माझा मुंबई मधील पहिला
दिवस. जयसिंगपूरमधून आरामदायी खासगी बसने प्रवास सुरु झाला. बस हळूहळू मुंबईच्या
दिशेने पुढे जात होती सांगली-कराड-सातारा-पुणे-मुंबई असा प्रवास करीत मुंबईमध्ये
पोहोचलो. पहाटेच्या साडेपाच वाजले होते गाढ साखर झोपेत असतानाच बसमधील एक मुलगा
ओरडला चला व्हीटी कोण आहे त्यांनी येथे उतरायचं आहे. मला दचकल्यासारखे झाले अचानक
गाढ झोपेतून उठलो. सर्व समान एकत्रित केले आणि बसमधून खाली उतरलो.
मुंबईमध्ये पहिले पावूल
टाकले. थोडस पुढे चालत गेल्यानंतर एका व्यक्तीला विचारले मंत्रालायला जवळील आमदार
निवासकडे जाण्याचा मार्ग कोणता आहे? त्यावर तो व्यक्ती म्हणाला इकडून खूप दूर आहे
आणि माझ्याकडील सामानाचे ओझे पाहून त्यांनी मला टॅक्सी करून जाण्याचा सल्ला
त्यांनी दिला. मग मी टॅक्सी शोधण्याचा प्रयत्न करू लागलो टॅक्सी मिळण्याचे ठिकाण
सापडले. परंतु एवढ्या सकाळी टॅक्सी साठी एका मागून एक असे जवळपास दहा ते पंधराजण
एका रांगेत उभे असल्याचे दिसून आले मी एका व्यक्तीला विचारले टॅक्सी येथेच मिळेल
का? तेंव्हा ते म्हणाले हो रंग त्यासाठीच आहे. तेंव्हा मला मुंबईतील पहिल्या
रांगेचा अनुभव आला.
टॅक्सीने आमदार निवास जवळ
पोहोचलो तेंव्हा पासेस दाखविण्यासाठी तिकडे हि एक रंग होती. रूममध्ये गेलो फ्रेश
झालो, मुंबई पाहण्यासाठी बाहेर पडलो. बसचे तिकीट काढले परंतु बसमध्ये प्रवेश
करण्यासाठी सुद्धा एका रांगेतूनच जावे लागले. त्यानंतर मी दिवसभरामध्ये बऱ्याच
ठिकाणी फिरलो सर्वत्र रांगच रांग असल्याचा अनुभव मिळाला.
आज मुंबईत येऊन तीन महिने
पूर्ण झाले. मला या तीन महिन्यामध्ये अनेक ठिकाणी फिरण्याचे / जाण्याचे प्रसंग आले
मी ज्या ज्या ठिकाणी गेलो तिकडे मुंबईतील शिस्तीचा म्हणजेच रांगेचा अनुभव आला.
सकाळी बसमधून प्रवासाबरोबर या रांगेची झालेली सुरुवात हि हळू हळू पुढे जात सकाळच्या
नाष्ट्यापासून ते दुपारच्या जेवणापर्यंत आणि सायंकाळी ऑफिस सुटल्यानंतर घरी पोहोचे
पर्यंत सर्वच ठिकाणी रांगेतील मुंबईचा वेळोवेळी अनुभव येतो.
असे म्हटले जाते कि, “कोणत्याही
शहराची ओळख हि त्या शहराच्या शिस्तबद्ध वागणुकीमुळे समजते” याचा प्रत्यक्ष अनुभव
मी दररोज घेत होतो. आज ऑफिसला जाण्यास बाहेर पडलो चर्चगेट स्टेशन मधून बाहेर
पडून रस्ता पार केला. तिकडे हि भली मोठी रांग मला पहावयास मिळाली मी ऐका व्यक्तीला
विचारले कशासाठी हि रांग आहे तेंव्हा ते म्हणाले कि आम्ही सर्वजण ऑफिसला
जाण्यासाठी टॅक्सीची वाट पाहत आहोत आणि प्रत्येक टॅक्सीमध्ये फक्त ४ व्यक्तीच
जातात त्यामुळे हि रांग आणखीनच मोठी झाली आहे.
आज मला आणखीन एका रांगेचा
अनुभव आला. खूप वर्षापासून ऐकले होते कि मुंबई हे खूप धावपळीचे आणि धकाधकीचे शहर
आहे इथे जी व्यक्ती व्यवस्थित राहते ती जगाच्या पाठीवर कोणत्याही ठिकाणी स्वतःचे
अस्तित्व टिकवून ठेवते. मुंबई या महानगरीला माझा मनाचा सलाम.......