आहे, जो स्वप्न पाहतो व मेहनत करतो तो नेहमी यशस्वी होतो.
5) तुम्ही नेहमी स्वतंत्र रहायला हवे. नाही तर तुम्हाला कोणीही आदर देणार नाही.
6) तुम्हाला जर भ्रष्टाचार मुक्त आणि सुंदर देश घडवायचा असेल तर नेहमी लक्षात ठेवा हे कार्य फक्त तीन व्यक्तीच करू शकतात आणि त्या म्हणजे वडील, आई आणि गुरू.
7) एक चांगले पुस्तक हजार मित्रांच्या बरोबरीचे असेल पण एक चांगला मित्र एका ग्रंथालयाएवढा मोठा असतो.
8) जीवनात कठीण प्रसंग आपल्याला बर्बाद करण्यासाठी येत नाही तर आपल्यामधील दडलेले सामर्थ्य आणि शक्ती बाहेर काढण्यासाठी येतात.
9) कठीण प्रसंगाला असे सांगा की तुम्ही त्याच्यापेक्षा कठिण आहात.
10) तुमचा आत्मविश्वाास वाढेल आणि कसल्याही प्रकारचे संकट आले तरी त्यातून मार्ग काढू शकाल.
प्रत्येकाला यशस्वी बनविण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना वीनम्र अभीवादन...
मंगेश विठ्ठल कोळी. शिरोळ
९०२८७१३८२०.
Sunday, October 9, 2016
Tuesday, October 4, 2016
Monday, October 3, 2016
Tuesday, September 27, 2016
स्वाभिमान आणि आत्मविश्वास
आजच्या तरूण पिढीला काहीही समजत नाही असे वाक्य आज सकाळी माझ्या कानावर पडले. तेव्हा मला असे लक्षात आले की, अनेक कामे उत्तम, सोप्या आणि वक्तशिरपणे करण्याच्या धडपडीमध्ये सर्वात पुढे तर हिच तरूण पिढीच आहे. चांगले लोक आणि चांगले विचार तुमच्या बरोबर असतील तर जगात कोणीही तुमचा पराभव करू शकत नाही. हे आजच्या तरूणांनी ओळखले आहे त्याच बरोबर त्यांच्याकडे असणारा स्वाभिमान आणि आत्मविश्वास याच्या जोरावर अनेक स्वप्न साकार करण्यासाठी मेहनतीच्या रुपात किंमत मोजण्याची तयारी ही आजची तरूण पिढीकडे आहे. त्यामुळे ते करत असलेले काम कोणालाही सांगू न देता ते केलं जावू शकते. आजच्या युगात केले होऊ शकत नाही असा काही प्रकारचं उपलब्ध नाही. जर तुमचा विश्वास देवावर असेल तर जे नशीबात लिहिलय ते नक्किच मिळणार परंतु जर विश्वास स्वत:वर असेल तर देव सुध्दा तेच देतो जे तुम्हाला हवं आहे.
किती माणसं आपलं आयुष्य या गैरसमजूतीमध्ये व्यतीत करतात की, त्यांना फसवल जाऊ शकतं. परंतु माणसाला स्वत:शिवाय दुसऱ्या कोणाकडून फसवलं जाणं अशक्य आहे. जस एखादी गोष्ट एकाच वेळेस असावी की नसावी हे सुध्दा आपल्याला ठरविता आले पाहिजे. आत्मविश्वास बाळगणारी व्यक्ती नेहमी स्वत:च्या मेहनतीने यशाचे शिखर गाठण्यासाठी निर्विवाद योग्यता माणसाजवळ आहे यापेक्षा दुसरी प्रेरणादायी गोष्ट काही असू शकते का. आत्मविश्वास असणारी व्यक्तीची चिकाटीची जागा जगात कुठलीच गोष्ट घेऊ शकत नाही. कुठलीच प्रतिभा, कुठलीच बुध्दीमत्ता, कुठलीच विव्दत्ता, काहीच नाही चिकाटीसमोर कोणीच उभा राहू शकत नाही. स्वाभिमानी व्यक्ती धाडस किंवा हिंम्मतीने कार्य करते, भीती हा गुण माणसाच्या अस्तित्वासाठी अनिवार्य आहे. फक्त भीतीवर नियंत्रण ठेवून भीती वाटत असतानाही जे कृती करतात त्यांनाच जग धाडसी म्हणून ओळखते हे लक्षात ठेवा.
आत्मविश्वासू व्यक्ती कोणत्याही गोष्टीला किंवा घटनेला महत्व, किंमत तेवढीच देतो जेवढी प्राप्त होते. एखाद्या घटनेचा कसा अर्थ लावता, त्यावर तुमची प्रतिक्रिया अवलंबून असते. स्वत:चा बघण्याचा दृष्टिकोन निवडल्या नंतर एखाद्या घटनेचा परिणाम काय व्हावा हे घटना ठरवत नाही तर स्वत: ठरवतो. माणसाला जिंकायचे असेल तर केवळ आपुलकीने कारण वेळ, पैसा, सत्ता आणि शरीर एखादे वेळेस साथ देणार नाही, पण माणुसकी, प्रेमळ स्वभाव, स्वाभिमानी आणि आत्मविश्वास कधीही तुम्हाला एकटे पडू देणार नाही. जो पर्यंत तुम्ही पाऊल उचलणार नाही तो पर्यंत तुम्ही त्याच जागेवर राहाल आणि जितक्या लवकर कामाला लागाल तितक्या लवकर तुम्ही यशोशिखरापर्यंत पोहचाल असा निश्चय करुन घ्या. जे करायचंच आहे ते लगेच करायचं आहे, जोपर्यंत तुम्ही काही करणार नाही तो पर्यंत तुमची स्थिती सुधारणार नाही.
काहीच नसण्यापेक्षा काही तरी असणं, हे केव्हा हि चांगल असतं. अपयश येईल या भीतीने मुर्ख माणूस कामाचा आरंभच करीत नाही. एखाद्या कामात थोडासा अडथळा निर्माण झाला की, सामान्य माणूस निराशेपोटी ते काम अर्धवट सोडून देतो. परंतु आत्मविश्वास व्यक्ती मात्र कितीही संकटे आली, अपयश मिळाले तरी यश मिळेपर्यंत थांबत नाही. आयुष्यात ख्ूप माणसे भेटतात, वाऱ्याच्या झुळका प्रमाणे येतात आणि जातात. तुम्ही जेव्हा कोणासाठी काही चांगल करत असता, तेव्हा तुमच्यासाठी सुध्दा कोठेतरी काही चांगल घडत असतं इतकच की ते तुम्हाला लगेच दिसत नसतं. आत्मविश्वास असलेल्या मनुष्यासोबत काम करण्यात आनंद वाटतो कारण तो नेहमी इतरांशी मिळून मिसळून वागतो. आत्मविश्वास कमी असणाऱ्या व्यक्तींना थोड्या प्रेरणेची, प्रोत्साहनाची आवश्यकता असते. त्यांच्यामधील शक्तीची त्यांना कोणी जाणीव करुन देताच ती सुप्त शक्ती तात्काळ प्रकट होते आणि ते विस्मयकारक कार्य पार पाडू शकतात.
नवीन आव्हाने आणि जबाबदाऱ्या स्वीकारण्यास अजिबात घाबरु नका, मला शक्य होणार नाही असे कधीच म्हणू नका. चालून येत असलेल्या संधीचे व्दार स्वत:च्या हातांनीच बंद करू नका, इतरांना जमू शकत असेल तर मला का जमणार नाही नक्कीच जमेल असा आत्मविश्वास अंगी बाळगा. एखादी गोष्ट आपण करु शकतो हा विश्वास निर्माण करण्याचा खात्रीचा मार्ग म्हणजे एकदा ती गोष्ट करुन पाहणे होय. एकदा काही करण्यात यशस्वी झालो की, पुन्हा यशस्वी होऊ शकतो हा विश्वास आपोआप पाढीस लागतो. वाट पाहू नका सुरवात करा, सुरवात करण्यासाठी तुम्हाला अगदी हवी तशी वेळ कधीच येणार नाही. जिथे तुम्ही आहात तिथून जी साधने तुमच्याकडे आहेत त्यांना घेऊन सुरवात करा आणि तिही आत्ताच. वेळ ही जीवनात कधीच परत येत नाही हे लक्षात ठेवा आणि कोणतेही कार्य करत असताना ते स्वाभिमानाने आणि आत्मविश्वासाने करा.
Subscribe to:
Posts (Atom)