Tuesday, July 11, 2017

शिक्षणासाठी फिरती शाळा हवी...


बेटी बचाओ, बेटी पढाओ, शिक्षण हक्क कायदा, बालमजुरी बंदी, फिरते शौचालय, फिरते खाद्य पदार्थांच्या गाड्या, फिरते न्यायालय असे अनेक उपक्रम राज्य शासन आणि केंद्र शासन राबविते. या सर्वांचा उद्देश एकाच आहे, आपला समाज उत्तम सुसंकृत झाला पाहिजे. Contents
विद्यार्थी शाळेपर्यंत येऊ शकत नसेल तर शाळाच विद्यार्थ्यांपर्यंत जावी यासाठी फिरत्या शाळेची संकल्पना पुढे आली पाहिजे. भारतासारख्या विकसनशील देशात शिक्षणाची फार आवश्यकता आहे. विशेष करून शाळा बाह्य मुलांना शिक्षण देणे गरजेचे आहे. एखाद्या  वाहनाला शाळेत परावर्तीत करून शाळाबाह्य मुलांना शिकविण्याचा अनोखा उपक्रम सुरू करायला हवा.
विविध धोकादायक उद्योगात काम करणाऱ्या बालकामगारांचे शैक्षणिक पुनर्वसन केले. प्रकल्पाअंतर्गत बालकामगारांना प्रवेश देऊन बालमजूर शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु आजही बालकामगार, शाळाबाह्य मुले आढळून येतात अशा मुलांची नावे ज्या त्या विभागातील शासनमान्य शाळेच्या पटावर आहेत. परंतु, ती शाळेत जात नाहीत. इरतत्र भटकणे किंवा बालमजुरी करणे यातच त्यांचे बालपण हरवून गेले आहे. तसेच रोजीरोटीसाठी गावोगावी भटकणाऱ्या स्थलांतरित कुटुंबातील मुलेही शिक्षणापासून वंचित आहेत. अशा बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. यासाठी शाळाबाह्य व स्थलांतरित कुटुंबातील मुलांना शिक्षणाची गोडी लावण्यासाठी काहीतरी वेगळा प्रयोग करावा यादृष्टिकोनातून फिरती शाळेचा विचार करण्यात यावा. एकाद्या वाहनाचे रुपांतर एका चालत्या फिरत्या वर्ग खोलीत केले पाहिजे. हे वाहन विविध ठिकाणी रस्त्यावर तसेच स्थलांतरित कुटुंबाच्या पालांवर तसेच आदिवासी किंवा जिथे शिक्षण पोहचू शकत नाही आहा ठिकाणी जाऊन तेथील शाळाबाह्य व बालमजूर बालकांना त्यांच्या घरापर्यंत जाऊन शिकविण्याचे काम करणे आवश्यक आहे.
आज इंग्रजी माध्यमातील शिक्षण देणाऱ्या शाळांची संख्या वाढत आहे परंतु विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेतून उत्तमोत्तम शिक्षण कसे देता येईल याची एक संरचना शिक्षण विभागाने करायला हवी. अशा शिक्षणामध्ये प्रामुख्याने अक्षर ओळख, अंक ओळख, स्वच्छता, मूल्यशिक्षण, संस्कार, खेळ, गाणी, कविता, इंग्रजीचे ज्ञान तसेच हस्तकला व इतर प्रशिक्षणही देण्याचे नियोजन केले पाहिजे. सदर मुलांच्या पालकांच्या आर्थिक व इतर समस्या समजावून घेऊन आवश्यक ते समुपदेशन करण्यात आले पाहिजे. शहरातील तसेच ग्रामीण भागातील शाळाबाह्य मुलांना शिक्षणाची आवड निर्माण होईल व बालकांचे बालपण त्यांना परत मिळवून देता येईल यासाठी एक आगळावेगळा अभिनव उपक्रम लवकरात लवकर सर्वत्र सुरु करायला हवा.
-मंगेश विठ्ठल कोळी, ९०२८७१३८२०

No comments:

Post a Comment