आज महाराष्ट्रात विविध अनेक विद्यापीठे उपलब्ध असून
त्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लहान-मोठे
कोर्स उपलब्ध झाल्याने अनेक विद्यार्थ्यांची ओढ अशा कोर्सकडे वाढत आहे. उत्तम
विद्यार्थी घडवायचा असेल तर ज्ञानाने परिपूर्ण असणारा अध्यापक वर्ग सुद्धा आवश्यक
असतो. गेल्या काही वर्षापासून राज्य शासनाने केंद्र शासनाच्या ‘केंद्रीय शिक्षक
पात्रता परीक्षा’च्या आधारावर राज्यातही ‘शिक्षक पात्रता परीक्षा’ लागू केली.
त्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा घेण्याचा निर्णय
झाला. यंदाच्या वर्षीची शिक्षक पात्रता पुढच्या महिन्यात घेण्यात येणार आहे.
बी.एड., एम.एड., पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना हि परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय अध्यापक
म्हणून पात्र समजले जात नाही.
शिक्षक पात्रता परीक्षा ही दोन स्तरासाठी घेतली जाते.
पहिला स्तर आहे म्हणजे इयत्ता पहिली ते पाचवी आणि दुसरा स्तर इयत्ता सहावी ते आठवी.
सर्व व्यवस्थापने, सर्व मंडळे, सर्व
माध्यमे, अनुदानित, विना अनुदानित,
कायम विना अनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक / शिक्षक पदावर
नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमत: ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असणार आहे.
या परीक्षेसंबंधी सर्व शासन निर्णय, अनुषंगिक माहिती,
सूचना तसेच ऑनलाईन अर्ज भरणे, अर्ज स्वीकृती,
परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील महाराष्ट्र राज्य
परीक्षा परिषदेच्या www.mahatet.in आणि www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा -2017 (MAHATET 2017) परीक्षेचा ऑनलाईन अर्ज आणि शुल्क
भरण्याचा कालावधी 15 जून 2017 ते 30 जून 2017 असा आहे.
प्रवेशपत्राची ऑनलाईन प्रिंट 10 जुलै 2017 ते 22 जुलै 2017 या कालावधीत
काढता येईल. तर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर –I ची वेळ
22 जुलै 2017 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1.00 अशी आहे. तर शिक्षक पात्रता परीक्षा
पेपर –II ची वेळ 22 जुलै 2017 रोजी दुपारी 2.00 ते 4.30 अशी
असेल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त सुखदेव
ढेरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. परंतु एक प्रश्न आणखी अनुत्तरित
राहतो तो म्हणजे हि परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळते का?
त्यासाठी शासन नक्की काय उपाय योजना करेल हे आता येणारा काळच ठरवेल.
-
मंगेश
विठ्ठल कोळी
-
मो. ९०२८७१३८२०
No comments:
Post a Comment