भारतामध्ये प्राचीन काळापासून गुरूला विशेष महत्व आहे. राजे महाराजे यांच्या काळापूर्वीपासून गुरुचे महत्व आणि अस्तित्व यामध्ये थोडे देखील कमीपणा झालेला नाही. आज या संगणकीय युगात एवढ्या धावपळीच्या जीवनामध्ये देखील गुरूला महत्वाचे स्थान दिले जात आहे. याचे कारण म्हणजे कोणालाही कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर त्या क्षेत्रातील कोणत्याही व्यक्तीला गुरू करून घेणे गरजेचे आहे. प्रत्येक मानवाला लहानपणापासून गुरू जवळ (शिक्षक) याच्या सानिध्यात ठेवले जाते. बालकाच्या सर्वांगीण विकास कशा पद्धतीने व्हायला हवा यामध्ये शिक्षकाची भूमिका फार महत्वाची असते. या मोबाईल च्या काळात 2जी, 3जी, 4जी, 5जी आले असले तरी मात्र गुरुजींचे महत्व अढळ राहिले आहे.
काही वर्षांमध्ये शाळेची स्थिती पाहता प्रगतिशील व शिक्षणाची गंगा मानल्या जाणार्या महाराष्ट्रातल्या शाळांची स्थिती दयनीय होत असून, सर्व शिक्षण अभियानाच्या प्रगतीत राज्याची घसरण सुरूच असल्याचे चित्र समोर आले आहे. राज्यात 49 हजार 962 शिक्षकांची पदे रिक्त असून, तब्बल तीन हजार 97 शाळांमध्ये केवळ एकच शिक्षक असल्याची आकडेवारी समर्थन या आर्थिक क्षेत्रात मूल्यमापन करणार्या संस्थेने जाहीर केले आहे. 13 हजार 312 शाळा मुख्याध्यापकांच्या शिवाय सुरु आहेत. मुख्याध्यापकांची पदे रिक्त असल्याने शाळांच्या प्रशासकीय कामांना खीळ बसली आहे. राज्यात 19 हजार 732 व उच्च प्राथमिक शाळांत 23 हजार 212 मंजूर मुख्याध्यापकांची पदे रिक्त आहेत. दोन हजारांपेक्षा जास्त शिक्षकांची पदे रिक्त असल्याने जिल्ह्यांमध्ये यवतमाळ (2915) पहिल्या क्रमांकावर आहे, अहमदनगर (2336), मुंबई उपनगर (2171), जळगाव (2062), व सांगली (2036) यांचा समावेश आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार एक शिक्षकी शाळा कालबाह्य ठरवल्या आहेत. 60 विद्यार्थ्यांमागे दोन शिक्षक असणे बंधनकारक आहे. पण 2013 मधील नियमानंतरही राज्यात तीन हजार 97 शाळांमध्ये केवळ एकच शिक्षक असल्याचे वास्तव समोर आले आहे. जर संपूर्ण महाराष्ट्राची हि स्थिती असेल तर भारत देशामध्ये अशा प्रकारच्या किती शाळा आज अस्तिवात असतील याचे मोजमाप होणे गरजेचे आहे. आणि त्यानुसार योग्यती कारवाई होणे देखील आवश्यक आहे. पढेगा इंडिया तो हि बढेगा इंडिया हे वाक्य वास्तवात आणण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व शिक्षणाची रिक्त असणारी पदे लवकरात लवकर भरली गेली पाहिजेत. नाही तर भविष्यातील बालकांना अज्ञानी राहिल्या शिवाय गत्यंतर उरणार नाही.

No comments:
Post a Comment