आजच्या या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या चिंतेमध्ये जगत आहे. अनेकांची प्रगती न होण्यामागच्या कारणांचा थोडासा आढावा घेतला, तर एक गोष्ट स्पष्ट पणे जाणवेल ती म्हणजे चिंता होय. चिंता आणि चिता या दोन शब्दामध्ये फक्त एका अनुस्वाराचा फरक आहे. चिता हि मानवाला एकदाच संपवते परंतु चिंता हि मानवाला प्रत्येक क्षणाला संपवत असते. अनेक लोक कशाची चिंता करतात याची यादी तयार केली तर खूप लांबलचक होईल. त्याचप्रमाणे अनेकांची प्रगती खुंटण्याचे प्रभावी कारण म्हणजे लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, याची सतत चिंता करत रहात असतात. अनेक जण उद्या स्वतःच काय होणार, कस होणार यातच आजचा वेळ वाया घालवत असतात.
अनेक व्यक्तींना एखादी गोष्ट करावीशी वाटत असेल किंवा एखादी गोष्ट मनापासून आवडत असेल, त्या गोष्टी केल्यामुळे स्वतःला आनंद मिळत असतो हे देखील माहित असते. परंतु हे सर्व करण्याआधी त्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न गोंधळ घालत असतो तो म्हणजे त्याचा काय परिणाम होईल. याचाच मोठ्या प्रमाणात विचार होतो मग त्यातच वेळ जातो. मात्र स्वतःच्या हातून कोणतीही क्रिया होताना दिसत नाही. तुम्ही केलेली चूक हि सर्वस्वी तुमची चूक आहे आणि तुमचा पराजय हा सर्वस्वी तुमचा पराजय आहे, कोणाला दोष देऊ नका झालेल्या चुकीपासून धडा घ्या आणि पुढे चालत रहा. अनेकजण स्वतःच्या चुकीचे खापर इतरांच्यावर फोडून रिकामे होतात. त्यांना त्यातून मुक्त झाल्यासारखे वाटते परंतु हे चुकीचे आहे तुम्ही ज्याच्यावर असे खापर फोडता तो मात्र त्याला नवी मिळालेली संधी समजतो आणि सामोरे जातो.
काही दिवसापूर्वी मी कामानिमित्त बाहेरगावी गेलो होतो तिकडे एक छान कार्यक्रम होता, कार्यक्रम खूप छान पद्धतीने सुरु होता. अचानक माझा फोन वाजला मी तो उचलला संभाषण संपले, परंतु संभाषणा दरम्यानचे विचार माझ्या मनात तसेच गोंधळ घालत होते. माझ्या बरोबर आलेल्या मित्राने मला विचारले काय झाले, मग मी त्याला झालेल्या संभाषण बद्दल सांगितले. तेव्हा तो म्हणाला काही काळजी करू नकोस आता एवढा छान कार्यक्रम सुरु आहे त्याचा आनंद घे, जे फोनवर बोलणे झाले त्याचा काय परिणाम होईल हे आपण परतल्यावर पाहूया. त्याच वेळी मी ठरविले की पुढे काय परिणाम व्हायचा आहे तो होणार आहे परंतु आताची वेळ आपल्याला आनंद मिळवून देणारी आहे. मग परिणामांचा विचारात हे आनंदाचे क्षण वाया घालवायला नकोत.
कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही परतलो पाहिले तर मी ज्या परिणामाची काळजी करत होतो तसे काहीही घडले नाही. बर्याच वेळा असे होते कि, आपण उगाचच चिंता करत असतो. मी जर त्यावेळी फक्त विचार करत राहिलो असतो तर तो कार्यक्रमातील आनंद कदाचित उपभोगू शकालो नसतो. नेहमी तुम्ही करत असलेले काम हे आत्मविश्वासपूर्वक करायला हवे, म्हणजे पुढील परिणाम काय होतील याचा विचार करण्यासाठी वेळ वाया जात नाही. अनेक जणांना अशी सवय असते की, एखादी क्रिया घडून गेल्यावर किंवा भविष्यात काही घडणार असेल त्या गोष्टीवर तासंतास गप्पा करायच्या त्याचा स्वतः च्या आयुष्यावर एकच परिणाम होतो फक्त चांगली वेळ निघून जाते आणि वेळ हि नदीतील वाहणार्या पाण्यासारखी असते. एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला तुम्ही पुन्हा कधीच स्पर्श करू शकत नाही.
नेहमी स्वतःचे आत्मभान ठेऊन जगायला हवे. कोणी ढकलून देई पर्यंत कोणाच्याही दरात उभे राहू नका, जबाबदारीने धाडसाने पाऊल उचलायला मागेपुढे पाहू नका. आपल्या स्वतःच्या निर्णयाला परिश्रमाची साथ द्यायला कधी विसरू नका, आत्मविश्वासाने सर्वकाही कमावता येते. अपयशाने मात्र कधीच खचून जाऊ नका, मान सन्मान त्यांचाच करा जे तुम्हाला बरोबरीने सोबत घेऊन चालतील. आणि त्याच्यासाठी पुढील परिणामांची काळजी करू नका, जीवनात नक्कीच यशस्वी होऊ शकाल.

No comments:
Post a Comment