Monday, February 27, 2017

राष्ट्रीय विज्ञान दिन....


      28 फेब्रुवारी 1928 रोजी भारतीय भौतिकवादी, सर चंद्रशेखर वेंकट रमन यांनी भारतातील रमण परिणामाचा शोध लावला. तेव्हा पासून 28 फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात शास्त्रीय, शैक्षणिक, वैद्यकीय, तांत्रिक, संशोधन आणि सर्व महाविद्यालये, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, शास्त्रज्ञ, संशोधक हा दिवस खूप उत्साहाने साजरा करतात.

काही दिवसांपूर्वी भारताने संपूर्ण जगाचे लक्ष वेधणारे काम करून दाखवले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने एकाचवेळी १०४ उपग्रह अंतराळात सोडून नवा विश्व विक्रम केला आहे. 21 वे शतक हे विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाचे मानले जाते आणि ते खरे ठरत आहे. कारण आज आपण आपल्या आजूबाजूला पाहिले तर या विज्ञानामुळे आपली प्रगती खूप वेगाने होत चाललेली आपणाला दिसते आहे. नवनवीन यंत्र, तंत्रज्ञान हे बदल सर्व विज्ञानामुळे होत आहेत. आपल्या समाजामधील ज्या अंधश्रध्दा होत्या त्या विज्ञानामुळेच नष्ट झाल्या आहेत आणि हे एक चांगल्या प्रगतीचे लक्षण मानले जाते.

आता आपण विज्ञानावर एवढे अवलंबून राहत आहे की, आपल्याला पहाटे उठण्यासाठी होणारा गजर म्हणजे घड्याळ हे सुध्दा एक विज्ञानाचे आणि प्रगतीचे छान उदाहरणच आहे. आपली संपूर्ण दिवसाची दिनचर्या आपण या छोट्याशा मशीनमुळे योग्य वेळेत योग्य कामे करतो आणि त्याचा फायदा सर्वांना होताना दिसत आहे.

1999 पासून भारत देशात विज्ञान दिवसाच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना राबवल्या जातात. यामुळे नवनवीन विषय तसेच विज्ञानामधील चांगले वाईट अनुभव किंवा पुढील काही वर्षाचे नियोजन आपण आतापासून करू शकतो आणि पुढील काळातील होणारे नुकसान टाळण्याचा प्रयत्न करू शकतो. 1999 मध्ये आमचे पृथ्वी बदलणे ही संकल्पना राबविण्यात आली. 2004 मध्ये समुदायातील उत्साहवर्धक वैज्ञानिक जागृती ही संकल्पना राबविण्यात आली. 2009 मध्ये विज्ञान विस्तृत मिळाल्यामुळे तर 2013 मध्ये मॉडिफाईड पिके व अन्नसुरक्षा सुधारणा या संकल्पनेवर  भर देण्यात आला. सन 2013 पासून रणम प्रभावअमेरिकन केमिकल सोसायटीकडून आंतरराष्ट्रीय ऐतिहासिक रासायनिक खुण म्हणून नियुक्त केले गेले.

फेब्रुवारी 2014 ला वैज्ञानिक स्वभाव वाढविण्यास प्रोत्साहन देणे ही संकल्पना राबविण्यात आली. चालू वर्षामध्ये ‘खास विकलांग व्यक्तींसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान’ हि संकल्पना राबविण्यात येत आहे. प्रत्येक वर्षी भारतातमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवसाला अनेक ठिकाणी चांगले संभाषण, विविध संशोधने शास्त्रज्ञांची चर्चासत्रे अशा अनेक कार्यक्रमांनी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. आतापर्यंत विज्ञानामध्ये झालेल्या प्रगतीमुळे मानव जातीला तसेच संपूर्ण सृष्टीला चांगला फायदा झाला आहे. नवनवीन ठिकाणी नोकरीच संधी मिळाल्या आहेत आणि जीवन जगण्याचे, उदरनिर्वाह करण्याचे एक प्रगतीशिल साधन मिळाले आहे. त्याचा सामाजिक, आर्थिक, व्यवहारिक चांगला फायदा होत आहे.

आपल्याला ज्या सुखसोई आता उपलब्ध आहेत, त्या फक्त आणि फक्त विज्ञानामुळे आहेत आणि आपण भविष्यात काय घडवू शकतो हे सुध्दा विज्ञानच ठरवू शकते. भारतीय राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा....!

श्री. मंगेश विठ्ठल कोळी

मो. ९०२८७१३८२०

Wednesday, February 8, 2017

विधान भवन ग्रंथालय

     आज मुंबईमध्ये येऊन जवळपास दोन महिने पूर्ण होत आले होते. 26 जानेवारीच्या पूर्व संध्येला मंत्रालय इमारती बरोबरच विधान भवन इमारत सुद्धा आकर्षक रोषणाईने उजळून निघाले होते. विधान भवन इमारत बाहेरून पाहिली तर एक अजरामर कला कुसरतेचा अलौकिक नमुनाच आहे. इमारतीचे देखणे रूप आणि अवाढव्यपणा सर्वांनाच भुरळ घालतो. मला ही बाहेरून पाहिल्यानंतर आतमध्ये जाऊन पाहण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. मुंबईत असे पर्यंत एकदा तरी ही इमारत, त्यामध्ये चालणारे कामकाज जवळून पाहण्याची तीव्र इच्छा आज पूर्ण झाली.

      विधान मंडळ सचिवालयमध्ये असणाऱ्या ग्रंथालयाबद्दल खूप काही गोष्टी ऐकल्या होत्या. तिकडे असणाऱ्या पुस्तकांची अनेक अधिवेशन काळात बऱ्याच आमदारांच्या भाषणामध्ये या ग्रंथालयात उपलब्ध असणाऱ्या पुस्तकातून वेळोवेळी संदर्भ घेतलेला ऐकला होता. त्याच बरोबर अनेक व्यक्ती संशोधन करण्यासाठी आणि संदर्भासाठी या ग्रंथालयातील पुस्तकांचा उत्तम पद्धतीने उपयोग केला जातो. असे समृद्ध ग्रंथालय पाहण्याची उत्सुकता वाढली होती. मी स्वतः लिहिलेली पुस्तके या ग्रंथालयात असावे अशी खूप वर्षांपासूनची इच्छा होती.

      स्वतः लिहिलेली पुस्तके घेऊन विधान भवनाच्या मुख्य इमारतीमध्ये प्रवेश करत असताना येथील सुरक्षेची जबाबदारी असणारे प्रत्येक व्यक्तीला व्यवस्थित काळजीपूर्वक तपासून पाठवत होते. त्या पद्धतीने माझीही तपासणी झाली. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर पाचव्या मजल्यावर असणारे भव्यदिव्य आणि आटोपशीर पद्धतीने ठेवलेल्या पुस्तकांना पाहून कोणत्याही वाचकाला समाधान मिळेल. ग्रंथालयामध्ये तांत्रिक सहायक श्री. नि.ब. वडनेरकर सरांना भेटलो. त्यांना सांगितले की, मी स्वतः लिहिलेली *यशोमंदिर* आणि *यशोशिखर* विधान भवनाच्या या ग्रंथालयामध्ये भेट द्यावयाची संकल्पना सांगितली.

      वडनेरकर सरांनी माझी विनंती मान्य केली. त्याचबरोबर ग्रंथालय फिरून पाहता येईल का? असा प्रश्न करताच त्यांनी आनंदी चेहऱ्याने होकार दिला. माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मला हि मिळालेली संधी ग्रंथालयातील असणाऱ्या पुस्तकांची पाहणी करण्यास सुरुवात केली. या ग्रंथालयामध्ये 80 हजारांहून अधिक पुस्तकांची संख्या असणारे, प्रत्येक विषयाशी संबंधित असणाऱ्या पुस्तकांचा यामध्ये समावेश आहे. तसेच विषयानुसार पुस्तकांची मांडणी, दिशा आणि पुस्तकांची मांडणी केलेले फलक, योग्य ती बैठक आणि प्रत्येक पुस्तकावरती विधी मंडळ ग्रंथालयाचे लेबल त्याच्यावर चिकटवलेले होते. त्या प्रत्येक पुस्तकाची नोंदणी असणारे क्रमांक स्पष्टपणे दिसत होते आणि त्या क्रमांकाची नोंद चोखपणे ठेवलेली होती. कोणतेही पुस्तक वाचकाला वाचण्यासाठी दिले जात असताना त्या व्यक्तीच्या नावाची नोंद हि घेतली जाते. आजपर्यंत मी पाहिलेल्या ग्रंथालयातील हे खूप भव्यदिव्य असे आहे.

      ग्रंथालय फिरून सर्व पुस्तकांवर नजर फिरवत असताना मंत्रमुग्ध झालो होतो. बऱ्याच वर्षांपूर्वी फक्त नावे ऐकली होती ती पुस्तके येथे पाहून मनाला अत्यानंद झाला. थोडा वेळ ती पुस्तके चालण्यात स्वतः मग्न झालो. एक एक पाऊल पुढे चालताना या समृद्ध, भव्यदिव्य, आटोपशीर मांडणी केलेली पुस्तके मनात घर करून राहत होती. शेवटी वेळे अभावी मी तिकडून बाहेर पडत असताना जड अंतकरणाने विधी मंडळ ग्रंथालयाचा निरोप घेतला. मी शरीराने तिकडून बाहेर पडलो असलो तरी माझ्या मनात अजून हि तिकडच्या पुस्तकांची छायाचित्रे ताजीतवानी आहेत. माझ्या जीवनातील अविस्मरणीय असा आजचा दिवस ठरला.

- श्री. मंगेश विठ्ठल कोळी
९०२८७१३८२०