दिनांक
१३ मे २०१७ रोजी मी “मोबाईल ही आजची गरज कि व्यसन???” या प्रश्नाला आपल्या
प्रतिक्रिया पाठवा” असा एक मेसेज पाठवला होता. गेले तीन दिवसामध्ये या प्रश्नाच्या
निमित्ताने अनेकांनी प्रतिक्रिया मला मिळाल्या. त्या सर्वांचे मी खूप खूप आभार
मानतो. काही व्यक्तींनी अगदी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या तर काहींनी अगदी विचार
करण्यास प्रवृत्त व्हावे अशा प्रतिक्रिया पाठविल्या आहेत. त्यातील काही मोजक्या प्रतिक्रिया.....
१) गरज आहे
पण अति तेथे माती होतेय काहींच्या बाबतीत.
२)
Necessity for professionals (Not for students upto u.g.) specifically smart
phones and addiction for those who use it aimlessly includes kids, most of them
do use it as a pastime activity for games and the increasing rate of viewing
pornographic sites (any age group and gender)
३) माझी
फक्त गरज आहे.
४) चांगल्या
कामासाठी मोबाईल आजची गरज आहे.
५) मोबाईल
हे एक प्रकारचे व्यसनच आहे. माणूस झोपेतून उठला की पहिला मोबाईल हातात घेतो. कोठेही
चारचौघात बोलत असलो तरी त्यातील बरेच जण मोबाईलवर चाटिंग करताना अथवा गेम खेळताना
दिसतील.
६) मोबाईल
आजची गरज आहे जर त्याचा योग्य वापर केला तर. पण त्याचा अतिरेक वापर केला तर त्याचे
व्यसनात परिवर्तन व्हायला वेळ लागणार नाही.
७) मोबाईल व्यसन
जास्त वाटते. त्याचा परिणाम हा नात्यावर जास्त होत आहे.
८) मोबाईलमुळे
आपल्या लोकांमधील संवाद तुटत चालला आहे.
९) आज काल
मुले मोबाईलपासून दूर राहू शकत नाही.
१०) मोबाईलचे
भरपूर फायदे ही आहेत आणि तोटे ही आहेत.
११) आवश्यक/तातडीच्या
कामासाठी तसेच माफक मनोरंजन आणि ज्ञानप्राप्तीसाठी जर आपण मोबाईलचा वापर करत असू
तर तो आजची सर्वाधिक महत्वाची गरज म्हणून आपल्या पुढे येईल. कारण मोबाईल स्मार्ट
झाल्यापासून “दुनिया मेरी जेब मे!” असं म्हणणे खऱ्या अर्थाने सार्थ झाले आहे. मोबाईलवर
चॅटिंग करण्याच्या नादात आपण आपली साधीसुधी माणुसकीची कर्तव्ये सुद्धा विसरत असू
वा टाळत असू तर पूर्वीचे बाईलवेडे आणि आताचे मोबाईलवेडे यांच्यात फारसा फरक करता
येणार नाही. अशावेळी अशा व्यसनी लोकांना जागे करणे ही प्रत्येकाची प्राथमिक
जबाबदारी ठरते.
वरील
प्रतिक्रिया खरच खूप विचार करण्यासारख्या आहेत. आज मोबाईल ही काळाची गरज सर्वजण
मान्य करत आहेत. परंतु वाढत्या मोबाईल वापरामुळे मानवाच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक क्षमता खालावत आहेत. त्याचा परिणाम
कौटुंबिक वातावरणावर होतो आहे. या अगोदर सर्व मोबाईल नंबर तोंड पाठ असायचे आता
हजारो नंबर मोबाईलमध्ये असून मोजकेच नंबर आपल्या लक्षात असतात. मानवाला आता मोबाईलची
एवढी सवय झाली आहे की एका मिनिटातील ३७ सेकंद लक्ष हे मोबाईलकडे असल्याचे एका संशोधनात
स्पष्ट झाले आहे. किती वाजले आहेत असा कोणी प्रश्न केला तर लगेच मोबाईलच्या
स्क्रीनकडे नजर वळली जाते.
सर्व
प्रतिक्रिया वाचल्या आणि दुसऱ्या दिवशीच मातृदिन होता. मध्यरात्री बारा वाजलेपासून
अनेकांचे मातृप्रेम दिसू लागले. सकाळ पर्यंत मोबाईलवर जवळपास पाचशे मेसेजेस आले
होते त्यातील सर्वाधिक मेसेज हे मातृदिनाचे होते. नंतर फेसबुक उघडले तर त्यावर
सुद्धा अनेकांचे मातृप्रेम दिसून आले. आज त्यानिमित्ताने का होईना मातेचे स्मरण
केले जाते. माता ही जीवनातील पहिली गुरु मानली जाते. आता मोबाईल हा पहिला गुरु
असणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र पहावयास मिळते. संपूर्ण
दिवसभर मातृदिनाच्या शुभेछ्या, कविता, चारोळ्या, लघू लेख, वाचावयास मिळत होते.
काहींजण स्वतःच्या मातेसोबत सेल्फी काढून सर्वत्र प्रसार आणि प्रचार करत होते.
त्या पाठीमागील त्यांच्या भावना चांगल्या होत्या. परंतु या भावना मातृदिन या एकाच
दिवशी प्रेम व्यक्त करण्यापर्यंत मर्यादित राहते आहे.
हे
सर्व मेसेज वाचत असताना सायंकाळी एका मित्राने खूप छान मेसेज केला तो असा की, “आज
झालेल्या जागतिक मातृदिनाचे खूप मोठ्या प्रमाणावर आलेल्या शुभेछ्या किंवा विविध
प्रकारच्या मेसेजेस वाचून एक प्रश्न मनाला सारखा सतावत होता तो म्हणजे “या सगळ्या
वृध्द आश्रमामधील माता नक्की कोणाच्या आहेत??” खरच हा मेसेज वाचल्यानंतर
सर्वांनी विचार करावा अस वाटल. फक्त मेसेज करून किंवा मोबाईलच्या व्यसनाधीनतेत वाढ
करण्यापेक्षा गरजे पुरताच मोबाईलचा वापर करावा. त्याचा अतिरेक होऊन मानसिक तसेच
कौटुंबिक सौख्य यावर विपरीत परिणाम होणार नाही याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे.
-
मंगेश विठ्ठल कोळी.
मो.
९०२८७१३८२०
it's heart touching article
ReplyDelete