आपला देश हा प्राचीन काळापासून
शिक्षण देण्यात अव्वल ठरला आहे. खूप जुनी विद्यापीठे आजही देशामध्ये आहेत. देशातील
शिक्षण पद्धतीचा अवलंब बाहेरील देशांनी सुद्धा स्वीकारला आहे. योगाचे फायदे तर
संपूर्ण जगाने पाहिले. १८ व्या शतकानंतर भारतामध्ये इंग्रजांचे राज्य आले त्यावेळीपासून
ते आज तागायत आपली शिक्षण पद्धतीमध्ये फारसा फरक झालेला पहावयास मिळत नाही. काही
इंग्रज येऊन बहुसंख्य असणाऱ्या भारतीय नागरिकांवर हुकुम गाजवू लागले. याचे मुख्य
कारण म्हणजे सर्व प्रथम एक इंग्रज भारतात येऊन गेला आणि त्याने इंग्रजांना ठणकावून
सांगितले कि, भारतावर विजय मिळवणे खूप कठीण गोष्ट आहे. कारण तेथे सर्व व्यवहार हे
वस्तूंची देवाण घेवाण करून केले जातात. कोणत्याही प्रकारच्या चलनाला जास्त किंमत
दिली जात नाही.
आठराशेच्या कालावधीपासून ते आजपर्यंत
शिक्षणाच्या बाबतीत विचार केला, तर भारत हा जगातील पहिल्या १०० महाविद्यालयांच्या
यादीत एकही महाविद्यालय नसणारा देश आहे. याचे कारण म्हणजे येथे मोठ्याप्रमाणात
व्यावसायिक बनण्यापेक्षा मजूर निर्माण केले जात आहेत. एखाद्या लहान मुलाला सुद्धा
पालक सांगत असतात. मोठेपणी तुला चांगली नोकरी मिळाली कि, आयुष्य खूप सोप होईल. याच
वयापासून आपण त्यांना उत्तम नोकर होण्याचे बाळकडू देण्यास सुरुवात करतो. मग बालक
सुद्धा वेगळा विचार करत नाही, जास्तीत जास्त गुण मिळविण्याच्या प्रयत्नात पुस्तकी
किडा बनते. अपयश आले तर ते पचवण्याची क्षमताच आजच्या बालकांची कमी होत चालली आहे.
पालक सुद्धा समाज काय म्हणेल? याची प्रचंड भीती बाळगतात त्याच बरोबर कळत नकळत
बालकांची तुलना करतात.
काही दिवसापूर्वी लहान मुलाच्या
बाबतीत ज्या काही घटना आपण पेपर किंवा न्यूज चॅनेल वरती पाहत आहोत. त्यावरून एक
गोष्ट लक्षात येते कि, ज्या गोष्टीची जास्त चर्चा व्हायला नको त्याच गोष्टींना
मोठ्या प्रमाणावर वाव दिला जात आहे. मग ती ब्लुव्ह व्हेल गेम असो, किंवा मुलाच्याकडून
होणारे गुन्हा असो या बाबतीत सर्व पालक हे दोष देताना संपूर्ण व्यवस्थेला
देत आहेत. परंतु आपण हि त्या व्यवस्थेचाच एक भाग आहे हे मात्र आपण विसरून जात आहे.
लहान बालकांना कोणत्या प्रकारचे शिक्षण द्यायचे यावर पालकांना चर्चा करावयास
सांगितले तर खूप दीर्घकाळ चालेल. मात्र एकच गोष्ट त्यामध्ये दिसून येईल ती म्हणजे,
“आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते .....”
-
मंगेश
विठ्ठल कोळी, मो.९०२८७१३८२०
No comments:
Post a Comment