काल १ एप्रिल २०१७ रोजी सकाळी मी जवळपास ४
हजार व्यक्तींना एक मेसेज पाठवला होता. तो असा कि, “आज प्रत्येकाने स्वत: बद्दलचा
एक सकारात्मक (Positive) विचार
मला (९०२८७१३८२०) पाठवा.” रात्री पर्यंत त्या ४ हजार व्यक्तींपैकी बोटावर मोजण्या
इतपत व्यक्तींनी मला त्यांच्या बद्दलचा सकारात्मक विचार पाठविला. ज्या व्यक्तींनी
मला सकारात्मक विचार पाठविले त्यांचे मी मन:पूर्वक अभिनंदन करतो.
ज्या व्यक्तींनी मला स्वत: बद्दलचा
सकारात्मक विचार पाठविले त्यातील काही मोजके विचार अनेकांचे विचार बदलण्यास नक्कीच
मदत करतील. असे म्हणतात कि, आपण असे विचार मांडले पाहिजेत कि आपला विचार वाचून
समोरच्याने नक्कीच विचार केला पाहिजे. या प्रमाणे पुढील काही विचार मी आपणा पुढे
मांडत आहे.
१) Positive
is my strength.
२) मला नेहमी माझ्या
आवडीचे काम करताना उत्साह, आनंद जाणवतो, प्रत्येक घटनेतील सकारात्मकता शोधायला
आवडते.
३) एखाद्या गोष्टीमध्ये
यश मिळत नसेल तर दुसऱ्या मार्गाने प्रयत्न करा यश नक्की मिळेल.
४) माझं माझ्यावर खूप
प्रेम आहे.
५) चेहऱ्यावर हास्य
ठेवायचे जेणे करून समोरच्याला पान आनंद वाटायला हवे, समोरच्याची चांगली गोष्ट
पाहणे.
६) १०० present I will become a class one
officer.
वरील विचार वाचले ज्या व्यक्तींनी मला
स्वत: सकारात्मक विचार पाठविले ते स्वत: बद्दल खूपच जागरूक आहेत असे दिसते. ज्या
व्यक्तींनी विचार नाही पाठवले त्याची हि वेगवेगळी करणे असू शकतील त्यातील काही
करणे म्हणजे सर्वात पहिले कारण इगो (EGO) असू शकते म्हणजे हा कोण
आहे कि सर्वाना सकारात्मक विचार पाठवा म्हणून सांगणारा? आणि दुसरे म्हणजे काही
व्यक्तींनी टाळाटाळ केली असेल, काहीना ते एवढे आवश्यक वाटले नाही.
काल दिवसभरामध्ये
अनेक व्यक्तींनी मला नको असलेले किंवा फालतू जोक पाठविले. कोणी कोणी तर एप्रिल
फुलचे इतरांनी पाठविलेले मेसेज न वाचताच पाठवत होते. मी कोणी मोठा व्यक्ती नाही
किंवा मी म्हणालो म्हणून तुम्ही मला विचार पाठवलेच पाहिजेत असा आग्रह देखील केलेला
नाही फक्त मला हे जाणवून द्यायचे होते कि या व्यस्त आणि धकाधकीच्या वेळेत स्वत:ला
हरवत चाललो आहेत याची कल्पना असू द्या.
आपण दिलेल्या
सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद.....
-
मंगेश विठ्ठल कोळी.
९०२८७१३८२०
No comments:
Post a Comment