Friday, September 8, 2017

सोबत कुणाची......



आजकाल प्रत्येकजण खूप व्यस्त झाला आहे. त्यापेक्षा जास्त एकलकोंडी व्यक्तीमत्व वाढले आहे. आपण आणि आपला मोबाईल इतर कोणाच काहीही देण घेण आता उरलं नाही. कुणाशीही बोलावसं वाटत नाही, खूप खूप कंटाळा येतो. सगळीकडे वेगवेगळे मुखवटे चढवलेले चेहरे पहावयास मिळत आहेत. एकत्र बसून बोलणे आणि खोटी स्तुती करणे हि आत व्यसनाधीनता वाढत आहे. ज्याची पाठ फिरेल त्याची निंदा करणारे प्रत्येक ठिकाणी समाजात वावरताना दिसतात. ह्यांची मानसिकता इतकी चीप असते ना की, नको वाटतं. इतकं खोटं कसं काय ते वागू शकतात असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही? ह्यात आपले लोक पण असतात हे विशेष! ज्यांच्यासाठी तुम्ही कितीतरी वेळेला एडजस्टमेंट केलेली असते ते देखील एका नकाराने बदललेले बघितले आणि वाटलं, ‘आपण एकटे असतो तेच बरं असतं.

एखाद्या व्यक्तीपेक्षा पुस्तकांमध्ये आणि छंदामध्ये रमावं, मन प्रसन्न राहतं आणि नकारात्मक गोष्टींपासून तुम्ही स्वाभाविकपणे दूर जाता. हळूहळू सकारात्मक गोष्टींची वाढ होते. कधीतरी अशी वेळ येते की, तुम्हाला माणसांचाच कंटाळा येऊ लागतो. त्यांना सांभाळून घेताना तुमची प्रचंड दमछाक होते. प्रत्येकाचे मूड संभाळण, त्यांच्या मनाप्रमाणे वागणं ह्या सगळ्यात आपण फार दमून जातो. सतत दुसऱ्यांचा विचार करताना आपल्याला स्वतःला काय हवं आहे.हा प्रश्न कधी मागे राहतो हे कळतच नाही. आपण इतकं सगळं करूनही आपल्याला प्रेमाचे दोन शब्द, नात्यात हवा असलेला आदर, विश्वास, आपुलकी मिळते असंही नाही. मग अशा वेळी प्रश्न पडतो हे सगळं कशासाठी?”

खूप विचार केला की, ह्या प्रश्नाचे एक उत्तर असं मिळतं ते म्हणजे, “आपण एकटेपणाला घाबरतो.सुरक्षितेसाठी कळपात राहिलं पाहिजे. ही एक चुकीची मानसिकता आपल्यात रुजलेली असते. एकटे पडू? या भीतीमुळे अनेकदा आपण चुकीच्या गोष्टींना पाठींबा देतो. मनात नसूनही अनेक गोष्टी स्वीकारत जातो. मोठे होतो पण सोबती”, “मैत्री “जीवा भावाची” ह्या गोष्टींचे आणि नात्यांचे खरे अर्थ विसरतो. लोकांनी केवळ आपल्या सोबत असण्याला सोबतअसं गोंडस नाव देतो. आपणही तसेच खोटे वागत जातो. पण एक क्षण असा येतो, जेव्हा हा माणसांचा गोतावळा नकोस होतो. मोजकीच पण चांगली माणसं हवीत असं वाटू लागतं. ह्या मुखवट्या मागचे चेहरे भेसूर वाटू लागतात आणि आपण पुन्हा स्वतःकडे वळतो. जाणीवेचा एकच क्षण असतो आणि तो आपल्या हातून कधीच निसटू द्यायचा नसतो.

मी उत्तम तेच करीन आणि चांगल्या लोकांच्या सोबतीतच राहीनअसा मनाशी निश्चय केला की, आपली निवड बदलत जाते आणि पर्यायाने आयुष्यही बदलतं. मोजकीच पण प्रेमळ, आपल्याशी प्रामाणिक भावनेने जोडलेली, वेळ प्रसंगी हितासाठी थोडीशी रागावणारी माणसं म्हणजे खरी सोबत. आजकाल अशी सोबत शोधण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. ज्याप्रमाणे एखादे हरीण उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात मृगजळाच्या मागे धावते अशी अवस्था माणसांची झाली आहे.!

-       मंगेश विठ्ठल कोळी, मो. ९०२८७१३८२०

7 comments:

  1. अगदी प्रायोगिक मत मांडले आहे... लोकांना एकटेपणाची भीती असते म्हणून बऱ्याच वेळा ते चुकीच्या लोकांशी जोडले जातात... धन्यवाद

    ReplyDelete
  2. खूप छान पद्धतीने आणि थोडक्यात मत मांडले आहे.
    अशाच नवनवीन आणि समाजोपयोगी विषयांवर लिहीत रहा याच शुभेच्छा

    ReplyDelete
  3. आजच्या धावपळीच्या युगात माणसे संयुक्त कुटुंब पद्धतीपासून दूर गेलेली आहेत.मोबाईल मुळे घरातील सुसंवाद कमी झाला आहे.एकलकोंडी माणसे भावनाशून्य बनत आहेत.अशावेळी योग्य मोजक्या पण चांगल्या मैत्रीची गरज आहे.चांगले मित्र लाभणे व ते आयुष्यभर टिकून रहाणे महत्त्वाचे आहे. R.D.Sonawane.sir.Bhusawal.

    ReplyDelete
  4. फ़ारच सुन्दर् लिहले आहे सर.

    ReplyDelete
  5. वस्तुस्थितीपर भावना खूप छान

    ReplyDelete