आज
सर्वच
स्तरावर
आपणाला
एक
गोष्ट
नक्कीच
पहावयास
मिळते
ती
म्हणजे
चांगली
पर्सनॅलिटी
असेल
तरच
प्रगती
होते
अन्यथा
होत
नाही.
आपण
दिवसातून
किमान
एकदा
तरी
वाचतो
किंवा
कोणाकडून
तरी
एकायला
मिळते.
अनेक
तरूण-तरूणी
ही
चांगली
पर्सनॅलिटी
मिळविण्याच्या मागे
धावताना
दिसत
आहेत.
काही
तरूण-तरूणींना
तर
चांगली
पर्सनॅलिटी
म्हणजे
नक्की
काय
हे
सुद्धा
माहीत
नाही.
चांगले
आणि
महागडे
कपडे
परिधान
करणे
किंवा
महागड्या
किंमतीच्या
वस्तू
स्वत:
जवळ
बाळगणे,
म्हणजे
उत्तम
पर्सनॅलिटी
असा
गैर
समजात
जीवन
जगत
असतात.
काही
तरूण-तरूणींना
गावात
राहण्यापेक्षा शहरात
राहणे
म्हणजे
उच्चतेचे
वाटते.
परंतु
खरी
गरज
काय,
आवश्यक
असणारे,
उपयोगी
असणारे
आणि
मानवाच्या
गरजा
पूर्ण
करणारी
साधणे
स्वत:
जवळ
असणे.
ही
खरी
अत्यावश्यक
किंवा
व्यक्तिमत्व
विकास
होण्यास
महत्वपूर्ण
गोष्ट
आहे
हे
समजून
घ्यायला
हवे.
भारतीय
संस्कृती
ही
संपूर्ण
एक
प्रेरक
शक्ती
म्हणून
त्याच्याकडे
पाहिले
जाते.
याचे
कारण
सर्वांना
माहीत
असे
देशामध्ये
तरूणांची
संख्या
मोठ्या
प्रमाणावर
आहे.
आतापर्यंतच्या इतिहासामध्ये
पाहिले
तर
एक
गोष्ट
प्रर्कषाने
दिसून
येर्इल
की,
जगामध्ये
जे
मोठमोठ
कारणामे,
संशोधने
झाली
आहेत.
त्यामध्ये
अनेक
ठिकाणी
भारतीय
व्यक्तींचा
समावेश
महत्वपूर्ण
आहे.
अनेक
तरूण-तरूणींना
विचारले
की,
तुमचे
आयडल
कोण
आहेत
तर
विदेशातील
व्यक्तींची
नावे
सांगितली
जातात.
असे
कोणतेही
क्षेत्र
उरलेले
नाही
ज्यामध्ये
भारतीय
नाहीत
तरी
सुद्धा
असे
का
होत
आहे.
याचे
कारण
म्हणजे
आपण
स्वीकारत
असलेली
परदेशी
संस्कृती
होय.
काही
वर्षापूर्वीचा आपली
संस्कृती,
पोषाख
आठवला
आणि
आताचा
पोषाख
पाहिला
तर
खूप
मोठ्या
प्रमाणावर
तफावत
स्पष्टपणे
जाणवून
येर्इल.
त्याचे
दुषपरिणाम
सुद्धा
समाजामध्ये
पहावयास
मिळतात.
हे
कोठे
तरी
थांबले
पाहिजे
असे
नाही
का
वाटत?
बदल
हा
निसर्गाचा
नियम
आहे
त्याचा
योग्य
तो
अर्थ
मानवाने
घेतला
पाहिजे
दिवस
असो
किंवा
रात्र
असो
सर्व
पशु
पक्षी
निसर्गाच्या
नियमाप्रमाणे
वर्तन
करताना
पहावयास
मिळतात
परंतु
मानव
हा
एकमेव
प्राणी
असा
आहे
की,
निसर्गाच्या
विरोधात
जावून
जगण्याचा
प्रयत्न
करत
आहे.
नेहमी
पाण्याच्या
प्रवाहा
बरोबर
जर
पोहत
असू
तर
नक्कीच
योग्य
ध्येयापर्यंत
पोहचू
शकतो
त्याच्या
विरोधात
पोहण्याचा
प्रयत्न
करणे
म्हणजे
उलट्या
घागरीमध्ये
पाणी
भरण्याचा
प्रयत्न
होर्इल
यामुळे
मानवाची
प्रगती
होणार
नाही.
मानवाच्या
व्यक्तिमत्व
विकास
विनाशाचे
खूप
मोठे
कारण
आहे
हे
बदलून
येणा-या
नवीन
पिढीला
योग्यती
दिशा
दाखवली
पाहिजे.
-
मंगेश
विठ्ठल
कोळी.
मो.
9028713820
niCe article
ReplyDelete