Sunday, December 30, 2018

नवे वर्ष, नवा ध्यास...


नवे वर्ष, नवा ध्यास...
पाहता पाहता 2023 वर्ष संपले. सर्वांचे लक्ष नवीन वर्षाच्या स्वागताकडे लागले होते. परंतु अनेकांचे आयुष्य 2023 या वर्षातील चांगले-वाईट प्रसंग, घटना किंवा अविस्मरणीय क्षण कायमचे लक्षात राहतील अशाही गोष्टीनी भरलेले आहे. सोशल मिडीयावर तर गेली कित्येक दिवस नवीन वर्षाच्या शुभेछ्या देणारे मेसेज फिरत आहेत. सोशल मिडीयामध्ये यंदाच्या वर्षी व्हॉटस अॅपने वेगळीच उंची गाठली आहे. आपण एखादा सुंदर मेसेज तयार करावा आणि त्याच्या खाली स्वत:चे नाव टाईप करून तो सर्वाना पाठवावा. थोड्या वेळातच आपले नाव बाजूला करून त्या खाली भलत्याच व्यक्तीचे नाव टाईप करून तोच मेसेज पुन्हा आपल्यालाच परत पाठवला जातो. असे अनेक किस्से सर्वत्र पहावयास मिळत आहेत.
आपल्यापैकी अनेक व्यक्तींनी नवीन वर्षामध्ये कोणता नवा संकल्प करायचा याची चाचपणी करून देखील झाली आहे. काही मंडळी घरातील नवीन दिनदर्शिका खरेदी करीत असतील तर काही मंडळी नवीन वर्षातील नवीन लेखाजोखा लिहून ठेवण्यासाठी नवी कोरी डायरी घेण्यात व्यस्त असतील. याच काळात आपल्या लक्षात येते की, बरेच नवे संकल्प करण्यास सुरुवात होते. परंतु त्या संकल्पांचे पुढच्या वर्षामध्ये कितपत यशस्वीपणे पार पाडले जातात. अशी उदाहरणे मात्र हाताच्या बोटावर मोजण्या इतपत समाजात पहावयास मिळतात.
नवीन वर्ष आले की, सरत्या वर्षाला निरोप देण्याची धावपळ सुरु होते. नवीन वर्षाचे स्वागत कशा पद्धतीने करायचे त्याच बरोबर या वर्षात काही गोष्टी करायच्या राहून गेल्या आहेत का? याची जणू एक उजळणीच सुरु असते. त्याच बरोबर हे वर्ष किती लवकर संपले कळलेच नाही? असे प्रश्नार्थक वाक्य बऱ्याच व्यक्तीच्या तोंडून बाहेर पडताना दिसते.
2023 सालीसुद्धा ३६५ दिवस आणि प्रत्येक दिवसामध्ये सुद्धा २४ तास होते. प्रत्येक तासामध्ये ६० मिनिटे होती आणि प्रत्येक मिनिटामध्ये ६० सेकंद होते, हे कोणी लक्षात ठेवत नाही. समोर उभा असलेल्या नवीन वर्षातसुद्धा आपणाला तेवढाच वेळ, दिवस, तास, मिनिटे आणि सेकंद मिळणार आहेत. परंतु नवीन वर्ष म्हटले की, उस्तुकता कशामुळे निर्माण होते. त्याची नक्की काय कारणे वेगवेगळी असतील? याची नोंद केली, तर लक्षात येईल की, हार ने का डर और जितने की उम्मीद यामधील जी तणावाची वेळ ही मानवाच्या आयुष्याला कलाटणी देणारी असते. तसाच काही काळ हा येणाऱ्या नवीन वर्षात आणि सरत्या वर्षात राहिलेल्या काही तासामध्ये असतो. जो व्यक्ती स्वत:च्या मनाचा विचार करून निर्णय घेतो, तोच खऱ्या अर्थाने आयुष्यात यशस्वी होतो.
2024 सालामध्ये सर्वांनी एक संकल्प जरूर करावा आणि त्यासाठी वाटेल ती मेहनत घेण्याची तयारी प्रत्येकाने ठेवली पाहिजे. रात्री झोपताना नेहमी उद्याच्या दिवसाचे नियोजन करा. कारण दररोज केलेली थोडीथोडी प्रगती ही माणसाला यशाच्या अति उच्च शिखरावर घेऊन जाणारी असते. एखादे शिखर गाठायचे असेल तर काही पावले उचलावी लागतील. एखादे दूरचे अंतर पार करायचे असेल तर आतापासूनच चालणे सुरु करायला हवे. प्रत्येक दिवस हा आपल्याला एक चांगला आणि एक वाईट अनुभव देत असतो. “चांगल्या अनुभवातून ऊर्जा घेऊन, वाईट अनुभवाची सोबतीने प्रत्येक संकटावर मात करायची असते.” अशी दुर्गम इच्छा शक्ती उराशी बाळगून येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत केले पाहिजे. हे नवीन वर्ष आपणास सुख, समृद्धी, आनंदायी, आरोग्यसंपन्न व भरभराटीचे जावो. तसेच आपणास जे जे हवे ते ते सर्वकाही मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. हे नवीन वर्ष आपल्यातील सर्व सुप्त गुण आणि कौशल्य आजमावण्यासाठी आहे हे नेहमी लक्षात ठेवा. आपणास व आपल्या संपूर्ण परिवारास माझ्याकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेछ्या....

-       मंगेश विठ्ठल कोळी.
-       मो. ९०२८७१३८२०

Tuesday, December 25, 2018

पश्चातापपासून दूर राहण्यासाठी....

चिमणीचे सगळे काम आटोपले, ती जरा निवांत झाली आणि तेव्हा तिच्या लक्षात आलं की, अरेच्च्या! आपण अजून कावळ्यासाठी दारच उघडलेलं नाही. तिला विलक्षण अपराधी वाटलं. तिनं बंद दारामागचा कानोसा घेतला. दाराबाहेर शांतता होती. ती शांतता चिमणीला असह्य झाली. तिनं तत्परतेनं दार उघडलं. दाराबाहेर कावळा नव्हता. तिने आजू बाजूला फिरून पाहिलं, कावळा कुठेही नव्हता.
'गेला असेल कुठेतरी... येईल परत'
…. तिने स्वत:च्या मनाची समजूत काढली.
मात्र, रात्र मावळली... दिवस उगवला, संध्याकाळ झाली आणि परत रात्र आली तरी कावळ्याचा काही पत्ताच नव्हता.
चिमणीचं मन आज कशातच रमेना बाळाला न्हाऊ घालण्यातही नाही आणि बाळाला गंध-पावडर करण्यातही नाही
कारण एव्हाना तिला सवय झाली होती …. कावळ्याने बंद दारावर केलेल्या टकटकीची ……
तो आवाज असा काही कानात साठला होता की दिवसातून अनेक वेळा तिने दारावर टकटक झालीय असं समजून दार उघडलं होतं आणि बाहेर कोणी नाही हे पाहून निराशेने बंद केलं होतं...
अनेक दिवस उलटले ...
चिमणीच्या मनातून काही कावळा जाईना.
मग तिने कावळ्याचा शोध घ्यायचाच असं ठरवून घरट्याबाहेर पाऊल ठेवलं. मजल दरमजल करत फिरताना थकून एका झाडाच्या फांदीवर विश्रांती घेण्यासाठी ती थांबली.
एवढ्यात त्याच झाडाच्या दुसऱ्या फांदीवरून चिरपरिचित आवाज तिच्या कानावर पडला...
तो 'कावळ्याचा' आवाज होता. तो आवाज ऐकून चिमणीला कोण आनंद झाला. सारा थकवा, सारा शीण कुठल्या कुठे पळाला.
तिने मोठ्या उत्साहाने त्या फांदीच्या दिशेने झेप घेतली. पहाते तर काय!
कावळा आपल्या घरट्यात आपल्या पिल्लांसोबत आनंदाने मौज मस्ती करत होता.
कावळ्याचं लक्ष चिमणीकडे गेलं. चिमणीला पाहून त्याला फार आनंद झाला. तो आनंदाने म्हणाला,
'या या चिमणाबाई. तुमचं स्वागत आहे आमच्या घरट्यात. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. बोला, काय करू तुमच्यासाठी?'
कावळ्याचं ते अगत्य पाहून चिमणी खूप ओशाळली. म्हणाली,
- 'तुला राग नाही आला माझा?'
- का यावा?
- मी माझ्यात विश्वात गुंग होते म्हणून?
- छे छे! प्रत्येकाचं आपलं असं स्वतंत्र विश्व असतं.. जसं तुझं होतं. तुला त्यात माझी गरज कधीच नव्हती माझी ती गरज होती म्हणून मी तुझ्या दाराशी आलो. पण नंतर मला माझी चूक कळली. माझी गरज भागवण्यासाठी तू तुझ्या विश्वातून बाहेर येउन मला साथ देणं किंवा तुझ्या विश्वात मला प्रवेश देणं या दोनीही गोष्टी 'अतिक्रमणा सारख्याच' घडल्या असत्या नाही का? आणि कुणाच्याही वस्तूवर, अधिकारावर, भावविश्वावर 'अतिक्रमण' करण चूकच नाही का? म्हणून मग मी स्वत:च वजा व्हायचं ठरवलं आणि निघालो एकटाच …. तुझ्या विश्वापासून दूर.
- मला एकट करून? अरे, मला सवय झालीय आता तुझी.
- चिमणाबाई, या जगात एकट कोणीच नसतं. जेव्हा आपण एकट आहोत असं वाटतं ना तेव्हा तो एकांतच असतो आपला सोबती जो दाखवत असतो आपल्याला वाट आयुष्यातल्या पुढच्या प्रवासाची . मलाही दाखवली त्याने आणि बघ ……. आज मी किती आनंदी आहे माझ्या 'घरट्यात'… माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या 'माझ्या माणसांमध्ये'
चिमणी नि:शब्द होऊन तिथून निघाली तेव्हा कावळा तिला एवढंच म्हणाला -
- चिमणाबाई, माझ्या घरट्यात तू केव्हाही येऊ शकतेस हो. तुझी टकटक ऐकून मी लगेच दार उघडेल क्षणाचाही विलंब न करता.
चिमणीचे डोळे पाणावले... भरल्या कंठाने निरोप घेऊन तिने परतीची झेप घेतली आपल्या घरट्याकडे...
पण आज तिच्या पंखात पूर्वीइतक बळ राहिलं नव्हतं....
आपल्या सगळ्यांचीच अवस्था ना थोड्याफार प्रमाणात त्या चिमणाबाई सारखी झालीय.
- म्हणजे ?
- म्हणजे कुणीतरी आपलं माणूस आर्तपणे आपल्याला साद घालतंय हे आपल्या गावीच नसतं. ह्या आपल्या माणसांमध्ये भाऊ, बहिण, मित्र, आई, वडील बऱ्याचदा पोटची मुलंही असू शकतात... त्यांची आर्त साद आपल्याला ऐकूच येत नाही.
…. म्हणजे ते पोटतिडकीने साद घालतात आणि आपण म्हणतो.
…'थांब मला जर करिअर करुदे.... थांब जरा मला आता घर घ्यायचय... थांब जरा मला आता कार घ्यायचीय थांब जरा मला आता ….' आणि मग ही जंत्री वाढतच जाते.
त्यांची सहन शक्ती संपते ते त्यांचं वेगळं विश्व तयार करतात... त्या विश्वात आपल्याला स्थान नसतं... आपल्या ते गावीही नसतं आणि जेव्हा भान येतं तेव्हा ….
आपण फार एकटे झालेले असतो.... !!
- आणि असं होऊ नये असं वाटत असेल तर?
- वेळीच 'टकटक ' ऐकायला शिका.
आज अनेकांची स्थिती हि चिमणी सारखी झाली आहे, माझ्या शिवाय दुसरे कोणी काही करू शकत नाही असा अहम प्रत्येकाचा जागा झाला आहे. आणि शेवटी हा अहम त्याला या गोष्टीतल्या चिमणी सारखे एकटे जीवन जगण्यास भाग पडेल. आपल्या जवळ येणारे कावळे त्यांच्या रूपावरून नव्हे तर त्यांच्या बुद्धीमत्तेवरून आपण त्यांचा आदर केला पाहिजे. तरच भविष्यात आपल्याला गोष्टीतील चिमणीसारखे पश्चाताप करून घेण्याची वेळ येणार नाही.
-      मंगेश विठ्ठल कोळी, मो.-९०२८७१३८२०

Wednesday, September 5, 2018

माझा बाप शून्य झाला....

आज का कुणास ठाऊक? अनेक दिवसापासून मनात वडिलांविषयी नेहमीचा आदर सोडून, वेगळ काहीतरी जाणवू लागल होत. आपले पिताश्री, पिता, वडील, पालक, बाप, बाबा, डॅडी, फादर, पपा अशा अनेक नावांनी हाक मारल्या जाणाऱ्या व्यक्तीच्या कष्टाची गोष्ट तुम्हाला सांगाविशी वाटत आहे. अनेक मुलांच्या मनामध्ये आपल्या बापाविषयी असणारी सहानुभूती किंवा त्यांच्या प्रती असणारे प्रेम कमी झाल्याची खदखद अनेक ठिकाणी बोलून दाखविली जाते, पाहायला मिळते. याची कारणे वेगवेगळी असू शकतील, परंतु हे सत्य आहे.
नेहमी सर्व ठिकाणी आईचे गुणगौरव किंवा महती सांगितली जाते. याचे कारण ही तसेच आहे, आई नेहमी मुलाच्या अनेक चुका सांभाळून घेत असते. स्वत:च मुल चुकीच वागलं तरी सुद्धा तो कशा प्रकारे बरोबर आहे, हे सांगण्याचे काम आई करत असते. हे आईचे मुला प्रती असणारे प्रेम असते, म्हणून नेहमी आई कशी चांगली आणि किती प्रेमळ हे अनेकजण सांगत असतात.
अनेक वडील मंडळी ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य मुलाला घडविण्यासाठी खर्ची केले. अशा एका वडिलांची गोष्ट मी आपणाला सांगत आहे. जी माझ्या जीवनाशी त्याच बरोबर अनावधानाने अनेकांच्या जीवनाशी मिळती जुळती असू शकेल?
एक मुलगा आपल्या घरापासून साधारणपणे दीड-दोनशे किलोमीटर दूर कामाच्या शोधात जातो. खूप कष्टाने सतत प्रयत्न करतो. अचानक त्याला एका कारखान्यात लिपिक/टंकलेखक म्हणून नोकरी असल्याची माहिती मिळते. तो मुलगा मुलाखत देण्यासाठी त्या कारखान्यात जातो. एक साधा शर्ट-पॅन्ट त्याला कशी बशी इस्त्री केलेली, शर्ट पॅन्टमध्ये खोचून इन केलेला, केस विंचरून, पायात साधी चप्पल घातलेली असे काहीसा पोशाख केलेला. मुलाखतीच्या ठिकाणी पोहोचतो, मुलाखतीची वेळ येते. त्या मुलाला कारखान्याचे सर्वेसर्वा असणारे संचालक त्यांच्या खोलीत मुलाखतीसाठी बोलावून घेतात. खोलीचे दार अर्धवट उघडून आतमध्ये बसलेल्या व्यक्तीची परवानगी घेऊन तो मुलगा त्या खोलीत प्रवेश करतो. त्याला खोलीत येण्याची परवानगी दिली जाते.
खोलीत गेल्यावर तो पाहतो, मुलाखत घेणारे संचालक दुसऱ्या कोणाशी तरी गप्पा मारत बसलेले असतात. तो एका बाजूला जाऊन उभा राहतो. संचालक व खोलीत बसलेल्या व्यक्तीचे संभाषण सुरु असते. त्याला काही उमजत नाही. तो शांतपणे एका बाजूला उभा राहून त्यांचे संभाषण ऐकत असतो. स्वत:च्या हातामध्ये असणाऱ्या छोट्या वहीत काहीतरी लिहित असतो. बराच वेळ गेल्यानंतर त्या संचालकाच्या लक्षात येते की, आपण कोणाला तरी मुलाखतीला बोलावले आहे. ते त्या मुलाला समोर बोलावतात आणि काही प्रश्न विचारतात. शेवटी त्या मुलाला सांगितल जात की, थोड्या वेळापूर्वी चाललेले आमचे संभाषण टाईप करून घेऊन ये. म्हणून सांगितले जाते. तेव्हा त्याच्या लक्षात येते की, खऱ्या अर्थाने तिच आपली मुलाखत होती.
मुलगा त्या मुलाखत कक्षातून बाहेर जातो. काही कालावधीनंतर पुन्हा तो त्या मुलाखत कक्षात येतो. आपल्या हातात असणारे कागद त्या संचालकांना दाखवतो. त्या कागदावरील मजकूर वाचून ते संचालक खूप आनंदी होतात. याचे कारण म्हणजे मुलाखत कक्षात संचालक आणि त्यांच्या सोबती बसलेल्या व्यक्तीमधील संभाषणाचे अगदी हुबेहूब वर्णन त्या टाईप केलेल्या पानांवरती छापलेले असते. मनोभावे आनंदी होऊन त्या मुलाची नोकरी पक्की केली जाते.
तो मुलगा आनंदाने उत्साहाने मुलाखत कक्षातून बाहेर पडतो. दुसऱ्या दिवशी स्वत:च्या घरी येतो. झालेला प्रसंग आई-वडिलांना सांगतो. तेव्हा आईचा आनंद गगनात मावेनासा असतो. मात्र वडीलांचा चेहरा त्याच्यापेक्षा बरचसं काही सांगत असतो. त्या चेहऱ्यावरील भाव त्या मुलाच्या लक्षात येतात. त्या मुलाला नेहमी चाणाक्ष, कार्यशील, गतिमान, त्याच बरोबर नेहमी अनेक अडचणी कशा पद्धतीने मात करायची. या सर्वांचे धडे देणारा आपला बाप आठवतो. नेहमी शांत राहणारा, स्वत:ला कितीही यातना झाल्यातरी पाठीशी खंबीरपणे उभा असलेला याची जाणीव करून देणारा, आपला मुलाला शिखरावर घेऊन जात असताना किंवा नेहमी दूरचा उत्तम विचार हा दररोजच्या छोट्या छोट्या गोष्टीतून शिकवणारा त्याच बरोबर दूरवर उभ्या असणाऱ्या संकटाना कशा पद्धतीने सामोरे जायचे याचे धडे देणारा आपला बाप आठवतो.
नेहमी देवळात गेल्यावर देवाचे दर्शन व्यवस्थित व्हावे यासाठी स्वत:ला खांद्यावर घेऊन दर्शन घडविणारा, आपल्या स्वत:चा बाप कोणत्याही परमेश्वरा पेक्षा कमी नाही याची जाणीव होते. त्यावेळी त्याच्या मनातून एकच आवाज येतो, "आज माझा बाप शून्य झाला”. शून्यू हा असा अंक आहे, ज्याची एरवी काहीही किंमत नसते. परंतु तो ज्याच्या पाठीशी उभा राहतो, त्याची किंमत मात्र दहा पटीने वाढली जाते, हे त्या मुलाच्या लक्षात येते. तो आपले हात जोडून आपला माथा बापाच्या पायावर ठेवतो आणि डोळ्यातून निघणाऱ्या अश्रुनी त्यांचे पाय धुवून टाकतो.
-    मंगेश विठ्ठल कोळी.
मो. ९०२८७१३८२०

Tuesday, June 12, 2018

सुखांचे सॅशे..!!


       आपण किराणामालाच्या दुकानात उभे असतो, मुलानी कुठलीशी दुधात घालायची पावडर आणि बायकोनी कुठलासा लै भारीवाला शांपू आणायला सांगितलेला असतो…  या दोन्हीच्या  रेग्युलर पॅक्स वरच्या किंमती बघून आपले डोळे पांढरे व्हायची वेळ आलेली असतेआपण ते घ्यावेत का नाही? या द्विधा मनःस्थितीत असताना दुकानदार हळूच सांगतो, ‘दोन्हीचे सॅचे आहेत साहेब… try करून बघा…’ मग आपण ते सॅचेकिंवा सॅशे बघतोअगदीच पाच-दहा रुपयांना असतातखुश होऊन आपण दोन्हीचे दोन-चार सॅशे घेऊन टाकतो आणि ताठ मानेनं घरी परत जातो!!
'सॅशे' हे भारतीय बाजारपेठेसाठी बहुराष्ट्रीय कंपन्यांनी केलेलं सगळ्यांत मोठं इनोव्हेशन आहे ! हल्ली शांपूपासून सॉसेसपर्यंत, साबणांपासून मसाल्यांपर्यंत, गोळ्या-बिस्किटांपासून ते नारळपाण्याच्या पावडरीपर्यंत कशाचेही सॅशे मिळतातगिऱ्हाईकाला एकदम एक मोठ्ठा पॅक शे-दोनशे-चारशे रुपयांना घ्यायला लावायच्या ऐवजी दोन-पाच-दहा रुपयांचे छोटे पॅक्सदेणं हे त्या गिऱ्हाईकाच्या आणि आपल्याही फायद्याचं आहे. हे आजकाल सगळ्याच कंपन्या जाणतात आणि तसं वागतातही…! आपणही खूप पैसे देऊन मोठ्ठे पुडे विकत घ्यायच्या ऐवजी कमी पैसे देऊन छोटे पॅक्स आणि सॅशेज विकत घेतो
पण किराणामालाच्या दुकानातल्या व्यवहारांत दाखवत असलेला हा समजुतदारपणा आपण आपल्या व्यक्तिगत आयुष्यात मात्र अमलात आणत नाही !!
आपण आपल्या आयुष्यात सुखांच्या मोठ्या मोठ्या पॅकेट्सच्या मागे अहोरात्र धावत असतो…. मोठ्ठं घरमोठ्ठी गाडीभरपूर बॅंक बॅलन्सअफाट प्रसिद्धीप्रचंड यशवगैरे वगैरे वगैरे…. सुखांचे हे भले मोठ्ठे पॅक्स मिळावेत म्हणून आपण जीवापाड मेहनत करत रहातोहे मोठे पॅक मिळाले / मिळवले तरच आनंदी होतोनाही मिळाले तर किंवा मिळत नाहीत तोवर दु:खी रहातो
पण सुखं ही फक्त मोठ्या पॅक्समध्ये मिळत नाहीत तर छोट्याश्या सॅशे मध्येही मिळू शकतात हे आपण लक्षातच घेत नाही !!
म्हणजे,
"मोठ्ठं घरहोईल तेंव्हा होईल, पण सध्याच्या छोट्या घरात निवांत जगत सुखानं शांत झोप लागू शकणं हा किती छान सुखाचा सॅशे असतो...
"मोठ्ठी गाडीघेऊ तेंव्हा घेऊ, पण सध्याच्या छोट्या गाडीतून वाऱ्यावर स्वार होऊन गावभर बेभान भटकणं हाही एक सुखाचा सॅशे असतो
हेच सारं प्रसिद्धी, यश वगैरे साऱ्या साऱ्या मोठ्या पॅकेजेसचंया सगळ्या मोठय़ा पॅकेजेसचे कोणते ना कोणते छोटे सॅशे असतातजे आपण ओळखून अनुभवले ते मोठ्या पॅक्सहून जास्त सुखाचा अनुभव आपल्याला येऊ शकतो
रहाता रहाते गोष्ट ती "भरपूर बॅंक बॅलन्सकिंवा खिशातल्या अफाट पैशाचीपैसा हे एक असं पॅकेज आहे की ज्याच्या सॅशेमध्ये मजा नाही असं आपल्याला वाटतंहजारच्या नोटेची किंमत शंभरच्या नोटेला नाही आणि शंभरच्या नोटेची ऊब पाच रुपयाच्या नाण्याला नाही
खरंच असं वाटतं तुम्हाला?
तर मग, धो धो पाऊस कोसळत असताना, टपरीवरचा वाफाळता चहा आणि गरम्म भजी हवी घेण्यासाठी हजारची नोट देऊन बघा किंवा लाखो रुपये बॅलन्स असलेलं तुमचं क्रेडिट कार्ड देऊन बघा…!!
नाही मिळणार ते सुख तुम्हाला हजारो लाखो रुपयांनी
तिथे पाच रुपयांच्या कॉईन्सचे दोन-चार सॅशेच पुरेसे असतील!!
स्वत: आनंदी रहा, दुसऱ्यालाही आनंद द्या.

Friday, May 4, 2018

मी सर्वांचा आभारी आहे.

वर्षानुवर्षे आईच्या वाढदिवसानिमित्त मी देवाजवळ एकच मागणे मागतो. जशी मला आई दिलीस तशी आई सर्वाना दे. “मुल रडत असताना आई हसते, असे दुर्मिळ चित्र जीवनात एकदाच घडते. ती वेळ म्हणजे आपल्या जन्माची वेळ होय.” मुलाला कितीही मोठी संकटे आली तरी त्यातून कशा पद्धतीने बाहेर पडायचे मार्गदर्शन आपली आई देत असते. प्राचीन कालपासूनच “आई आपला पहिला गुरु” होती, आहे आणि यापुढे ही तिच राहणार आहे. आज पहिल्यांदाच आईचा वाढदिवस आणि माझी आई माझ्या जवळ नव्हती. काही कार्यक्रमानिमित्त ती बाहेरगावी गेली होती. मला तिची खूप आठवण येत होती.
माझ्या व्हट्स आणि फेसबुकवर आईचा फोटो शेअर केला. त्या फोटो सोबत फक्त चारच शब्द मी लिहिले होते “आज माझ्या आईचा वाढदिवस” अनेक मित्रमैत्रिणीनी माझ्या आईला “Happy Birthday Aai, आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा, आईला दीर्घ आयुष्य लाभो, आमच्याकडून ही आईला शुभेच्छा, कोणी फोटो, कोणी icon तर कोणी फोन करून आईला शुभेच्छा कळवा, काही जणांनी तर आईचा मोबाईल नंबर मागत आईशी बोलून शुभेच्छा द्यायच्या आहेत अशी मागणी केली.” यावर माझ्या लक्षात एक गोष्ट आली ज्या ज्या व्यक्ती अशा काही प्रतिक्रिया देत आहेत ते सर्वजण आईवर भरभरून प्रेम करतात हे नक्की.
आज सर्व काही आवरून ऑफिसला जाण्यासाठी बाहेर पडलो. दररोज सर्व काही व्यवस्थित घेतले का? याची चौकशी करणारी आईची हाक आज कानावर पडली नाही. ऑफिसला आल्यावर सुद्धा कशातच मन लागत नव्हते. सर्वाना दाखविण्यासाठी मी चेहऱ्यावर हसू आणत होतो. परंतु मनात खूप काळजी वाटत होती. का कुणास ठाऊक पण लहानपणीचे दिवस आठवू लागले. शाळेतून घरी आल्यावर किंवा बाहेरून खूप दमून घरात शिरत असतानाच दारातूनच आई... आई... आई... अशी हाक मारतो आणि आई आतून आवाज देते काय झाल? का हाक मारत आहेस? त्यावर आपण काही नाही. अस उत्तर देतो. परंतु तिचा आवाज कानावर पडला नाही की मग मात्र मनात अनेक प्रश्नांचे कल्लोळ उठू लागतात. आई कुठे गेली असेल? शेजारी जाऊन विचारून येतो? त्यांनाही माहीत नसेल तर मात्र जीवाची घालमेल व्हायला सुरुवात होते. आपल काही काम नसले तरी आईला हाक मारताच, तिचा आवाज ऐकताच आपले मन निश्चिंत होते.
ऑफिसच काम आटोपून घरी आलो समोर बायको उभा होती. तिला माझा पहिला प्रश्न आई कुठे आहे? त्यावर बायकोने उत्तर दिले आई आली नाही. मी तिला रागवत म्हणालो, किती दिवस राहणार आहे? आज वाढदिवस आहे? मी आईला सांगितले होते की गावाकडून परत ये? तरी तिने माझ एकले नाही? मी आईला सरप्राईज द्यायचे होते. आईला न सांगता तिचा वाढदिवस साजरा करायचा होता. त्यासाठी मी केक आणला आहे? तिला भेट वस्तू आणली आहे. असे बोलत असतानाच आई माझ्या पुढे येऊन उभा राहिली. माझा आनंद लहान मुलासारखा गगनात मावेनासा झाला होता. सर्व काही सोडून घरातील सर्वाना लवकर आवरायला सांगितले. आईचा वाढदिवस साजरा केला. आगदी लहानपण पुन्हा जगल्याचा अनुभव आला. सर्वजण मिळून जेवलो, खूप गप्पा केल्या. न राहून मनात विचार आला. जगातील सर्वांची आई सुखात राहिली पाहिजे तरच पुढील पिढी सुखी होईल.
आज माझ्या आईला सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा बद्दल मी सर्वांचे मनस्वी आभार मानतो.
-       मंगेश विठ्ठल कोळी.
-       मो. ९०२८७१३८२०