सर्व प्रगतीचा मूळ पाया म्हणजे कृषी आहे. महाराष्ट्र राज्याला
विविध प्रकारची मृदा लाभली आहे. त्याचा परिणाम हा
कृषी क्षेत्रावर होताना आपण पाहत आहे. काही किलोमीटर अंतरावर वेगवेगळ्या
प्रकारच्या पिकांचे उत्पन्न घेतले जाते. कृषी क्षेत्र सर्वच मर्यादा ओलांडताना
दिसत आहे नवनवीन तंत्रज्ञानाचा फायदा मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो. आज कृषी
क्षेत्र फक्त उत्पन्नाचे नाहीतर पर्यटनाचे महत्वपूर्ण क्षेत्र म्हणून पहिले जाते.
उन्हाळ्याच्या सुट्टीत सर्वजण शेतात जाऊन एकत्र काम करून एकत्र स्नेह भोजनाचा
आनंदात लुटताना दिसतात. एक पिकनिक पॉईंट म्हणून आज कृषी क्षेत्राकडे पाहिले जात
आहे. 16 मे हा दिवस कृषी पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो.
या दिवशी आवर्जून प्रत्येक जण शेतात जाऊन पर्यटनाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतो.
कृषी पर्यटन म्हणजे शेतावरील फेरफटका,
आपल्या संस्कृतीची ओळख, आनंद. शहरी जीवनशैलीचा
उबग आलेल्या लोकांनी चार दिवस शेतकर्याच्या शेतावर जाऊन राहणे व शेतकर्याने शहरी
लोकांचा सशुल्क पाहुणचार, आदरातिथ्य करणे म्हणजे कृषी पर्यटन.
कृषी पर्यटन हा पर्यटनाचा नवीन चेहरा. कृषी पर्यटनातून ग्रामीण विकास आणि ग्रामीण
विकासातून महाराष्ट्राचा विकास या ब्रीद वाक्याला साजेसे कृषी पर्यटन. शेती
व्यवसाला जोड व्यवसायाची साथ देऊन उत्पादनांत भर घालता येणारा प्रकल्प म्हणजे 'कृषी पर्यटन'. असे महाराष्ट्र कृषी पर्यटन विभागाने सांगितले आहे.
महाराष्ट्रात कृषी पर्यटनाची सुरूवात करणारे व यशस्वी कृषी पर्यटन
राबवणारे शेतकरी एकत्र आले. फक्त काही जणांनी हा व्यवसाय करण्यापेक्षा
महाराष्ट्रातील सर्व विभागातील शेतकर्यानी हा व्यवसाय करावा हा विचार मांडला गेला
व याकरिता व्यासपिठाची स्थापना करण्यात आली. 12 डिसेंबर
2008 रोजी विद्या प्रतिष्ठान, बारामती
येथे 'महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघ मर्यादित (मार्ट)'
या संस्थेची स्थापना करण्यात आली. ऑस्ट्रेलीयासारख्या विकसित
देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया कृषी पर्यटन आहे. त्यामुळे कृषी पर्यटनाचे महत्व
लक्षात घेऊन महाराष्ट्रातील विविध भागांत काही कार्यकर्ते व शेतकरी प्रयत्नशील
आहेत. ज्या गावात कृषी पर्यटन केंद्रे सुरू झाली, त्या
परिसरातील अनेक स्थानिक उद्योगांना चालना मिळत आहे.
कृषी पर्यटन ही आनंददायी, शिक्षणासाठी किंवा शेती किंवा ऑपरेशनच्या कार्यात सक्रिय
सहभागाने काम करणा-या शेती किंवा कोणत्याही शेती, बागायती,
किंवा शेती व्यवसाय चालवण्यासाठी जाण्याची सुट्ट्यांची संकल्पना
आहे. कृषी पर्यटन
संकल्पना सार्वजनिक खाजगी भागीदारीवर आधारित शेतकरी / कृषि पर्यटन सेवा प्रदाते,
खाजगी क्षेत्रातील गुंतवणूकीचा विचार करते. कृषी पर्यटन
सेवा प्रदाता भेटी आणि पर्यटकांना मार्गदर्शक आणि मार्गदर्शिका म्हणून कार्य
करतात. आगरी पर्यटन केंद्रात पर्यटकांच्या सोयीसाठी
आधुनिक सुविधांसह स्वच्छ, आरोग्यदायी वातावरण आहे. ज्या शेताला शेतीची जमीन संलग्न
आहे त्यास प्राधान्य दिले जाते. कृषी पर्यटन सेवा पुरवठादाराने घरगुती शिजवलेले अन्न, सोय सुविधा उपलब्ध करून देणे आणि फुलझाड, कापणी,
मधमाशी पाळणे, दुग्धजन्य इत्यादिसारख्या
शेतीविषयक प्रथा दर्शविल्या पाहिजेत आणि विविध सहभाग्यात्मक कृतींमार्फत त्याला
ग्रामीण जीवनाचा परिचय करून दिला जातो.
पर्यटकांना स्वच्छ आणि ताज्या हवेचा नैसर्गिक परिसरात आनंद घेता
येतो. पर्यटकांना स्थानिक समाजाची जीवनशैली पाहायला मिळते ज्याचा
अर्थ म्हणजे एका पंचायत बैठकीत सहभागी होणे, स्थानिक गाणी,
अन्न, नृत्य, कला आणि
हस्तकला यांचे प्रदर्शन.
गावाचा दौरा म्हणजे कारागीर, लोहार तसेच बारा बलुतेदार इ. सारख्या स्थानिक कारागीरांना
भेट देणे. पर्यटकांना सणासुदीच्या दिवसाचा अनुभव मिळतो जसे विवाह आणि स्थानिक मेळा.
कुस्ती, गलीदांडा,
पतंग यासारख्या गावातील खेळांत सहभागी होणे, जसे की गवत वर उडी
मारणे आणि नलिकामध्ये स्नान करणे असे अनुभव घेऊ शकतात किंवा बैलगाडी, ट्रॅक्टर इत्यादीवरून प्रवास करतात. शहरी क्षेत्रातील महत्त्वाचे स्मारके, ऐतिहासिक स्थळे इत्यादीसह या भागात आयोजित होणारे महत्त्वाचे मेळावे आणि
महोत्सव देखील ते पाहू शकतात. कृषी पर्यटनातील काही महत्वाची केंद्रे पुढे दिली
आहेत.
१) रामकृष्ण
विसावा कृषी पर्यटन केंद्र
मु.पो.कोडोली,चिकुर्डे वारणा
नगर रस्ता, ता.पन्हाळा, जि.कोल्हापूर.
२) एम. एम.
जी. कृषी पर्यटन केंद्र
मु. पो. शेंदुर ता. कागल,जि. कोल्हापूर.
३) आनंदवन
कृषी पर्यटन केंद्र
मु. पो.पडवळवाडी, ता. करवीर,
जि. कोल्हापूर.
४) सह्याद्री
कृषी आरोग्य पर्यटन केंद्र
मु. पो.सावर्डे खुर्द, ता. कागल,
जि. कोल्हापूर-416219.
५) कल्पवृक्ष
कृषी पर्यटन केंद्र
कल्पवृक्ष, पाम हाऊस,
योगिकोला रोड, गोकाक, जि.
बेळगांव,591307-कर्नाटक.
महाराष्ट्र
राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघ मर्यादित (मार्ट)
434 अनुश्री हाईटस,
पहिला मजला, तहसीलदार कचेरीसमोर, शुक्रवार पेठ, पुणे 2. फोन: 020-24489214,
020-65250509 वेबसाइट : www.martindia.org
जागतिक कृषी
पर्यटन दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेछ्या......
- मंगेश
विठ्ठल कोळी.
मो.९०२८७१३८२०
No comments:
Post a Comment