वर्षानुवर्षे
आईच्या वाढदिवसानिमित्त मी देवाजवळ एकच मागणे मागतो. जशी मला आई दिलीस तशी आई
सर्वाना दे. “मुल रडत असताना आई हसते, असे दुर्मिळ चित्र जीवनात एकदाच घडते. ती
वेळ म्हणजे आपल्या जन्माची वेळ होय.” मुलाला कितीही मोठी संकटे आली तरी त्यातून कशा
पद्धतीने बाहेर पडायचे
मार्गदर्शन आपली आई देत असते. प्राचीन कालपासूनच “आई आपला पहिला गुरु” होती, आहे
आणि यापुढे ही तिच राहणार आहे. आज पहिल्यांदाच आईचा वाढदिवस आणि माझी आई माझ्या
जवळ नव्हती. काही कार्यक्रमानिमित्त ती बाहेरगावी गेली होती. मला तिची खूप आठवण
येत होती.
माझ्या
व्हॉट्स
आणि फेसबुकवर आईचा फोटो शेअर केला. त्या फोटो सोबत फक्त चारच शब्द मी लिहिले होते
“आज माझ्या आईचा वाढदिवस” अनेक मित्रमैत्रिणीनी माझ्या आईला “Happy
Birthday Aai, आईला वाढदिवसाच्या
शुभेच्छा, आईला दीर्घ आयुष्य लाभो, आमच्याकडून ही आईला शुभेच्छा, कोणी फोटो, कोणी
icon तर कोणी फोन करून आईला शुभेच्छा कळवा, काही जणांनी तर आईचा मोबाईल नंबर मागत
आईशी बोलून शुभेच्छा द्यायच्या आहेत अशी मागणी केली.” यावर माझ्या लक्षात एक गोष्ट
आली ज्या ज्या व्यक्ती अशा काही प्रतिक्रिया देत आहेत ते सर्वजण आईवर भरभरून प्रेम
करतात हे नक्की.
आज
सर्व काही आवरून ऑफिसला जाण्यासाठी बाहेर पडलो. दररोज सर्व काही व्यवस्थित घेतले
का? याची चौकशी करणारी आईची हाक आज कानावर पडली नाही. ऑफिसला आल्यावर सुद्धा कशातच
मन लागत नव्हते. सर्वाना दाखविण्यासाठी मी चेहऱ्यावर हसू आणत होतो. परंतु मनात खूप
काळजी वाटत होती. का कुणास ठाऊक पण लहानपणीचे दिवस आठवू लागले. शाळेतून घरी
आल्यावर किंवा बाहेरून खूप दमून घरात शिरत असतानाच दारातूनच आई... आई... आई... अशी
हाक मारतो आणि आई आतून आवाज देते काय झाल? का हाक मारत आहेस? त्यावर आपण काही नाही.
अस उत्तर देतो. परंतु तिचा आवाज कानावर पडला नाही की मग मात्र मनात अनेक
प्रश्नांचे कल्लोळ उठू लागतात. आई कुठे गेली असेल? शेजारी जाऊन विचारून येतो? त्यांनाही
माहीत नसेल तर मात्र जीवाची घालमेल व्हायला सुरुवात होते. आपल काही काम नसले तरी
आईला हाक मारताच, तिचा आवाज ऐकताच आपले मन निश्चिंत होते.
ऑफिसच
काम आटोपून घरी आलो समोर बायको उभा होती. तिला माझा पहिला प्रश्न आई कुठे आहे?
त्यावर बायकोने उत्तर दिले आई आली नाही. मी तिला रागवत म्हणालो, किती दिवस राहणार
आहे? आज वाढदिवस आहे? मी आईला सांगितले होते की गावाकडून परत ये? तरी तिने माझ
एकले नाही? मी आईला सरप्राईज द्यायचे होते. आईला न सांगता तिचा वाढदिवस साजरा करायचा
होता. त्यासाठी मी केक आणला आहे? तिला भेट वस्तू आणली आहे. असे बोलत असतानाच आई
माझ्या पुढे येऊन उभा राहिली. माझा आनंद लहान मुलासारखा गगनात मावेनासा झाला होता.
सर्व काही सोडून घरातील सर्वाना लवकर आवरायला सांगितले. आईचा वाढदिवस साजरा केला. आगदी
लहानपण पुन्हा जगल्याचा अनुभव आला. सर्वजण मिळून जेवलो, खूप गप्पा केल्या. न राहून
मनात विचार आला. जगातील सर्वांची आई सुखात राहिली पाहिजे तरच पुढील पिढी सुखी
होईल.
आज
माझ्या आईला सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा बद्दल मी सर्वांचे मनस्वी आभार मानतो.
-
मंगेश विठ्ठल
कोळी.
-
मो. ९०२८७१३८२०