आपण जिंकणारच आहोत. आपण
कोल्हापूरी आहोत,
आपण नेहमीच लढलो आहोत आणि विपरीत परिस्थितीवर मात करत आलेले आहोत,
आपण नेहमीच जात-पात-धर्म या पलीकडे जाऊन एकमेकांना मदत केलेली आहे.
आपण चांगल्या गोष्टींना नेहमीच डोक्यावर घेतलेले आहे..! गेल्या वर्षी आलेल्या
महापूर संकटामधून सावरत असतानाच हे आणखी एक संकट आले आहे. पण घाबरायचं नाही..
लढायचं आहे.
सध्याच्या परिस्थितीत अनेक
लोक,
अनेक प्रकारे भडक भाषा वापरून आपल्याला भीती घालतील, सध्या सर्वत्र एक गोष्ट नको तितकी आणि वारंवार दाखवली जाते आहे ती म्हणजे,
कोरोना नंतर येणारी संभाव्य आर्थिक मंदी..! ही भीती वरवर पाहता खरी वाटत
असली तरी काही गोष्टी निश्चित पणे विचारात घ्याव्या लागतील. मी कुणी अर्थतज्ज्ञ
नव्हे तर एक सामान्य कोल्हापूरकर आहे. आणि मला नेहमीच सकारात्मक विचार करायला
आवडतं.
याबतीत मला जे वाटतं ते मी
इथे सांगणार आहे,
अनेकांना ते कदाचित पटणार नाही. पण याबाबतीत कुणी वाद घालू नयेत,
कारण ही वेळ वाद घालण्याची नव्हे तर आपण या विपरीत परिस्थितवर कशी
मात करायची आहे याबाबत उपाय करण्याची आहे.
भारत एक शेतीप्रधान देश आहे, म्हणजे आपली अर्थव्यवस्था सुरुवातीपासूनच बऱ्याच अंशी शेतीवर अवलंबून आहे.
कोरोना संकट गेल्यावर शेतीवर याचा विपरीत असा परिणाम होणार नाही. शेती मधून १२
महिने पिकं घेतली जातात आणि त्याचे सुयोग्य व्यवस्थापन केले जाते शेतीचे एक
अर्थचक्र आहे जे नेहमीच फिरत असते. हा पॅराग्राफ लिहिताना, आताच
टीव्ही वर बातमी पाहिली की शेतकरी आणि शेतमजूर यांना लोकडाऊन मधून वगळण्यात आलेले
आहे (ABP न्यूज मराठी) त्यामुळे शेतीमधून जे अर्थकारण फिरते
आहे त्यावर नकारात्मक परिणाम नक्कीच होणार नाही.
सरकारी-निम सरकारी कर्मचारी
यांच्यावर देखील या संकटाचा विपरीत परिणाम होणार नाही. हो, अवेळी पगार हा एक तात्पुरता परिणाम जाणवू शकेल. राहिला प्रश्न खाजगी नोकरी, छोटे-मोठे उद्योग करणारे लोक, कारखानदार, हॉटेल्स, पर्यटन व्यवसायाशी संबंधित व्यावसायिक
इत्यादी.
यामध्ये रिझर्व्ह बँकेने
केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून बँकांनी आपल्या कर्जदारांना तीन मासिक हप्ते
जूनपासून भरण्याची मूभा दिलेली आहे. म्हणजे इकडे देखील एक सपोर्ट मिळाला.
परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर कदाचित हा सपोर्ट वाढवला जाण्याची विनंती केली
जाऊ शकते. छोट्या-मोठ्या उद्योग धंद्यांना पॅकेज देण्याची आग्रही मागणी होऊ
लागलेली आहे. आणि ही मागणी मान्य झाली तर तिकडे देखील एक सपोर्ट मिळेल.
उद्योजकांना मोठी झळ न बसता त्यांच्याकडे काम करणाऱ्या अनेक लोकांच्या नोकऱ्या
वाचतील.
पर्यटन व्यवसायावर याचा
दूरगामी परिणाम होऊ शकेल पण भारतात जर लवकर परिस्थिती आटोक्यात आली तर देशांतर्गत
पर्यटन वाढू शकेल,
आणि त्याचा परिणाम हा नक्कीच चांगला असेल कारण आपला पैसा आपल्याच
देशात असेल.
यापुढे भारत हा अनेक बाबतीत
एक प्रमुख निर्यातदार देश म्हणून उदयास येईल. आताच आपण हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन
अमेरिकेसह प्रगत देशांना निर्यात केले.
नुकतेच अनेक आंतरराष्ट्रीय
मोठ्या कंपन्या चीन सोडून भारतात येण्याचे संकेत देत आहेत..!
शिवाय आपण आपल्या भारतीय
संस्कृती प्रमाणे आत्ता आज देखील एकमेकांना शक्य तितकी मदत करत आहोतच जे इतर
देशांत अपवादाने पहायला मिळते. हा आपला सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे.
अनेक सेलिब्रिटीच नव्हे तर
अनेक सामाजिक संस्था,
सामान्य लोक या संकट काळात प्रचंड मदत करतायत. आपण सर्वांनी केलेली
थोडीफार आणि यथाशक्ती बचत ही आज कामाला येते आहे. पाश्चात्य देशात आणि आपल्यात हा
देखील एक मोठा फरक आहे. तिकडे लोक पैसे साठवून ठेवत नाहीत. एकमेकांना मदत करणे /
शेजार धर्म हे अपवादात्मक आहे. त्यांची खाण्या-पिण्याची पद्धत आपल्यापेक्षा खूप
वेगळी आहे. प्रतिकारशक्ती आपल्यापेक्षा खूपच कमी आहे म्हणून इतके नकारात्मक परिणाम
तिकडे दिसतायत.
आपली प्रतिकारशक्ती, आपली माणुसकी, शेतीप्रधान अर्थव्यवस्था, मदत करण्याची प्रवृत्ती, लोकशाही, खाण्या-पिण्याच्या सवयी, बचतीची सवय या सगळ्या
गोष्टी आपल्या पथ्यावर पडणार आहेत. त्यामुळे घाबरून जाऊ नका. लढण्याची तयारी
ठेवावी, नकारात्मक लेख, बातम्या याकडे
फारसे गांभीर्याने पाहू नका. स्वतःवर विश्वास ठेवा. अशी लै वादळं आल्यात आणि
गेल्यात, भ्याचं न्हाई, आपण
जिंकणारच..!
आपला फोकस हा नेहमी
सोल्युशन्स कडे असावा,
प्रॉब्लेमकडे नव्हे..! आपण नेमकं उलट करतो आणि आयुष्यात दुःखी
होतो..!
आणि सर्वात महत्वाचे.. या
काळात प्रशासन,
पोलिस दल, डॉक्टर्स, आरोग्य
सेवक, महानगरपालिका कर्मचारी, प्रशासक
आणि आपल्यासाठी जीवाची बाजी लावून जे जे लोक लढतायत
त्यांना १००% सहकार्य करणे हाच आपला आजचा माणुसकीचा धर्म आहे. जर हे केलेत तर आपण
लवकरच या मधून बाहेर येऊन आपलं रुटीन सुरू करू शकू..!
तेव्हा पुन्हा सांगतो, कोरोना नंतर येणाऱ्या आर्थिक मंदीचा बाऊ करून त्याकडे लक्ष वेधलं जातंय
आपलं, फेकून द्या ते निगेटिव्ह विचार, लढायचं
पण जिंकण्यासाठीच..! प्रत्येकाने ठरवा.. 'मी जिंकणारच'
(हा लेख माझा नाही, लेखातून
सकारात्मक ऊर्जा मिळेल असे वाटते म्हणून सर्वांना पाठवत आहे.)
-
मंगेश विठ्ठल कोळी.
-
मो. ९०२८७१३८२०
-
ईमेल mangeshvkoli@gmail.com
(Mangesh
Koli) माझे असे प्रेरणादायी विचार मिळविण्यासाठी व्हॉटसअॅप, फेसबुक, ट्विटर, ब्लॉग, टेलिग्राम, इन्स्टाग्राम चॅनेलवर फॉलो करू शकता.
होय नक्कीच सकारात्मक विचारच जगण्याला बळ देत असते. छान विचार आहेत आपले
ReplyDeleteविचार चांगला. पण फक्त कोल्हापूर का?
ReplyDeleteसुहास देशमुख, खोपोली.
सकारात्मक विचार
ReplyDelete