एस आय कॅन हा शब्द कित्येक जण दिवसातून एकदा तरी ऐकतो. जो व्यक्ती या शब्दाचा अर्थ समजावून घेऊन कृती करतो तो नक्कीच प्रगतीच्या मार्गावर चालत असतो आणि त्या व्यक्ती फक्त ऐकतात किंवा दुसऱ्याला ऐकवतात त्या प्रमाणे कृती करीत नाहीत त्यांची प्रगती खुंटते. काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ पाहण्यात आला. त्या व्हिडिओमधील अपंग असणाऱ्या व्यक्ती खूप काही अशक्य वाटणाऱ्या गोष्टी किंवा पूर्ण शरीराचे भाग असून सुद्धा एखादी व्यक्ती ज्या गोष्टी करू शकत नाही त्या सहजरीतीने करून दाखवतात.
अनेक अपयशी व्यक्तींना त्यांच्या अपयशाचे कारण विचारले तर सर्व काही असून सुद्धा अनेक गोष्टींची यादी देतात ते निर्लजपणे स्वतः मधील असणाऱ्या अवगुण सांगतात किंवा सर्व दोष नशिबाला देतात. स्वतः वरची जबाबदारी झटकताना दिसतात. माझे ते कर्तव्य नाही असे शब्द बोलतात, जे व्यक्ती कर्तव्य हा शब्द वापरतात ते कधीही स्वतः चा सर्वांगीण विकास करू शकत नाहीत.
स्वतः जवळ असणाऱ्या गुणांचा, शारीरिक-मानसिक कौशल्यांचा तसेच क्षमतांचा पुरेपूर वापर करून प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळविण्यासाठी सतत कष्ट घेत असतात. अशा व्यक्ती नेहमी स्वतः जवळ असणाऱ्या अनेक छोट्या छोट्या गोष्टींचा यादी तयार करतात त्यानुसार त्यावर सतत मेहनत घेऊन अशक्य वाटणाऱ्या गोष्टीवर सहज विजय मिळवतात आणि नेहमी ते इतरांना एस आय कॅन या शब्दाचा अर्थ साध्या आणि सोप्या शब्दांमध्ये आणि कृतीतून दाखवून देतात त्या पद्धतीने प्रत्येक काम करत असताना स्वतः नेहमी सांगत रहा. एस आय कॅन आणि यशाच्या शिखरापर्यंत पोहचा.
No comments:
Post a Comment