Wednesday, July 17, 2019

डिपेंडींग नकोच...

डिपेंडींग नकोच...
आज सायंकाळी ऑफिसमधून लवकर घरी आलो फ्रेश झालो, निवांत व शांततेत गच्चीवर येऊन सायंकाळची थंड हवेचा आनंद लुटत बसलो होतो. बऱ्याच दिवसापूर्वी एका ठिकाणी समुपदेशन करण्यासाठी गेलो होतो. त्यावेळचा एक प्रसंग माझ्या लक्षात आला, आज समाजामध्ये अनेक व्यक्तीपेक्षा मी तर अस म्हणेन की, प्रत्येकाला इतरांच्यावर ठराविक कारणांसाठी अवलंबून रहावेच लागते हे ठिक आहे. परंतु छोट्या छोट्या गोष्टींसाठी इतरांच्यावरती अवलंबून रहावे लागणे. पुढे जाऊन त्याची सवयच अंगी जडली की मानवाची प्रगती खुंटायला सुरुवात होते हे तितकच वास्तव आणि सत्य आहे.
ज्या गोष्टी आपण सहज करू शकतो त्यासाठी सुद्धा बऱ्याच वेळा आपण इतरांना हुकुमशहा सारखे हुकुम करून करून घेतो. त्यावेळी ज्या ज्या व्यक्ती तुम्हाला मदत करतात. ते त्यांच्यातील तुमच्याविषयी असणारे प्रेम, आपुलकी किंवा तुमच्याशी काही कालावधीसाठी बांधील असतात म्हणून त्या करत असतात. त्या पाठीमागे त्यांचा दुसरा कोणताही भाव नसतो. परंतु जी व्यक्ती अशा प्रकारच्या हुकुम सोडतात त्यावेळी त्यांचा थोडासा का होईना पण अहंम (EGO) जागा झालेला असतो, मदत करणाऱ्या व्यक्ती आपल्याला घाबरतात असा त्यांचा निव्वळ गैरसमज असतो.
आपण जी कामे सहजपणे करू शकतो, ती सुद्धा करत नाही. त्यातून आपल्या आळशी स्वभावात वाढ होत असते. त्याच बरोबर त्याची वाईट सवयीमध्ये रूपांतर होत असते. आपण कोणतेही काम करत असताना नेहमी इतरांच्या मदतीची अपेक्षा करण्याची सवयच अंगी जडवून घेत असतो. या सर्वांचा एकच परिणाम होत असतो तो म्हणजे आपणाला जे काही यश मिळते त्यामध्ये भागिदारांची संख्या वाढत असते.
प्रसिद्ध तज्ज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन असे म्हणतात की, “मी त्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे, ज्यांनी मला कामामध्ये मदत केली नाही.” त्याचा फायदा म्हणजे ती कामे मी स्वतः करू शकलो, त्यातून मिळणारा अनुभव प्रत्यक्ष मला घेता आला. ते काम करत असताना मिळणाऱ्या यशामध्ये कोणीही भागिदारी नव्हता. प्रत्येकाने सुद्धा आपली दैनंदिनी आठवा. सकाळी झोपेतून जागे होण्यापासून ते रात्री झोपे पर्यंत स्वतः करू शकणारी कामे कोणकोणती आहेत. याची एक यादीच तयार करा, त्यापैकी जास्तीत जास्त कामे स्वतः एकट्याने करण्याचा प्रयत्न करा. ते काम पूर्ण केल्यानंतर जो आनंद मिळतो, त्याचे कशातच मोल नसते.
स्वतःला सर्वच कामामध्ये झोकून देऊन, मन लावून काम करण्याची सवय लागली पाहिजे. त्याचबरोबर इतरांवर कमीत कमी अवलंबून रहावे लागेल अशी सवय अंगी जडली गेली पाहिजे. असे केल्याने आळशी किंवा अवलंबून राहण्याची वाईट सवय आपोआप दूर होते आणि उत्तम प्रकारचे यश तुम्हाला मिळू शकते. एकदा याची सवय झाली की, यशाची प्रत्येक पायरी आपण सहजपणे चढू शकतो. अशा छोट्या छोट्या पायरी वरून आपण खूप मोठी यशाची शिखरे सहज सर करू शकतो. तर आज आणि आतापासूनच इतरांच्या वरती अबलंबून राहणे कमी करा व दररोज एक तरी नवीन गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करा. जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल.
(Mangesh Koli) माझे असे प्रेरणादायी विचार मिळविण्यासाठी व्हॉटसअॅप, फेसबुक, ट्विटर, ब्लॉग, टेलिग्राम, इन्स्टाग्राम चॅनेलवर फॉलो करू शकता.
श्री. मंगेश विठ्ठल कोळी.
मो.- ९०२८७१३८२० ईमेल – mangeshvkoli@gmail.com

12 comments:

  1. खूपच सुंदर .....
    तुमच म्हणण अगदी तंतोतंत खर आहे ....

    ReplyDelete
  2. लेख खूपच आवडला
    आपण म्हणता ते अगदी बरोबर आहे
    पण आचरणात आणणे खूप कठीण आहे असे ज्यांना लहानपणापासून सगळ्या गोष्टी हातात मिळाल्या त्यांना वाटन्याची शक्यता नाकारता येत नाही
    आपला लेख वाचून अशा लोकांनी जरूर सुधारायचा प्रयत्न तरी करावा असे मनापासून वाटते
    परत एकदा अभिनंदन

    ReplyDelete
  3. फार छान वाटले वाचून...

    राज धुदाट

    ReplyDelete