Monday, May 27, 2019

'वन मिनिट प्रिंसिपल'


'वन मिनिट प्रिंसिपल'
दहा दिवस हा प्रयोग सगळयांनी मिळून करायचा आहे. एखादी चांगली सवय जी आपल्याला असायला हवी असं मनापासून वाटतंय पण जमतच नाही, कळतंय पण वळत नाही असं वाटतंय. अशी एकच एक सवय, चांगली गोष्ट निवडा. या सवयीचा अक्षरशः लहानसा भाग ठरवा. लहान किती तर अक्षरशः काहीतरीच काय, फक्त ईतकंच असं वाटेल, बालिशपणा वाटेल इतका लहान भाग.
1. रोज एका पुस्तकाचं एकच पान.
2. रोज एकच सुर्यनमस्कार.
3. रोज एक योगासन.
4. रोज पाच मिनिट मेडिटेशन.
5. रोज दोन स्पेलिंग पाठ करणे.
6. रोज चांगल्या अक्षरात दोन ओळी लिहिणे. 
असच.. कितीही ... काहीही..
या अक्षरशः एका मिनिटाच्या व्रताने पुढे काय बदल होऊ शकेल हे प्रत्यक्ष अनुभवानेच समजून घ्या. 
कोण कोण एक मिनिटाच्या सवयीत भाग घेतंय? त्यांनी कमेंट जरुर करा. रोज दिवसभरात कधीही एकदा तो एक मिनिट ते ठरवलेलं काम करायचंय.
21 दिवसात साधारण सवय लागते... त्यामुळे संकल्प 21 दिवसांचाच करा. 
काय आहे वन मिनिट प्रिसिंपल?
Kaizen 
जपान मध्ये kaizenचा शोध लागला आणि मानवी आयुष्याला जबरदस्त कलाटणी मिळाली. Kai म्हणजे बदल आणि झेन म्हणजे शहाणपणा.
 (Change +Wisdom).
आयुष्याला आकार देणा-या या जादूच्या तंत्राचा उपयोग करून आपण आपले जगणे आणखी सोपे आणि सहज करू शकतो. वेळेच्या नियोजनात आजवर शिकलेल्या सर्व युक्त्यांपेक्षा अतिशय सोपी युक्ती म्हणजे, ‘वन मिनिट प्रिन्सिपल
Masaaki Imai यांनी 'वन मिनिट प्रिन्सिपलचा शोध लावला आणि आज जपान या तंत्राचा अवलंब करत यशाची शिखरेगाठणारा देश ठरलेला आहे. आपण वेळेच्या नियोजनात अपयशी ठरतो त्याचे कारण सातत्य ठेवण्यात कमी पडतो. त्यामुळे अपराधी भाव येतो तो वाढत वाढत आत्मग्लानीचं रूप घेतो, आपण काही करू शकत नाही आपल्यात जिद्द नाही, आपण एखादे काम करण्यास लायक नाही अशी नकारात्मकता आपल्याला ग्रासून टाकते. अशा वेळी एखाद्या जादूसारखी ती टेक्निक काम करते. मला एका मिनिटात वेळेचे नियोजन शिकवा म्हटले तर मी हा नियम शिकवेन. काय आहे सूत्र? तर सवयी किंवा आयुष्यातला बदल हा अचानक होत नसून तो सावकाश पण नियोजनपूर्वक शहाणपणाने करायला हवा, सातत्य आणि सराव यासाठी नियमित योजना असते. आत्मविश्वास देणारा हा नियम म्हणजे 60 सेकंद दररोज एखाद्या ध्येयासाठी वापरा. आपल्याला हसू येईल, विश्वास बसणार नाही पण दररोज एक मिनिट हा चमत्कारासारखे रिझल्ट देतो. काय आहे नियम तर...
Every day 
At the same time 
Just for a minute 
दररोज ठराविक वेळी फक्त एक मिनिट कोणतेही ध्येयाशी संबंधित एखादे काम पूर्ण करायचे असेल तर व्रत घेतल्यासारखे ते करायचे हे यशाचे सूत्र आपण जाणतो. पण त्यासाठी एकदम दोन तास, एक तास अशा तासांच्या भाषेत हट्टीपणा करतो आणि मन बंड पुकारते कधीकधी परिस्थितीची साथ नसते. अशा वेळी एक मिनिट फक्त एक मिनिट करायचे आहे हे ठरवताच हसत हसत आपण तयार होतो. मनाची साथ मिळते आणि तेवढा वेळ सहज काढू शकू असा आत्मविश्वास तयार होतो. आता कामाला कृतीला सुरुवात करायची. एक मिनिट काम करायचे आणि अक्षरश: बाजूला ठेवून द्यायचे. दुस-या दिवशी परत तेच. गंजलेल्या चाकाला रोज एकदा फिरवायचे, बंद पडलेल्या गाडीला रोज एकदा फक्त सुरु करायची, रोज एक पान वाचायचे, रोज पाच ओळी लिहायच्या, रोज एक श्लोक वाचायचा, रोज एक काहीही छोटेसे..
जमेल? सोप्पय हो नक्कीच!
एकदा मोमेंटम गती मिळाली की ते काम झपाट्याने पूर्ण होईल. हा प्रयोग करून तर पहा, अनुभव घ्या. मी तेच करत आहे, वेळेच्या नियोजनावर रोज थोडसं वाचायचं आणि थोडंसं लिहायचं... हाच माझा नियम, आणि आपला कोणता नियम जरूर कळवा खालील नंबरवर...
- मंगेश विठ्ठल कोळी. मो.- 9028713820
(वरील पोस्ट मी लिहिलेली नाही, पोस्ट प्रेरणादायी आहे. म्हणून आपल्याला पाठवत आहे.)

6 comments: