https://www.mahanews.gov.in/Home/MahaNewsHome.aspx
माहिती तंत्रज्ञानाचे जाळे खेडोपाडी जाऊन पोहोचले आहे. शेतकरीदेखील
वीज बील ऑनलाइन पेमेंट करून भरत आहे. स्मार्ट फोनच्या माध्यमातून शेतकरी स्मार्ट
झाले आहेत. शेतमालाचे ऑनलाइन भाव पाहणे, हवामानाचा
अंदाज घेणे, कृषीविषयक सल्ला घेणे आदी कामे शेतकरी
मोबाइलद्वारे करू लागले आहेत. कृषी क्षेत्राविषयी अत्यंत उपयुक्त माहिती देणारे
अनेक अॅप्स गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. शेतीसंदर्भातील माहिती देण्याऱ्या अशा
मोबाइल अॅप्सचा अधिकाधिक शेतकऱ्यानी वापर करावा, असे आवाहन
कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. काही उपयुक्त अॅप्सची माहिती....
1) मोबाईल अॅपचे नाव - शेतकरी
मासिक (Shetkari Masik)
अॅपद्वारे उपलब्ध होणारी माहिती - शेतकरी
मासिकातील लेख
मोबाईल अॅप डाऊनलोड करण्याची सुविधा स्थळ – गुगल
प्ले स्टोअर, फार्मर पोर्टल, एम किसान पोर्टल
2) मोबाईल अॅपचे नाव - (Maharain)
अॅपद्वारे उपलब्ध होणारी माहिती - मंडळ, तालुका, जिल्हा, विभाग स्तरावरील आजचा,पर्यंतचा व सर्वसाधारण पाऊस
मोबाईल अॅप डाऊनलोड करण्याची सुविधा स्थळ – महारेन
3) मोबाईल अॅपचे नाव - क्रॉप
क्लिनिक (Crop clinic)
अॅपद्वारे उपलब्ध होणारी माहिती - सोयाबीन, कापूस, भात, तूर
व हरभरा या ५ पिकांच्या किडी व रोग व त्यांच्या उपाययोजना किडनाशके ट्रेड नेम व
दुकानदाराची यादी
मोबाईल अॅप डाऊनलोड करण्याची सुविधा स्थळ – mahaagriiqc.gov.in
4) मोबाईल अॅपचे नाव - कृषि
मित्र (Krishi mitra)
अॅपद्वारे उपलब्ध होणारी माहिती - तालुक्यातील
खते, बियाणे, औषधे
विक्रेत्यांची माहिती
मोबाईल अॅप डाऊनलोड करण्याची सुविधा स्थळ – mahaagriiqc.gov.in
5) मोबाईल अॅपचे नाव - एम किसान
भारत (mKisan India)
अॅपद्वारे उपलब्ध होणारी माहिती - कृषि हवामान
विषयक शेतीसाठी उपयुक्त सल्ले
मोबाईल अॅप डाऊनलोड करण्याची सुविधा स्थळ – फार्मर
पोर्टल, एम किसान पोर्टल
6) मोबाईल अॅपचे नाव - किसान
सुविधा (Kisan Suvidha)
अॅपद्वारे उपलब्ध होणारी माहिती - हवामान, कृषि निविष्ठा व्यापारी, बाजारभाव
पीक संरक्षण व तज्ज्ञ सल्ला याबाबत मागणी
मोबाईल अॅप डाऊनलोड करण्याची सुविधा स्थळ – गुगल
प्ले स्टोअर, फार्मर पोर्टल, एम किसान पोर्टल
7) मोबाईल अॅपचे नाव - पुसा
कृषि (Pusa Krishi)
अॅपद्वारे उपलब्ध होणारी माहिती - पिकांच्या
विविध जाती व अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती
मोबाईल अॅप डाऊनलोड करण्याची सुविधा स्थळ – गुगल
प्ले स्टोअर, फार्मर पोर्टल, एम किसान पोर्टल
8) मोबाईल अॅपचे नाव - क्रॉप
इनशुरन्स (Crop Insurance)
अॅपद्वारे उपलब्ध होणारी माहिती - पिक विमा
माहिती
मोबाईल अॅप डाऊनलोड करण्याची सुविधा स्थळ – गुगल
प्ले स्टोअर, फार्मर पोर्टल, एम किसान पोर्टल
9) मोबाईल अॅपचे नाव - डिजीटल
मंडी भारत & (Digital Mandi India)
अॅपद्वारे उपलब्ध होणारी माहिती - तालुका, जिल्हा, राज्यस्तरीय बाजारसमितीचे
शेतमालाचे दर
मोबाईल अॅप डाऊनलोड करण्याची सुविधा स्थळ – गुगल
प्ले स्टोअर, फार्मर पोर्टल, एम किसान पोर्टल
10) मोबाईल अॅपचे नाव - अॅग्री
मार्केट (AgriMarket)
अॅपद्वारे उपलब्ध होणारी माहिती - ५० किमी
परिसरातील शेती उत्पादनाचे बाजारभाव व जिल्हा/राज्य/देश पातळीवरील महत्तम दर
मोबाईल अॅप डाऊनलोड करण्याची सुविधा स्थळ – गुगल
प्ले स्टोअर, फार्मर पोर्टल, एम किसान पोर्टल
11) मोबाईल अॅपचे नाव - पशु
पोषण (Pashu Poshan)
अॅपद्वारे उपलब्ध होणारी माहिती - जनावराचे
आहार विषयक मार्गदर्शन
मोबाईल अॅप डाऊनलोड करण्याची सुविधा स्थळ – गुगल
प्ले स्टोअर, फार्मर पोर्टल, एम किसान पोर्टल
12) मोबाईल अॅपचे नाव - cotton
(Kapus)
अॅपद्वारे उपलब्ध होणारी माहिती - कापूस लागवड
तंत्रज्ञानाची माहिती
मोबाईल अॅप डाऊनलोड करण्याची सुविधा स्थळ – गुगल
प्ले स्टोअर
13) मोबाईल अॅपचे नाव - एकात्मिक
कीड व्यवस्थापन (IPM)
अॅपद्वारे उपलब्ध होणारी माहिती - मुख्य
पिकावरील कीड व्यवस्थापनाची माहिती
मोबाईल अॅप डाऊनलोड करण्याची सुविधा स्थळ – गुगल
प्ले स्टोअर
14) मोबाईल अॅपचे नाव - हळद
लागवड, (halad Lagwad)
अॅपद्वारे उपलब्ध होणारी माहिती - हळद लागवड, प्रक्रिया व तंत्रज्ञानाची माहिती
मोबाईल अॅप डाऊनलोड करण्याची सुविधा स्थळ – गुगल
प्ले स्टोअर
15) मोबाईल अॅपचे नाव - पिक
पोषण (Plant nutrition)
अॅपद्वारे उपलब्ध होणारी माहिती - पिकांसाठी
अन्नद्रव्याची गरज, आवश्यकता कमतरतेची लक्षणे, अन्नद्रव्ये संवेदनशील पिके, सुक्ष्म अन्नद्रव्ये
इ.बाबत माहिती
मोबाईल अॅप डाऊनलोड करण्याची सुविधा स्थळ – गुगल
प्ले स्टोअर
16) मोबाईल अॅपचे नाव - लिंबू
वर्गीय फळझाडांची लागवड (Citrus Cultivaiton)
अॅपद्वारे उपलब्ध होणारी माहिती - मोसंबी व
लिंबूवर्गीय फळझाडांच्या लागवडीबाबत माहिती
मोबाईल अॅप डाऊनलोड करण्याची सुविधा स्थळ – गुगल
प्ले स्टोअर
17) मोबाईल अॅपचे नाव - शेकरु (Shekaru)
अॅपद्वारे उपलब्ध होणारी माहिती - कृषि योजना, प्रदर्शने, प्रशिक्षण याबाबतची
माहिती
मोबाईल अॅप डाऊनलोड करण्याची सुविधा स्थळ – गुगल
प्ले स्टोअर
18) मोबाईल अॅपचे
नाव - इफ्को किसान (IFFCO
Kisan)
अॅपद्वारे उपलब्ध होणारी माहिती – हवामान, बाजारसमिती दर, तज्ज्ञ, ज्ञानभांडार, सल्ला, बातम्या,
बाजार प्रोफाईल, जॉब्स, व्हिडीओज
मोबाईल अॅप डाऊनलोड करण्याची सुविधा स्थळ – गुगल
प्ले स्टोअर
कृषी विभाग संकेतस्थळ – www.krishi.maharashtra.gov.in
संकलन – मंगेश विठ्ठल कोळी
मो.९०२८७१३८२०
संकलन – मंगेश विठ्ठल कोळी
मो.९०२८७१३८२०
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास
आम्हाला आनंदच वाटेल.
No comments:
Post a Comment