Tuesday, July 25, 2017

बदलते तंत्रज्ञान...

काही दिवसापूर्वी दहावी आणि बारावीचे निकालही जाहीर झाले. त्याच बरोबर अनेक विद्यापीठांचे निकाल जाहीर झाले काही विद्यापीठांचे होत आहेत. सर्व विद्यार्थी आणि पालकांची नवीन शैक्षणिक ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी धावपळ सुरु झाली. बऱ्याच विद्यार्थ्यांना मनासारखे कॉलेज मिळाले. काहीना पसंत नसलेल्या किंवा आई वडिलांच्या इच्छे खातर प्रवेश घ्यावा लागत आहे. प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याचे भविष्य उज्ज्वल व्हावे, यासाठी चाललेली धावपळ ही मुलांना जाणवत नाही. काही विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने उत्तम कॉलेज मध्ये प्रवेश घेता येत नाही. दुसऱ्या बाजूला आर्थिक परिस्थिती उत्तम असणारे विद्यार्थी स्वत:चे भविष्य स्वत: निवडताना दिसत आहेत. असे विद्यार्थी खूप लहान वयात आपण भविष्यात काय करणार आहे किंवा आपले ध्येय स्पष्टपणे ठरवून वाटचाल करताना दिसत आहेत.
आर्थिक परिस्थिती उत्तम असणाऱ्या परिवारातील विद्यार्थ्याचे काही बरे वाईट झाले. ज्यांची बुद्धी कमकूवत आहे ते व्यक्ती विविध प्रकारचे तर्क वितर्क मांडायला सुरु करतात. न्यूज चॅनेलवरती किंवा वृत्तपत्रामध्ये स्वत:च्या बुद्धीला जसे योग्य वाटते तसे प्रसिद्ध करतात. काहींच्या मते श्रीमंत असणाऱ्या व्यक्ती आपल्या पाल्यांच्याकडे लक्ष न देता स्वत:च्या करिअरकडे किंवा कामामध्ये एवढे गुंतून जातात. इतरांच्याकडे लक्ष देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसतो. अशा पालकांची पाल्य आत्महत्या किंवा विकृतग्रस्त झालेली दिसतात. याच्या पाठीमागे काही वेगळीच कारणे असतात. काही व्यक्ती स्वत: ला हुशार समजून आपापली मते मांडत असताना आपल्याला पहावयास मिळतात.
मुलांची जपणूक किंवा त्यांच्यावरती होणारे संस्कार कसे होत आहेत याकडे काळजीपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. गेल्या दहावर्षात तंत्रज्ञानाने खूप प्रगती केली आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग कशा पद्धतीने केला पाहिजे हे सांगणे काळाची गरज आहे. लहान मुलांच्या हाती अनेक अॅप असणारा मोबाईल दिला जातो. त्याच्या वापर पाल्य कशासाठी करतो हे पाहायला हवे. जास्त पैशाचा किंवा श्रीमंती दर्शविणारा मोबाईलची पाल्यांना कितपत आवश्यकता आहे किंवा नाही हे समजून घेतले पाहिजे. नव तरुणांनी जरुरू बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करावा. त्याच्या आहारी न जाता किंवा त्याचे व्यसन न होण्याची काळजी पालक आणि पाल्य यांनी घेतली पाहिजे. अनेक नवनवीन कंपनी विविध प्रकारच्या ऑफर्स देऊन आकर्षित करतात. स्वत: आवश्यक असणाऱ्या तंत्रज्ञान घेतले पाहिजे.
-       मंगेश विठ्ठल कोळी.
-       मो. ९०२८७१३८२०

No comments:

Post a Comment