आज
मी आणि माझा मित्र गजेंद्र ऑफिसातील काम संपवून घरी जाण्यासाठी बाहेर पडलो. बोलत
असताना गजेंद्रने त्याच्या मोबाईल खिश्यातून बाहेर काढला आणि आज त्याने काढलेला
फोटो दाखवला. फोटो पाहताक्षणी मला खूप काही सांगून गेला. त्याच बरोबर गजेंद्रची त्या
फोटो बदल भावना मी विचारपूस करता, त्याने खूप वर्षापूर्वीच्या एका गोष्टीची आठवण
करून दिली. माझ्या गजेंद्रचे मत असे होते की, तो फोटो घेण्यामागचे खरे कारण आणि
त्याने केलेला विचार गजेंद्र सांगू लागला. आम्ही पायी चालत चालत आणखी थोडसं अंतर त्याच
विषयी बोलत पुढे आलो आणि ट्रेनमध्ये बसलो. प्रवासाला सुरवात झाली. मी गजेंद्रकडून
हक्काने तो फोटो माझ्या मोबाईलमध्ये घेतला. त्याने काढलेला फोटो अप्रतिमच होता,
परंतु मला मात्र तो फोटो वेगळ्याच दुनियेत घेऊन गेला.
आज
फार वर्षापूर्वीची गोष्ट आठवली. लहानपणी शाळेत असताना गुरुजींनी कावळ्याची गोष्ट
सांगितली होती. जेंव्हा कावळ्याला तहान लागते. तेंव्हा तो पाणी पिण्यासाठी खूप
व्याकून झालेला असतो. भर उन्हात हरीण जसे पाणी पिण्यासाठी मृगजळाच्या पाठीमागे
धावून स्वत:चे प्राण गमावते. तशीच काही अवस्था त्या कावळ्याची झालेली असते. खूप
वेळ भटकल्यानंतर त्याला एका मडक्यात पाणी दिसते. कावळा पाणी पिण्यासाठी खूप
प्रयत्न करतो. पाणी मडक्याच्या तळाला असल्याने हे सारे प्रयत्न व्यर्थ जातात.
शेवटी त्याच्या लक्षात येते की, पाण्यात बाजूला पडलेले खडे टाकले तर पाणी वरती
येईल. मग तो बाजूला असलेले खडे उचलून त्या मडक्यात टाकत असतो. जस जसे लहान लहान
खडे उचलून त्या मडक्यात टाकतो, तस तसे ते पाणी वरती मडक्याच्या तोंडाशी येत असते.
शेवटी मडक्यातील पाणी पिऊन कावळा स्वत:ची तहान भागवतो आणि उडून जातो.
आज
प्रत्येक जन वेगवेगळ्या तहानेने व्याकूळ झालेला आपण पाहतो. प्रत्येकाची आवडी निवडी
वेगवेगळ्या आहेत. त्याच बरोबर प्रत्येकाची वागण्याची पद्धत वेगळी, बोलण्याची पद्धत
वेगळी, विचाराची पातळी वेगळी, राहण्याचे स्थान मान वेगळ, आवडते गाणे वेगळे, कपडे
परिधान करण्याची पद्धत वेगळी, केसाची स्टाईल वेगळी, त्याच बरोबर खाण्याची पिण्याची
पद्धती वेगवेगळी, आवडत्या दारूचा ब्रॉन्ड देखील वेगळा आहे. परंतु दोन गोष्टी सर्वांनमध्ये
समान आहे. मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो, दोन गोष्टी या समान आहे. एक म्हणजे
मला सुख पाहिजेच आणि दुसरे म्हणजे मला आनंद पाहिजेच. एवढ्या दोन गोष्टी सोडल्या तर
सर्वांच्या सर्वच गोष्टी वेगवेगळ्या आहेत.
गजेंद्रने
काढलेल्या चित्रामध्ये एक व्यक्ती चहा पीत आहे.
त्याच्या आजूबाजूला काही कावळे आहेत. ते कावळे माणसांनी पिलेल्या चहाचा ग्लास पडून
त्यातील उरलेला चहा पिण्याचा प्रयत्न करत आहेत. सुखी आणि आनंदी राहण्यासाठी
माणसाला नक्की काय हवं आणि काय नको हे समजले की, जीवन सुखकर आणि आनंदी झाल्याशिवाय
राहत नाही. मला आज गजेंद्रच्या या चित्रामधून खूप महत्वाची गोष्ट शिकता आली.
जीवनात समाधानी असणे म्हणजे सुखी आणि आनंदी असणे होय. केंव्हा तरी स्वत:चे आयुष्य
मनसोक्त जागून पहा आयुष्य खूप सुंदर आहे त्याला आणखी सुंदर बनवण्याची तीव्र इच्छा
निर्माण होईल.
- मंगेश
विठ्ठल कोळी, ९०२८७१३८२०.
No comments:
Post a Comment