अनेकांचे आयुष्य याच प्रश्नाभोवती घूटमळत राहते. आयूष्याच्या प्रत्येक टप्प्यावर हा प्रश्न निरनिराळ्या रूपात समोर ऊभा ठाकला इतके मोठे प्रतल या प्रश्नाचे. बालपण सरताना अनेक गोष्टी मागे राहील्या काही खेळ विकत घ्यायचे तर काही खेळायचे राहीले. तारूण्याच्या उंबरठ्यावर मनापासून आवडलेल्या व्यक्तीला अंतरीचे गूज सांगायचे राहून जाते. व्यवहारी आयूष्य पूढेच सरकत असले तरी मन मात्र सदैव मागे मागे घूटमळत असत.
आपण दररोज एकदा तरी या गोष्टींचा वापर करत असतो काही जण याला काडी मात्र किंमत देत नाहीत परंतु काही व्यक्तींसाठी व्यक्तीमत्व विकास करण्यासाठी उपयोगी पडणार आहे हे माहित असते. स्वतःच्या व्यक्तीमत्व विकासासाठी तुमच्या हातून घडलेल्या गोष्टींवर थोडावेळ विचार जरूर केला पाहिजे. एका शास्त्रज्ञाने असे म्हटले आहे की कोणतेही काम करण्यासाठी मला 60 मिनिटे दिलीत तर त्यातील 45 मिनिटे ते काम कशा पद्धतीने पूर्ण करता येईल यावर जास्त भर दिला पाहिजे आणि उरलेल्या 15 मिनिटामध्ये ते काम आत्मविश्वासपूर्वक पूर्ण केले पाहिजे.
एखादे काम पूर्ण केल्यानंतर मागे काही राहिले नाही ना याची काळजी घ्यायला हवी. अनेक व्यक्ती अपयशी होण्यामागे हेच कारण असते. यालाच आपण सिंहावलोकन असे सुद्धा म्हणत असतो, कारण सिंह जेव्हा चालत असतो तेव्हा काही पाऊले पुढे चालल्यानंतर तो मागे वळून पाहतो की मागे काही राहिले तर नाही ना. त्याच प्रमाणे प्रत्येकाने स्वतःचा व्यक्तीमत्व विकास करत असताना भूमिका पार पाडली पाहिजे.
एक उदाहरण सांगतो म्हणजे या काही शब्दांचा अर्थ तुमच्या लक्षात येईल. आपलं काही राहिले नाही ना? स्मशानातून बाहेर पडताना भडजींनी त्याला विचारले, नाही असं सांगत ते पुढे निघून गेले. त्याला मात्र मागे पाहताना आईची धडधडणारी चिता. नाही कसं? खूप काही राहिलयं मागे. आणि तो आवेगाने मागे फिरला, सरणा जवळ पडलेली चिमुटभर राग त्याने हातात घेतली. त्याला मागे फिरलेले पाहून एकाने विचारले, काही राहिलं होत का मागे? भरल्या डोळ्यांनी तो म्हणाला नाही. काही राहिलं नाही आता मागे आणि जे राहिलं आहे ते आता कधी कधीच परत येणार नाही. काही उरलेच नाही, सोबत घेण्यासारखे कोणाच काही राहिल नाही ना मागे?
अनेकांना स्वतः न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याची घानेरडी सवय जणू अंगिकारलेली असते. अशा व्यक्तींना कोणतेही काम किंवा त्यांच्या आसपासच्या ज्या व्यक्ती असतात त्यांचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करतात. आणि काम संपताच दुर करतात. स्वतः न केलेल्या काम सर्वांच्या समोर उगाळत बसतात.
एकदा सकाळी माझ्या हातात चहाचा कप होता, उभ्यान चहा पित होतो अचानक तोल गेला. कप सांभाळत पडल्यामुळे हाताच्या कोपर्याला लागले, कप ही फुटला. जर मी कप सोडला असता तर लागले नसते, आपल्याला हाही असाच अनुभव बराच वेळा आला असेल. शुल्लक गोष्टी सांभाळताना बहुमोल गोष्टी अशाच निसटून जातात, गरज असते फक्त शुल्लक गोष्टी सोडून देण्याची. मला विचारल नाही, मला बसायला खुर्चीच दिली नाही अशा गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत. सोडायला शिकल की मग पहा निसटून चाललेल्या अनेक चांगल्या गोष्टींमध्ये पुन्हा जीवन येईल. सुक्ष्म अहंकार चांगली माणसं ओळखू देत नाही, तो सोडला किंवा मागे काही राहीले नाही ना याची चिंता सोडा आणि पहा तुम्ही एका यशाच्या शिखरापर्यंत पोहचला असाल.

No comments:
Post a Comment