Sunday, August 20, 2017

आपलं ते प्रेम आणि दुसऱ्याच ते .....


आज प्रेम करणाऱ्या व्यक्तीला सर्वजण वेगळ्या नजरेने पाहतात. प्रेम करणे म्हणजे एखादा मोठा गुन्हा करणे असल्यासारखे झाले आहे. असे म्हणतात कि आपण केलेलं प्रेम असत आणि दुसऱ्यांनी केलेलं ते लफड म्हणून त्याचा प्रसार केला जातो. पण हे जग प्रेमाशिवाय कल्पना करणे अशक्य आहे. काही काल परवा एका मित्राने मला पाठवलेल्या मेसेज मधून खूप काही शिकण्यासारख आहे अस मला वाटल. तो मेसेज पुढील प्रमाणे, एका मुलाने एका मुलीशी लग्न केलं. ती मुलगी दिसायला खूप सुंदर होती. तो तिच्यावर खूप प्रेम करायचा काही काळाने त्या मुलीला कोणता तरी skin चा प्रॉब्लेम झाला, एका वेगळ्याच आजाराने ती त्रस्त झाली.
आजारामुळे त्या मुलीची सुंदरता हळूहळू कमी होत चालली, इकडे मुलीला हा आजार झाला तर लगेच मुलाला पण आंधळे पणा आला. असेच दिवस चालले. काही दिवसाने मुलगी खूप कुरूप दिसायला लागली पण नवरा आंधळा झाल्याने त्याला काही कळत नव्हते व तो तिच्यावर तसाच प्रेम करायचा जसा पहीले करत होता. त्या मुलीचा आजार वाढला व कालांतराने तिचा मृत्यू झाला. त्या मुलाला खूप वाईट वाटले त्याने त्या मुलीचा अंत्यविधी खूप प्रामाणिकपणे पार पाडला.
आता तो ते गाव सोडून दुसरीकडे स्थायिक व्हायचा विचार करत होता, तेवढ्ययात त्याला एका शेजारीने विचारले तू तरआंधळा एकटा कसा राहशील. त्यावर तो बोलला मी आंधळा कधीच नव्हतो, मी माझं अर्धे आयुष्य आंधळे पणाचं नाटक करत जगत होतो, कारण जर मी तस केलं नसत तर माझ्या बायकोला त्या आजारापेक्षा मला काय वाटेल व माझं तिच्यावरील प्रेम कमी होईल हेच जास्त दुःख झालं असत, ती खूप प्रेमळ होती व एक चांगली बायको होती. मला तिला आनंदी ठेवायचं होत.
काही वेळा आयुष्यात आनंदी राहण्यासाठी दुसऱ्याच्या शुल्लक गोष्टी दुर्लक्ष करा आयुष्य अजून सुंदर बनेल. समजून घ्या सोप्प आहे. मी एकटा स्मित हास्य करू शकतो, पण आपण सगळे जोरजोरात हसू शकतो. हेच तर मानवी नात्याचं सौंदर्य आहे. आपण एकमेकांशिवाय काहीच नाही, ब्लेडला खूप धार असते पण त्याने झाडं तोडता येत नाही. कुर्‍हाड मजबूत असते पण त्याने केस कापता येत नाहीत. प्रत्येकजण आपल्या जीवनात खूप महत्त्वाचं स्थान भूषवतात त्यांचा आदर करा, जीवन फार सुंदर आहे त्याला आणखी सुंदर करा.
-       मंगेश विठ्ठल कोळी, ९०२८७१३८२० 

3 comments:

  1. खूप प्रभावी आणि खरं प्रेम.खूप छान सर

    ReplyDelete
  2. सुंदर msg चांगलं बोध घेण्यासारखं आहे

    ReplyDelete