Friday, September 27, 2019

घटस्थापना म्हणजे काय?


*घटस्थापना म्हणजे काय?*
एक आधुनिक शेतकऱ्यांची प्रयोगशाळा आहे. काही वर्षांपूर्वी विज्ञान प्रयोग शाळा उपलब्ध नव्हत्या. तरी सुद्धा भारतातील शेतकरी राजा होता. त्याचे हे उत्तम उदाहरण.
आपल्या शेतातील माती आणायची व ती एका मातीच्या भांड्याच्या कडेला ठेवायची. त्या मातीच्या भांड्यात आपल्या शेतात असणारे पाणी भरायचे. जेणेकरून तो ओलावा मातीमध्ये टिकून राहिला पाहिजे. जे बियाणे आपल्याला शेतात रब्बी हंगामात पेरायचे आहे त्या बियाणांचे विविध प्रकार असतात. अशा वेगवेगळ्या प्रकारची बी-बियाणे त्या मातीत रूजवायची व नऊ दिवस निरीक्षण केले जायचे. 
या नऊ दिवसामध्ये ज्या बी-बियाण्यांची वाढ उत्तम असेल, ते बियाणे आपल्या शेतात लावण्यासाठी अत्यंत योग्य आहे हे लक्षात यायचे. काही वर्षांपूर्वी उत्तम बी-बियाणे तपासणीसाठी लॅब किंवा अत्याधुनिक प्रयोगशाळा नव्हत्या. मग ही पद्धत आत्यंतिक उपयुक्त आणि प्रभावी होती. याचा संबंध कोणत्याही धर्म व जातींशी नाही तर तो शेतकऱ्यांशी आहे.
खूप वर्षांपूर्वी सुद्धा आपला देश सर्व देशापेक्षा खूप पुढे होता, मग आज का मागे आहे थोडंसं आत्मपरीक्षण करावे लागेल. आपल्याकडील बदललेले निसर्ग चक्र पूर्व पदावर येण्यासाठी अनेक ठिकाणी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहे. आपण ही आपल्याकडून प्रयत्न करायला हवे. एवढीच हा लेख लिहिण्याच्या मागची माफक अपेक्षा आहे.
*- मंगेश विठ्ठल कोळी,* 9028713820

12 comments:

  1. खरंच भाऊ आज प्रत्येकाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. खूप सुंदर लेख

    ReplyDelete
  2. हो बरोबर आहे. आत्मपरीक्षण करायची गरज आहेच पण फक्त ते करून उपयोग नाही त्याच आचरण सुद्धा करायला हव.

    ReplyDelete
  3. शेतकरी हा मातीला पुजातो। आणि सार जग या शेतकरी वर्गावर जगतो

    ReplyDelete
  4. Shetakari mhanje ek shastradnyach ahe jamel tya paddhatine pikanchi ani bi biyananchi gunavatteche parikshan karto khar te matit ani matit Rahunach karto..

    ReplyDelete
  5. 👌🏻👌🏻🙏🏻 खुप छान माहिती मिळाली सर

    ReplyDelete
  6. खुप छान माहिती आहे ����������

    ReplyDelete
  7. एकदम खरंय .पण या प्रयोगाशाळेची जागा आता परंपरा आणि उपवास-व्रतांच्या अंधश्रद्धांनी घेतली आहे.

    ReplyDelete
  8. योग्य अनुमान...

    ReplyDelete