Wednesday, July 5, 2017

बदलत्या शिक्षणाची आवश्यकता....


आपला भारत देश कृषी प्रधान म्हणून ओळखला जात होता परंतु आज भारत अनेक क्षेत्रात प्रगती पथावर वाटचाल करत आहे. अनेक नवनवीन विश्वविक्रम करून जगात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. हे आज सर्व जग पाहत आहे. काही गोष्टीमध्ये तर भारत हा जगाचे प्रतिनिधित्व करत आहे. जगभरात गुगल हे सर्वाधिक सर्च केले जाणारे संकेतस्थळ आहे परंतु त्या गुगलच्या सर्वोच्च मुख्याधिकारी हा एक भारतीय आहे ते म्हणजे सुंदर पिचाई होय. त्याच प्रमाणे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सुद्धा सीईओ हे सत्या नादेला हे सुद्धा भारतीय वंशाचे आहेत. या व्यतिरिक्त अनेक भारतीय संपूर्ण देशामध्ये विविध ठिकाणी मुख्य जबाबदाऱ्या पेलताना दिसतील. यामध्ये आणखीन भर पडेल हे निश्चित आहे.
भारतामध्ये शिक्षण पद्धती चूकीची आहे, असे मी मनात नाही. पण आठवीपासूनच व्यावसायिक शिक्षण मुलांना दिले पाहिजे. त्यामुळे त्याचा पाया पक्का होण्यास मदत होईल आणि त्यांना विषय ज्ञान जागृत होईल. उत्तम प्रकारचे शिक्षण देऊन नोकर निर्माण करण्यापेक्षा मोठ मोठे व्यावसायिक निर्माण करणे आज काळाची गरज आहे. दहावी आणि बारावीला गेल्यावर ते स्वतः आपले करिअर निवडण्यासाठी त्यांना अडचणी निर्माण होणार नाहीत. ते निश्चितपणे आपले ध्येय साध्य करण्यास उत्सुक राहतील. कृषी क्षेत्रावरचे शिक्षण हे मुलांना आठवीपासूनच दिले पाहिजे. मुख्य म्हणजेपारंपरिक शिक्षण पद्धत बदलून  व्यावसायिक आणि काळाबरोबर बदलणारे शिक्षण पद्धतीचा समावेश करायला पाहिजे. कारण आताच्या युगात इतिहास, मराठी या विषय कमी मार्कचे ठेवून आणि त्या विषयांना जोडून व्यावसायिक विषय घ्यायला.
महाराष्ट्रात मराठी शिक्षित उच्चशिक्षित, रोजगार तरुण- तरुणींसाठी महाराष्ट्र शासनाने लवकरच असे अभ्यासक्रम सुरु केले पाहिजेत. त्यांची माहिती शासनाने विद्यार्थ्यापर्यंत मिळवली पाहिजे. भारतामध्ये शिक्षण पूर्ण झाले तरी आपल्याला निश्चित नोकरी मिळेलच असे नाही. त्यामुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते. त्यामुळे शिक्षण पद्धतीमध्ये थोडा फार बदल आवश्यक आहे. सुशिक्षित बेकायदा महिन्याला मानधन चालू केले पाहिजे. कारण ते नोकरी विषयी फॉर्म त्या मानधनातून भरतील. आपले नशीब आजमवण्याचा प्रयत्न नक्की करतील. अनेक तरुणांना नवीन खूप काही करण्याची संधी उपलब्ध होईल. यातून एक उत्तम साक्षर आणि उत्साही पिढी घडवण्यास मदत होईल.
-       मंगेश विठ्ठल कोळी.
-       मो. ९०२८७१३८२०

No comments:

Post a Comment