काल
‘फादर्स डे’च्या निमित्ताने “जागरूक पालक, यशस्वी बालक” या पुस्तकाच्या प्रकाशन
सोहळ्यासाठी पुणे येथे गेलो होतो. कार्यक्रम खूप छान पद्धतीने सुरु होता. त्या
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविण्याचा मान मला मिळाला. कार्यक्रमात सर्वांचे
सत्कार झाले, त्यापाठोपाठ मनोगते ही झाली. शेवटी अध्यक्षीय भाषणाची वेळ जवळ आली.
मग मी बोलायला उठलो. बोलता-बोलता मी हॉलमध्ये उपस्थित असणाऱ्या सर्वाना एक प्रश्न
केला. आज सकाळपासून किती व्यक्तींनी आपल्या वडिलांना ‘फादर्स डे’ निमित्त शुभेच्या
दिल्या त्यांनी हात वर करा? मला आश्चर्य वाटले, बोटावर मोजण्याइतपतच व्यक्तींनी
हात वर केला होता. त्यावर मी म्हणालो, इथे बसलेल्या सर्वांचे स्वत: च्या वडिलांविषयी
खूप प्रेम असेल परंतु ते प्रेम व्यक्त करणे सुद्धा आवश्यक असते.
कार्यक्रम
संपला आणि मी मुंबईला परत निघण्यासाठी बाहेर पडलो. चिंचवड रेल्वे स्टेशनच्या जवळ
पायी चालत जात असताना, स्टेशनच्या बाजूला असणाऱ्या रस्त्यावर बसून शालेय साहित्य
विकणाऱ्या कुटुंबाला पाहिल. दोन लहान मुले आणि नवरा बायको होते. काही व्यक्ती ते शालेय
साहित्य खरेदी करण्यासाठी तेथे आले होते. मी त्या दुकानाजवळ जाऊन उभा राहिलो.
थोडीशी गर्दी कमी झाल्याचे पाहून मी त्या दुकानदाराला म्हणालो, ही मुलं तुमची आहेत
ना? तो हो बोलला. कोणत्या शाळेत जातात? असा प्रश्न मी विचारला. त्यावर तो व्यक्ती
म्हणाला, साहेब शाळेत नाही जात, शाळेची फी भरायला पैसे नाहीत? हा धंदा करून कस बस
दोन वेळच पोट भरत आमचं.
आता
आमचं बोलण संपलं, मी स्टेशनकडे निघालो. माझ्या मनात त्याचे बोलणे तसेच्या तसे घर
करून राहिले. जो व्यक्ती मुलाच्या शाळेचे समान विकण्याचे दुकान मांडून बसला होता.
त्याची मुले शिक्षणापासून वंचित आहेत. याचे मला खूप वाईट वाटले. काही दिवसापूर्वी
मला व्हॉट्स अॅप वरती एका मित्राने एक वरील चित्र पाठविले होते. हे विदारक चित्र
जो पर्यंत आपल्या समाजातून नष्ठ होणार नाही, तो पर्यंत आपली प्रगती होणे शक्य
नाही. हे सत्य आहे. अनेकजण आपल्या आई वडिलांविषयी एक वाक्य बोलताना दिसतात. ते
म्हणजे “माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी काय केल?” असे प्रश्नार्थक वाक्य सारास
ऐकायला मिळते. त्यांनी जर वरील चित्रामधील खांद्यावर असलेली पिशवी बदलली तर काय
झाले असते? किंवा आपण सध्या काय करत असतो? याचा विचार करा. कोणत्याही परीस्थित
आपल्या आई-वडिलांनी काय केले? असा प्रश्न विचारण्यापेक्षा त्यांनी आपल्यासाठी खूप
काही केल्याच्या गोष्टी डोळ्यासमोर आणा. जीवन हे खूप सुंदर आहे त्याला आणखीन सुंदर
बनवा.
-
मंगेश विठ्ठल
कोळी.
-
मो. ९०२८७१३८२०
No comments:
Post a Comment