जगातील
गतिमान शहरातील एक शहर म्हणून मुंबई ओळखले जाते. गेली तीन महिने झाले त्याचा अनुभव
मी घेत आहे. तुम्ही एकदा मुंबईमध्ये म्हणजेच स्वत:ला स्वत:च्या कामामध्ये व्यस्त
करून घेतले कि, मग नवीन काही करण्याची इच्छा मरण पावल्यासारखी अवस्था होते. माझीही
अवस्था तशीच झाली होती. मी दररोज ठरवत होतो कि, आज काही तरी नवीन करायचे परंतु या
व्यस्त करून घेतलेल्या जीवनात मी स्वत:ला हरवत चालल्याची चिंता मला सतावत होती. आज
ठरविले कि, काहीतरी नवीन करायचे पण नक्की काय करायचे हे मला स्वत: देखील माहित
नव्हते. आठवड्याचे दररोजचे रुटीन वर्क सुरु होते. मी हि त्या रुटीन वर्कमध्ये खूप
व्यस्त झालो होतो. आज ऑफिसच काम लवकर आटपल. घरी जाण्यासाठी ही खूप वेळ होता. ऑफिसमध्ये
विचारले मंत्रायालच्या जवळपास काही पाहण्यासारखे आहे का? असा प्रश्न विचारताच अनेकांनी
मरीन ड्राइवला जा असे सांगितले.
मंत्रालयाच्या
बाजूला असणाऱ्या मरीन ड्राइवला गेलो. यापूर्वी अनेकांच्याकडून मरीन ड्राइव बदल
त्यांची मते ऐकली होती. त्यापैकी अनेकांची मते ही मरीन ड्राइवला बदनाम करणारी होती.
त्यांच्या मते मरीन ड्राइवला फिरायला जाणारे म्हणजे फक्त प्रेमवीरच असतात किंवा
ज्यांना काही काम नसते ते लोक तिकडे जातात. परंतु मी जेंव्हा मरीन ड्राइववर पहिले
पाऊल टाकले तेंव्हा मात्र वेगळाच अनुभव आला. अनेकांच्या बोलण्यातून, ऐकण्यातून आणि
वर्णनातून मला माहित झालेला मरीन ड्राइव आणि माझ्या नजरेसमोर प्रत्यक्ष असणारा
मरीन ड्राइव हा मात्र निराळाच होता. अथांग असा निळाभोर समुद्र आणि त्याच्याकडेने
अर्ध गोलाकार दिसणारा नयनरम्य असा विशाल मरीन ड्राइव मी पाहत होतो.
मरीन
ड्राइव वरती मी समुद्राच्या दिशेने तोंड करून निवांत बसलो होतो. खूप छान आणि थंड वाऱ्याचा
अनुभव घेत होतो. या उन्हाळ्यात शरीराला सुखावणारा वारा स्पर्श करून जात होता, असा
अनुभव माझ्या जीवनात पहिल्यांदाच घडत होता. काही वेळ तिकडे बसलो, हळूहळू सूर्य
मावळतीला जात होता तसतशी तिकडे माणसांची वर्दळ वाढत होती. अनेक युवक-युवती, त्याच
प्रमाणे ऑफिसमधून कंटाळा घालविण्यासाठी येणारे लोक देखील होते. आपल्या कुटुंबासह
फिरायला येणाऱ्या व्यक्तींचीही मोठी संख्या होती. लहान मुले मनसोक्त धावत होती
एकमेकाचा पाठलाग करत होती, आणि मोठ मोठ्याने हसत होती. त्याच वेळी तिकडून एक खूप
उंच जवळपास सात-साडेसात फुट उंची असलेला व्यक्ती पायी चालत जात होता. अनेकजण
त्याच्या बरोबरचे अविस्मरणीय क्षण आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढून घेत होते.
मुंबई
सारख्या वर्दळीच्या ठिकाणी राहणे खूप कठीण आहे. त्यातूनही आनंद लुटण्यासाठी आणि
मनसोक्त गप्पा करण्यासाठी अनेक जण तिकडे आले होते. अनेकजणांचे चेहरे हसरे होते, तर
कोठे तरी डोळ्यात पाणी तरळताना दिसले. अनेक जण स्वत:च्या शरीर निरोगी राहण्यासाठी
इव्हिनिंग वॉकसाठी आले होते तर काहीजण धावत देखील होते. मरीन ड्राइव एक असला तरी
आपण त्याचा उपयोग कशा पद्धतीने करायचा हे स्वत:वर अवलंबून असते. असे आहे कि, “समुद्र
एकच असतो काहीजण दुरून पाहण्यात आनंद घेतात, काहीजण जवळ जाऊन पाय ओले करून आनंद
घेतात तर काहीजण त्यात मनसोक्त पोहून त्यातील मोती वेचतात. त्याच पद्धतीने मरीन
ड्राइव सुद्धा आहे, त्याच्यापासून आपण काय घ्याचे ते स्वत: ठरवा. उगाचच बदनामीचे
बोल लाऊन त्याचे सौंदर्य खराब करू नका अशी माझी कळकळीची विनंती आहे.
मंगेश
विठ्ठल कोळी.
मो.-
९०२८७१३८२०
very nice mangesh
ReplyDelete