Saturday, June 21, 2025

इच्छामरण - पुस्तक परीक्षण

इच्छामरण या शब्दाचे अर्थ आपल्या मनात वेळेनुसार बदलणाऱ्या भावना, विचार यावर आधारलेला आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध कवयित्री, लेखिका डॉ. सुनीता चव्हाण यांनी लिहिलेले "इच्छामरण" हा कथासंग्रह वाचनास मिळाला. सर्व प्रथम मी त्यांच्या या पहिल्या कथासंग्रहाला शुभेच्छा देतो. इच्छामरण हा कथासंग्रह वाचत असताना लेखिका डॉ. सुनीता चव्हाण यांची मुखपृष्ठ कथा वाचली. अतिशय सुंदर कथा. प्रत्येक घरातील आणि घरातील प्रत्येक स्त्रीच्या मनातील भावभावना स्पष्टपणे मांडण्यात लेखिका यशस्वी झाल्या आहेत. या कथेतील स्त्रीच्या भावना, तिने आईवडिलांचे घर सोडून इतर परक्या म्हणजेच नवऱ्याचे घरात लग्न करून आल्यावर ज्या काही अपूर्ण असणाऱ्या गोष्टी पूर्ण करण्याची धावपळ, आणि या धावपळीत स्वतः ला विसरून सर्वांसाठी अहोरात्री कष्ट करणारी स्त्री जेंव्हा अनेक वर्ष सातत्याने राबत असते आणि काही वेळा तिला विचारले जाते की तू या घरासाठी काय केले आहे किंवा मुलं मोठी झाल्यानंतर विचारतात तू माझ्यासाठी काय केले आहे. या प्रश्नांची उत्तरे कोणत्याही स्त्री कडे नसतात. इच्छामरण या कथेतील नाईका सुद्धा याच प्रश्नाच्या भोवती तिची विचार शृंखला असताना दिसते. परंतु लेखिकेने या कथेसाठी लिहिलेले प्रसंग हे जर कोण्या चांगल्या एकांकिका स्पर्धेमध्ये सहभागी झाले तर नक्कीच त्याला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मी नक्कीच देऊ इच्छितो. "चकवा" याकथेत लेखिकेने आजचा सर्वात मोठ्या प्रश्नाला स्पर्श केला आहे. आज तृतीयपंथी व्यक्ती, ट्रान्सजेंडर होऊ पाहणाऱ्या किंवा ज्या व्यक्ती पुरुष आहेत परंतु त्यांच्यामध्ये स्त्रीच्या भावना मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. अशा व्यक्तींना आज देखील आपला समाज स्वीकार करत नाही. अशा व्यक्तींच्या मनातील विचार लेखिकेने स्पष्ट आणि परखड पणे मांडले आहेत. या कथेतील पात्र जेव्हा पुरुषांकडून स्त्री कडे वळते त्यांचा भावभावना कोणत्या असू शकतात, त्या स्वीकारताना कोणकोणत्या प्रकारचा त्रास होतो हे निर्भीड पणे लेखिका मांडण्यात यशस्वी झाल्या आहेत. "माऊ" याकथेतून लेखिका डॉ. सुनीता चव्हाण यांचे मुक्या प्राण्यांच्या भावना सूंदर पद्धतीने मांडल्या आहेत. जसे मनुष्य एकमेकांच्या पासून दूर होतात. त्याच प्रमाणे एखादा प्राणी सुद्धा दूर होताना कोणत्या हाल अपेष्टा सहन करत असेल याचे वर्णन केले आहेत. आपल्याला प्रिय असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीसाठी आपण आपले सर्वस्व पणाला लावून त्याची काळजी घेतो. त्याच प्रमाणे माऊ याकथेतील नाईका त्या मांजराची काळजी घेते आहेत. असे म्हणतात की माणसापेक्षा मुक्या प्राण्यांना लावलेला जीव, त्यांच्या बाबत असणारे प्रेम ते प्राणी कधीही विसरत नाहीत. याचाच प्रत्येय ही कथा वाचताना येतो. त्याच बरोबर लेखिका डॉ. सुनीता चव्हाण यांच्या या कथासंग्रहतील जमीन दुभंगते तेव्हा, बाप, अदालबदली, जरा विसावू या वळणावर, आणि ती बाबा झाली, दोघी दोघी, मुक्ती, एकदा हळवं पत्र, संस्काराचा पारिजातक या कथा सुद्धा खूप सुंदर आहेत. सर्व कथासंग्रह वाचत असताना असे लक्षात येते की प्रसिद्ध कवायत्री च्या भावना विचार लेखनाच्या पद्धतीने कथा वाचत असताना वाचकाचे मन खिळवून ठेवणच्या शाब्दिक ताकद निसर्गाने त्या परमेश्वराने डॉ. सुनीता चव्हाण यांना उपजतच देणगी स्वरूपात दिली आहे. याचा वापर लेखिकेने समाजातील ज्वलंत प्रश्न तसेच निराधार व्यक्ती, प्राणी यांच्यासाठी खर्ची करावी असे मला वाटते. पुढील लेखणीला माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा.. श्री. मंगेश विठ्ठल कोळी. मु. पो. ता. शिरोळ. जि. कोल्हापूर मो. 9028713820