काही दिवसापूर्वी शासनामध्ये नवीन पद भरती केली जाणार नसल्याच्या
अफवांना पेव सुटले होते. परंतु नागपूर येथील ‘इंडोयूके इन्स्टिट्यूट
ऑफ हेल्थ मेडीसिटी आययूआयएच (IUIH) यांनी ‘हेल्थ टुरिजम’कडे वाटचाल सुरु केली आहे. मेडीसिटीचे काम तीन
टप्प्यात पूर्ण करण्यात येणार आहे. तीनही टप्पे कार्यान्वित झाल्यानंतर मेडिसीटीत ‘दोन’
लाख युवकांना रोजगार प्राप्त होईल. आययूआयएच ची पहिली मेडीसिटी देशात सर्वप्रथम
नागपूर येथे स्थापन केली जात असून 1600 कोटी रुपयाची
गुंतवणूक असलेली ही मेडीसिटी लंडनमधील किंग्ज कॉलेज हॉस्पिटलच्या सहकार्यानी
विकसित केली जाणार आहे. भारत सरकारचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उद्योग
मंत्रालयातील औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागाने पुरस्कृत केलेल्या इन्व्हेस्ट
इंडिया या राष्ट्रीय गुंतवणूक प्रोत्साहन व मदत एजन्सीचे पाठबळ या प्रकल्पाला
लाभले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोव्हेंबर 2015 मधील ब्रिटन दौऱ्यामध्ये करण्यात आलेल्या संयुक्त
निवेदनामध्ये इंडोयूके इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मेडीसिटी या उपक्रमाची घोषणा करण्यात
आली होती. भारतात अशा प्रकारच्या अकरा नवीन भारत-ब्रिटन आरोग्य प्रतिष्ठाने
स्थापना करण्याचा प्रस्ताव होता. नागपूर हे देशाचे मध्यवर्ती केंद्र असल्यामुळे
अनेकांना उपचार घेण्यासाठी नागपूर हे ठिकाण सोयीचे आहे. मेडीसिटीचा पहिला टप्पा सन
2019 पर्यंत पूर्ण होणार असून तीन टप्प्यात मेडीसिटीचे काम
पूर्णत्वास जाईल. सर्व टप्पे कार्यान्वित झाल्यानंतर दोन लाख लोकांना रोजगार
प्राप्त होईल. मेडीसिटीमध्ये रुग्णांसाठी हजार खाटांचे रुग्णालय तर बांधण्यात
येणारच आहे शिवाय मेडिकल कॉलेज, नर्सिंग कॉलेज तसेच
रुग्णांना विविध क्रीडा प्रकार, प्राणायम, योगा यांच्या माध्यमातून सुविधा पुरविण्यात येणार आहे.
इंडोयूके इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मेडीसिटीच्या माध्यमातून रुग्णांना
अत्याधुनिक सोयी सुविधा, योग्य
उपचार माफक दरात पुरविण्यात येणार आहेत. याच धर्तीवर संपूर्ण देशात इंडोयूके
इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मेडीसिटी आणि आययूआयएच क्लिनिक्स विकसित केली जाणार आहे.
ब्रिटन मधील राष्ट्रीय आरोग्य सेवा संस्थांच्या मदतीने हे रुग्णालय चालविले जातील.
ग्रेट ब्रिटनमधील राष्ट्रीय आरोग्य सेवा ही जगातील सर्वोत्कृष्ट आरोग्य सेवा समजली
जाते. या रुग्णालयाखेरीज उपचार विषयक व प्रशिक्षण विषयक मार्गदर्शन केले जाईल.
संशोधन, शिक्षण, तंत्रज्ञान, उत्पादन आणि आरोग्य सेवा यांच्यातील जागतिक दर्जाच्या संस्थांच्या
सहकार्याने देशात एकात्मिक आरोग्य सेवा पूर्ण करण्याचा ब्रिटन आणि भारत या दोन्ही
देशाचा मानस आहे.
-
मंगेश
विठ्ठल कोळी, ९०२८७१३८२०
No comments:
Post a Comment