Friday, September 9, 2016

बेरोजगार तरूणांना रोजगार देणारी मुद्रा योजना


बेरोजगार तरूणांना रोजगार देणारी मुद्रा योजना

भारत हा संपूर्ण जगामध्ये तरुणांचा देश. आज या आपल्या देशाला बेरोगारीतून सोडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक, सामाजिक तसेच सर्वांगिण, विकासासाठी अनेक नव-नवीन योजना, संकल्पना राबविल्या आहेत त्यापैकी एक मुद्रा योजना. कोणतेही तारण अगर •ÖÖ×´Öन्Ö¤üÖ¸üÖ׿־ÖÖµÖ होतकरु, सुशिक्षित बेरोजगार तरुणंाना कर्ज पुरवठा करुन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मुद्रा योजनेंतर्गत अर्थ सहाय्य देण्यासाठी  ही योजना सर्वाेत्तम लाभदायी ठरत आहे.
भारतामधील ग्रामीण भागातील यशस्वी उद्योजक होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या लाखो तरुणांना मुद्रा योजनेच्या माध्यमातून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. मुद्रा योजना तीन भागामध्ये राबविली जात आहे, योजनेंतर्गत शिशु गट, किशोर गट आणि तरुण गट. शिशु गटांतर्गत आर्थिक लाभ 10 हजार रुपयापासून ते 50 हजार रुपयापर्यंत घेता येवू शकतो, किशोर गटांतर्गत आर्थिक लाभ 50 हजारपासून ते 5 लाखांपर्यंत घेता येतो आणि तरुण गटांतर्गत आर्थिक लाभ 5 लाखांपासून ते 10 लाखांपर्यंत पतपुरवठा केला जातो.
कोल्हापूर जिल्ह्यात मुद्रा योजनेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत जिल्ह्यात 32 हजार 925 लाभार्थ्यांना 247.82 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य विविध बँकाच्या माध्यमातून देण्यात आले आहे. मुद्रा योजने अंतर्गत शिशू गटांतर्गत 28 हजार 495 तरुणांना 7639 लाख, किशोर गटांतर्गत 3 हजार 549 तरुणांना 10775 लाख आणि तरुण गटांतर्गत 881 तरुणांना 6368 लाखाचे अर्थ सहाय्य करण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील तरुण लघु उद्योजकांना सहकारी, राष्ट्रीय, प्रादेशिक ग्रामीण बँका, बिगर बँक, वित्तीय संस्थामार्फत अर्थ सहाय्य उपलब्ध करुन दिले जात आहे.
             मुद्रा योजनेच्या माध्यमातून छोट्या कारखानदारांना आणि दुकानदारांनाही कर्ज उपलब्ध होऊ शकते त्याच बरोबरच सुतार, गवंडी काम, कुंभार, सलुन, शिंपी, धोबी, भाजीपाला फळ विक्रेते इत्यादी लहान स्वरुपाच्या व्यवसायासाठीही कर्ज देण्याची तरतुद केली आहेे. या योजनेद्वारे तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यातून उद्योजक निर्माण व्हावेत या हेतूने प्रत्येक गावामध्ये तरुणांचे आणि व्यवसायिकांचे मेळावे, कार्यशाळा, चर्चासत्र याद्वारे अधिकाधिक जनजागृती करुन या योजनेचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी खऱ्या अर्थाने देशाच्या विकासात तरुणाईला सहभागी करुन घेण्याचे नियोजन केले जात आहे. अनेक बेरोजगार तरुणांना हि योजना वरदानच ठरणार आहे. त्यामुळे येत्या काळात जिल्ह्यात मुद्रा योजना नक्कीच व्यापक स्वरुप धारण करेल असा विश्वास वाटतो.

- मंगेश विठठल कोळी.
(9028713820)
- जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर

No comments:

Post a Comment