काल मी ऑफिसातनं लवकर घरी आलो. साधारणपणे मी घरी रात्री ८ वाजेनंतर येतो. काल ७ वाजताच आलो. ठरवलं होतं की घरी जावून थोडावेळ बायकोशी बोलेन. मग मी विचारेल की आज आपण
बाहेर जेवायला जाऊयात? खूप वर्षांपूर्वी आम्ही असं करायचो. घरी आलो तर बायको टीव्ही पहात होती. मला वाटलं जोपर्यंत ती ही सीरियल पहात
आहे, तोपर्यंत आपण लॅपटॉपवर काही मेल चेक करून घेवूयात. मी लगेच मेल चेक करायला
लागलो. थोड्या वेळानं बायको चहा घेवून आली. मी चहा पित पित ऑफिसचं काम करायला
लागलो.
आता मनात आलं होतं की, हिच्यबरोबर बसून
गप्पा मारूयात मग जेवायला बाहेर जावूयात, पण केव्हा ७ चे १० वाजले कळलंच नाही. बायकोने जेवण वाढलं मी चुपचाप जेवायला बसलो. जेवतांना मी म्हणालो की, आपण
जेवणानंतर थोडं फिरायला जावूयात, गप्पा मारूयात. यावर बायको खुश झाली. मी जेवण करत असतांनाच टीव्हीवर माझ्या आवडीचा कार्यक्रम लागला. जेवता-जेवता मी कार्यक्रमात गुंगलो. कार्यक्रम पहाता-पहाता सोफ्यावरच झोपी गेलो. जेव्हा
जाग आली तेव्हा मध्यरात्र झाली होती. खूप वाईट वाटलं.
मनात ठरवून आलो होतो की, आपण लवकर यायचा फायदा घेवून आज थोडावेळ बायको सोबत घालवेल.
पण इथं सायंकाळच काय रात्र देखील निघून गेली. असंच होतं
आयुष्यात. आपण विचार करतो वेगळा आणि होतं वेगळंच. आपण विचार करतो की, आपण एक
दिवस जगूच पण आपण कधीच जगतच नाही. आपण विचार करतो की, ह्या दिवशी आपण हे करूयात पण
करू शकत नाही.
आर्ध्या रात्री सोफ्यावरनं उठलो व हात-पाय धूवून अंथरुणावर आलो. पाहिले तर बायको
संपूर्ण दिवस काम करून थकली होती. बायको शांत गाढ झोपी गेली होती. मी पण गुपचूप बेडरूम मधल्या
खुर्चीवर बसून विचार करत होतो. सहा वर्षांपूर्वी ह्या मुलीला पहिल्यांदा भेटलो होतो हिरव्या रंगाच्या पंजाबी ड्रेस
मध्ये. मी हिच्याशी लग्न केलं होतं. मी वचन दिलं होतं की सुखात, दुखात जीवनातील
कोणत्याही वळणावर मी तुला साथ देईन.
पण ही कसली साथ? मी सकाळी उठतो तर आपल्या कामात
व्यस्त होतो. ती सकाळी जागी होते तर माझ्यासाठी चहा बनवते. चहा पिऊन मी जगाशी
जोडला जातो तर ती नाष्टाची तयारी करते. मग आम्ही दोघं व्यवसायाच्या कामाला
लागतो. मी ऑफिसच्या तयारीला लागतो तर ती त्या सोबतच माझ्या लंचची व्यवस्था
करते. मग आम्ही दोघं भविष्याच्या कामात जुंपले जातो.
मी
एकदा ऑफिसात गेलो की, मी माझी शान समजतो की माझ्याशिवाय माझ्या ऑफिसचं काम चालत
नाही. ती आपलं काम निपटून डिनरच्या तयारीला लागते.
रात्री घरी उशिरा येतो व जेवण करून सुस्त होवून जातो. एक संपूर्ण दिवस खर्च
होतो जगायच्या तयारीत. ती पंजाबी ड्रेस मधली मुलगी माझ्याकडं कसलीही तक्रार करत
नाही. का करत नाही? मला नाही ठावूक? पण माझी स्वतः विषयीच तक्रार आहे. मनुष्य
ज्याच्यावर सगळ्यात जास्त प्रेम करतो त्याचीच सगळ्यात कमी काळजी करतो असे का?
बऱ्याचदा वाटतं की आपण आता स्वतःसाठी काम नाही करत आहोत. आपण एखाद्या अज्ञात
भयाबरोबर लढण्यासाठी काम करतो आहोत. आपण जगण्यासाठी आपलं आयुष्य बरबाद करतो आहोत. कालपासूनच विचार करतोय तो कोणता दिवस असेल, जेव्हा आपण जगायला सुरवात करू? आपण काय फक्त गाडी, टीव्ही, फोन,
कॉंम्प्यूटर, कपडे खरेदी करण्यासाठीच जगतो
आहोत का? मी तर विचार करतोच आहे आपणही जरूर करा.
आयुष्य खूप छोटं आहे. त्याला असंच वाया घालवू नका. आपल्या प्रेमाला ओळखा, त्याच्या सोबत वेळ घालवा. जीनं आपल्या आई, वडील,
बहिण, भाऊ तसेच सख्खे नातेवाईक सोडून
तुमच्याशी नातं जोडलंय. आपल्या सुख, दुःखात सामील व्हायचं वचन दिलंय, तिला विचारा तर
खरं. एक दिवस पश्चाताप करत बसण्यापेक्षा जे सत्य आहे ते आजच समजून घ्या. आयुष्य हे मुठीतल्या रेती सारखं असतं कधी ते मुठीतनं कधी निसटून जाईल कळणार देखील
नाही.
आपल्या सोबत कोणत्याही कठिणातील कठीण प्रसंगी आपली साथ न सोडणाऱ्या व्यक्तीवर नेहमी प्रेम करा.
- मंगेश विठ्ठल कोळी
- मो. 9028713820
आपल्या सोबत कोणत्याही कठिणातील कठीण प्रसंगी आपली साथ न सोडणाऱ्या व्यक्तीवर नेहमी प्रेम करा.
- मंगेश विठ्ठल कोळी
- मो. 9028713820
Very Well Said.. This is happened with everyone.. I appeal to everyone please give the time for you family..
ReplyDeleteWell narrated...and its routine now a days...with everyone...We have to give time for our family...I will definitely think on it.
ReplyDeleteVery well said. This is the fact of today's Generation.In today's world people give most important to the money.but it is not all.
ReplyDeleteIt's heart touching...Underline the importance of our family
ReplyDeleteVery nice 👌👌
खरोखरच विचार करावयास लावणारी गोष्ट
ReplyDeleteहो आपण खरं जगायला शिकल पाहीजे.
ReplyDeleteखरंच खूप छान वाटले अगदी वास्तव मांडणारा लेख आहे सर्वांनी बोध घ्यावा असाच
ReplyDeleteछान सर
ReplyDeleteKharach khup chan vatala ani kharach apan pratekani family sathi thoda vel dila pahije,apan biko mhanje mhanato khara ti ardhangini aste pan vagato apan ti apli sevekari asalyapramane asa na karta jya pramane mangesh koli hyanni vichar mandalet tya pramane vel dila pahije family sathi..nice dada khup chan vatala Reality dakhavaliy tumhi.
ReplyDelete