दिवसभरातील गोष्टी करीत असताना तुम्हाला
न मागता हा शब्द अनेक वेळा कानी पडतो. मग तो एखाद्याचा सल्ला असेल किंवा इतर काहीही
असू शकतो. जीवनामध्ये न ठरविता अनेक संकटे येत असतात, त्यांना कशा पद्धतीने सामोरे
जायचे असा सल्ला देणारे अनेक जण मिळतील. परंतु ती संकटे स्वतः समोर उभी राहूच नये म्हणून
नेमके काय केले पाहिजे असे सांगणारे बोटावर मोजण्या इतपतच असतात. आयुष्यात आपण असंख्य
चुका केल्या याचं दुःख जास्त असतंच पण त्याहीपेक्षा जास्त दुःख असतं ते चुकीच्या माणसासाठी
आपण असंख्य गोष्टी केल्याचे, हे वाक्य सत्य आहे. तुमच्या आवडत्या व्यक्तीकडून कितीही
मोठी चूक झाली तरी ती तुम्ही सहजपणे सहन करता परंतु ना आवडत्या व्यक्तीकडून थोडीशी
जरी चूक झाली तरी तुम्ही सर्वांचा राग त्याच्यावर काढता असे का घडते याचा विचारच तुम्ही
करीत नाही.
तुमच्या सोबत असणार्याचे हसू पाहून तुमचे
दुःख विसरले पाहिजे पण तुमच्या सोबत असणार्या प्रत्येकाचे दुःख पाहून तुम्हाला कधीच
हसू येणार नाही. तुमच्या बरोबर असणार्या व्यक्तींना तुम्ही एक गोष्ट सांगा माझ्या
चुका मला सांगा त्या इतरांना सांगू नका कारण त्या चूका फक्त मी बरोबर करू शकतो इतर
लोक नाहीत. तुम्ही जेथे कार्य करता किंवा ज्या ठिकाणी दिवसभरातील अधिकाधिक वेळ घालविता
त्या ठिकाणी अशा प्रकारच्या गोष्टींना सामोरे जावे लागते. तसेच आज अनेक जणांना अशी
सवय जडली आहे कि एखाद्याची चूक झाली तर त्याला न सांगता इतरांना सांगणे किंवा एखादी
व्यक्ती कशा पद्धतीने चुकीची वागत आहे, यावर एकत्र येऊन तासंतास चर्चा, गप्पा करणे
आणि त्या व्यक्तीच्या चुकांचा पाढा वाचून दाखवणे. असे केल्याने फक्त जीवनातील चांगला
वेळ वाया घालवायचा त्यातून स्वतः ला आणि इतरांना काहीही मिळत नाही याची कल्पना असून
सुद्धा असे वागले जाते.
नेहमी लक्षात ठेवा जेंव्हा जीभ जास्त
बडबडत असेल तेंव्हा मेंदूचे काम करण्याचे प्रमाण खूप कमी झालेले असते. त्यासाठी कमी
बोला आणि तुम्ही करीत असलेल्या कामातून स्वतः ची ओळख कशा पद्धतीने निर्माण होईल यावर जास्त कष्ट घेतले पाहिजे. स्वतः किती श्रेष्ठ
आहे किंवा मी हे केले, माझ्यामुळे ते झाले, मी नसतो ते काय झाले असते, मीच सर्व काही
केले आहे. असे शब्द ज्या व्यक्तीच्या तोंडातून येतात त्या व्यक्ती स्वतः च्या कर्तृवाने
कधीही मोठ्या होत नाहीत. त्यांच्याकडे स्वतः चे निर्णय घेण्याची क्षमता नसते आणि जे
स्वतः निर्णय घेतील त्यावर ठाम नसतात. आज एखादा निर्णय घेतला तर उद्या दुसराच निर्णय
घेतात, अशा व्यक्तीची प्रगती कधीच होत नाही त्यांच्या पासून थोडस दूर राहा.
बी रुजवायला सुद्धा काही कालावधी लागतो
कारण माती, पाणी, हवामान, सूर्यप्रकाश व्यवस्थित असेल तरच बी रुजते. हे साधे निसर्गाचे
तत्व ज्याला समजते तो शांतपणे फळाची वाट बघतो गडबड करत नाही. कासवाच्या गतीने का होईना
पण दररोज थोडीथोडी प्रगती करा, खूप ससे येतील आडवे बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवायला
हवी. आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा कोणतेही कार्य हाती घेत असताना मनाची तयारी केली
कि जग जिंकण्याची, अर्धी कसरत पूर्ण होते.
अनेक व्यक्तीना न मागता काही देण्याची
सवय असते. जीवनामध्ये नेहमी चांगले विचार ठेवा, प्रत्येकाचे ऐकूण घ्या. प्रत्येकाकडून
काहीतरी शिका कारण प्रत्येकजण सगळं जाणतो असे काही नाही परंतु प्रत्येकजण काहींना काही
तरी जाणतो हे नक्की. कोणालाही कधीच कमी समजू नका. असे म्हणतात कि कोणा वाचून कोणाचे
काहीही अडत नाही हे जरी खरे असले तरी त्या व्यक्तीची कमतरता हि जाणवतेच हे हि सत्य
आहे. त्यासाठी नेहमी स्वतः ला सिद्ध करा प्रसिद्ध आपोआप व्हाल आणि यशस्वी होण्यापासून
तुम्हाला कोणी रोखू शकत नाही.
No comments:
Post a Comment