सर्वमंगल मांडूल्ये शिवे
सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी
नमोऽस्तुते ॥
भारतीय संस्कृतीमध्ये
स्त्रीयांचा आदर राखला जातो. याची सुरूवात नक्की कधीपासून झाली हे सांगणे कठीण
आहे. भारतामध्ये राजे महाराजांच्या काळापासून ते आजच्या २१ व्या शतकात देखील स्त्रीयांना
आदराचे स्थान आहे. असे म्हणतात की, 'नवनिर्माण करण्याची दैवी शक्ती फक्त आणि फक्त
स्त्रीलाच दिली गेली आहे.” १६ व्या शतकामध्ये राजा छत्रपती
शिवाजी महाराजांचे कार्य करण्यासाठी, सिद्ध होण्यासाठी आणि सक्षम बनवणारी व्यक्तीसुद्धा
एक स्त्रीच होती. त्या म्हणजे त्यांच्या आई जीजामाता. नंतरच्या काळात १८ व्या शतकाच्या
दरम्यान स्त्री चा जन्म हा चूल आणि मुल सांभाळण्यासाठीच झाला आहे, असे अंधश्रद्धाळू व्यक्तींचे मत होते. परंतु खूप कष्ट, अपमान, शारीरिक, मानसिक त्रास सहन करून महात्मा
जोतीबा फुले यांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण दिले. स्त्रीयांना
शिकवण्यासाठी सक्षम केले. दोघांनाही स्त्रीयांना व शिक्षणापासून वंचित असणाऱ्या लोकांसाठी
यातना सहन केल्या. पुढे दादाभाई नौरोजी यांनी ही स्त्रीयांसाठी “सतीची चाल” ही
अनिष्ठ परंपरा मोडीत काढली. या सर्व गोष्टीतून स्त्रीला नवीन इच्छाशक्ती मिळाली.
स्त्री शक्तीच्या या जागरामुळे
आज सर्वच ठिकाणी स्त्रीया आघाडीवर आहेत. काही क्षेत्रांमध्ये पुरुषाबरोबर दिसत
आहेत, तर काही क्षेत्रांमध्ये पुरूषांपेक्षा उत्तम पद्धतीने कार्य करताना दिसत
आहेत. २१व्या युगात अनेक कठीण क्षेत्रामध्ये स्त्रीयांनी स्वत:चे एक वेगळे स्थान
बनविले आहे. भारतीय सैन्य दलात आर्मी, नेव्ही, एअर फोर्स आणि बोर्डर
सेक्युरिटी फोर्स अशा ठिकाणी सुद्धा महिला आघाडीवर आहेत. हवाई दलात जवळपास ३o
ते ४o टक्के कर्मचारी महिला आहेत. हवाई दलाची
लढाऊ विमाने चालविण्याची खूप मोठी जबाबदारी महिला वैमानिक पार पडत आहेत.
महिलांना प्रत्यक्षात युद्धात
पाठविण्याची योजना नसली तरी लष्करी मोहिमेसारख्या कामगिरीवर त्यांना पाठविले जाऊ
शकते. लष्कराच्या सेवेतील महिला वैमानिक सध्या हवाई दलाची मालवाहतूक विमाने, तसेच
हेलिकॉप्टर्स चालवितात. भविष्यात त्यांना लढाऊ विमाने चालविण्याची ही संधी मिळेल.
कोणत्याही शारीरिक मर्यादेवर मात करुन महिला वैमानिक लढाऊ विमानेदेखील सहजतेने
हाताळतील. लढाऊ विमाने चालविण्यास शिकण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागतो. हा
कालावधी पूर्ण झाल्यानंतर महिला वैमानिक लढाऊ विमाने चालवू शकतील. स्त्रीयांचा हा
एक सन्मान आहे. त्यांना करिअर करण्यासाठी एक उत्तम क्षेत्राची निर्मीती होत आहे.
महिलांचा आदर कसा केला पाहिजे हे
जर प्रत्येक कुटुंबातील आई वडिलांनी आपल्या पाल्यांना शिकवले तर अनेक वाईट गोष्टीना
आळा बसेल. आज टीव्ही वरती किंवा वर्तमान पत्रामध्ये सुद्धा कव्हर स्टोरी करून
समाजात वाईट गोष्टीना प्रकाशित करण्यापेक्षा न केलेल्या बऱ्या. प्रत्येक क्षेत्रात
स्त्रीला प्राधान्याने सहभागी होण्याची संधी मिळाली पाहिजे त्याची सुरुवात आपण
आपल्या कुटुंबापासून करायला हवी. तरच एक उत्तम शारीरिक मानसिक आणि बौद्धिक सक्षम
स्त्री उभा होईल. स्त्री शक्तीला त्रिवार वंदन.....
-
मंगेश विठ्ठल कोळी, ९०२८७१३८२०
No comments:
Post a Comment