एक गृहिणी आपल्या मुलाला घेवून बाजारातून चालली होती, त्यावेळेस त्या बाजारातून एका चोराला काही शिपाई पकडून नेत होते, त्या मुलाने आपल्या आईला विचारले "आई तो कोण आहे आणि त्याच्या भोवती
शिपाई का आहेत?" आई म्हणाली "तो चोर आहे, त्याला पकडले आहे, त्याला आता शिक्षा होईल व तो
तुरुंगात जाईल".
थोडे पुढे गेल्यावर पुढून नगरीचा राजा येत होता आणि त्याच्या भोवती पण
शिपाई होते, त्यावेळेस मुलगा लगेच आईला म्हणाला
"आई तो बघ आजून एक चोर आला", आई म्हणाली "हळू
बोल, ते मारतील आपल्याला, तो राजा
आहे."
मुलगा आईला म्हणाला "काय फरक आहे? राजा
भोवती पण शिपाई आहे आणि चोरा भोवती पण शिपाई आहे."
आई म्हणाली "जमीन आसमानचा फरक आहे, त्या
चोराच्या भोवती जे शिपाई होते त्यांच्या ताब्यात तो चोर होता, त्याला काहीही करायचे स्वतंत्र नाही, जिकडे नेतील
तिकडे जायचं, जिथे ठेवतील तिथे राहायचे, देतील ते खायचं, त्याला स्वतच्या मनाच काहीच करता
येत नाही."
राजाच्या भोवती जे शिपाई आहेत ते राजाच्या ताब्यात आहेत,
राजा सांगेन तिकडे नेतील, जे सांगणार ते करणार,
राजा बोलला कि तुम्ही जा मला एकटे राहू देत, राजा
मुक्त आहे."
"आपले मन, आपल्या भावना आणि आपले विचार हे शिपाई आहेत',
आपण त्यांच्या ताब्यात असलो तर आपण 'चोर'
आहोत, ते आपल्या ताब्यात असले तर आपण 'राजा' आहोत. *निवड तुमची
आहे.*
- श्री. मंगेश विठ्ठल कोळी,
- मो. 9028713820

अत्यंत उद्बोधक
ReplyDeleteअत्यंत उद्बोधक
ReplyDeleteखूपच छान
ReplyDeleteसुंदर
ReplyDeleteKhup Chan speech ahe Mangesh Sir
ReplyDeleteBarobar aahe Sir
ReplyDelete