Wednesday, August 23, 2017

अभिनंदनीय पत्र......


दिसते तसे नसते म्हणून.....


 

आपल्या मराठी मध्ये अनेक म्हणी आहेत. त्यांचा अर्थ देखील खूप मोठे आहेत. अनेक भावना थोडक्यात विषय आणि आशय कळण्यासाठी या म्हणींचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. तसाच काहीसा अनुभव देणारा विषय आज वाचण्यात आला. मंदिराबाहेर नेहमीप्रमाणेच भिक्षेकरी तपासत होतो. तपासुन घेण्यासाठी, औषधांसाठी नेहमीचीच भिक्षेकऱ्याची झुंबड. सहज लक्ष गेलं एका कोपऱ्यात, तिकडे दगडावर एक बाबा बसलेले दिसले. बसणं ताठ, नाक तरतरीत आणि सरळ, घारुळे डोळे, अंगावर साधे पण स्वच्छ कपडे. बराच वेळ मी तिरक्या नजरेने पहात होतो, हे भिक्षेकरी नक्कीच नव्हेत..! सहज दिसलं,  उजव्या घोट्यापासुन पाय नव्हता त्यांना, बाजुलाच कुबडी टेकवुन ठेवली होती.

थोड्या वेळानं सहज लक्ष गेलं, कोणीतरी काहीतरी देत होतं आणि ते घेत होते. अरे ! माझा अंदाज चुकला तर. उत्सुकता वाढली म्हणुन त्यांच्याजवळ जायला लागलो तर कुणीतरी म्हणालं, डॉक्टर, नका जावु, वेडा आहे तो ! उत्सुकता स्वस्थ बसु देइना म्हणुन  गेलो, मला वाटलं ते मला पाहुन हात पुढे करतील. पण त्यांचा हात पुढं आलाच नाही तिथंही अंदाज चुकला माझा.

मीच म्हणालो, बाबा काही त्रास?

कुबडी घेत हळुच उठत ते म्हणाले,

Good afternoon doctor...... I think I may have some eye problem in my right eye .... 

मी उडालोच इतकं अस्खलीत इंग्लिश ऐकुन... 

मी धक्क्यातुन बाहेर येत, डोळा बघितला, पिकलेला मोतीबिंदु होता, मी म्हणालो मोतीबिंदु आहे बाबा, ऑपरेशन करावं लागेल.

तसे म्हणाले, oh, cataract ?  I had cataract operation in 1999 for my left eye in Ruby Hospital but.

हा प्रकार काहितरी वेगळा आहे हे आता पक्कं जाणवलं.

म्हणालो, बाबा, तुम्ही इथं काय करताय

मी रोजच इथं येतो दोन तास.

हो पण का? मला तर तुम्ही चांगले शिकलेले वाटता

शिकलेले ? या शब्दावर जोर देत ते हसत म्हणाले, शिकलेले

म्हणालो,  बाबा तुम्ही थट्टा करताय का माझी?

Oh no doc... Why would I ?... Sorry if I hurt you ! 

हर्ट नाही पण मला काही कळत नाहिये, काय चाललंय बाबा.

कळुन घेवुन काय करणार आहात डॉक्टर ?  

ओके, चला आपण तिकडे बसु, नाहितर लोक तुम्हालाही वेडा म्हणतील. असं म्हणुन ते हसायला लागले.

आम्ही दोघंही थोडं बाजुला जावुन एका टपरीत बसलो.

Well Doctor, I am Mechanical Engineer. बाबांनी इंग्लिशमध्येच सुरुवात केली. मी xxxxx या कंपनीत सिनीअर मशीन ऑपरेटर होतो, एका नविन ऑपरेटरला शिकवत असतांना पाय मशीन मध्ये अडकला, आणि हातात कुबडी आली. कंपनीने सर्व खर्च करुन वर आणखी थोडे पैसे देवुन घरी बसवलं. लंगड्या बैलाला कोण ठेवेल

मग स्वतःचं छोटं वर्कशॉप काढलं, मस्त घर घेतलं, मुलगाही मेकनिकल इंजिनियर  आहे, वर्कशॉप वाढवुन त्याने छोटी कंपनी टाकली. 

मी चक्रावलो, बाबा पण मग तुम्ही इथं कसे?

मी...? नशीबाचे भोग.

मुलाने व्यवसाय वाढवायचा म्हणुन कंपनी आणि घर दोन्ही विकलं. म्हटलं पोराची भरभराट होत्येय. विकुदे !

विकुन सगळं घेवुन तो गेला जपानला आणि आम्ही इथे उरलो जपानी बाहुल्या म्हणुन. ते हसायला लागले. हसणंही इतकं करुण असु शकतं हे मी अनुभवलं..! 

बाबा पण तुमच्याकडे स्किल आहे, लाथ माराल तिथं पाणी काढाल तुम्ही.

तुटलेल्या उजव्या पायाकडे पहात बाबा म्हणाले, लाथ?  कुठे आणि कशी मारु सांगा

मी ओशाळलो, मलाच वाईट वाटलं.

आय मीन बाबा कुणीही नोकरी देईल तुम्हाला अजुनही, कारण या क्षेत्रातला तुमचा अनुभव खुप आहे.

Yes doctor, मी एका वर्कशॉपमध्ये आहेच कामाला. 7000 मिळतात मला.

माझ्या डोक्यातला तिढा काही सुटत नव्हता.

अहो बाबा तरी मग  तुम्ही इथं कसे?

डॉक्टर, मुलगा गेल्यावर एका  चाळीत पत्र्याचं शेड घेतलंय भाड्यानं, तिथं मी आणि माझी बायको राहतो, तीला Paralysis आहे ती जागेवरुन उठु शकत नाही. 

मी 10 ते 5 ड्युटी करतो, 5-7 इथं बसतो, आणि घरी जावुन "तिघांचा" स्वयंपाक करतो.

बाबा आत्ताच म्हणालात, घरी तुम्ही आणि बायको असता मग तिघांचा स्वयंपाक

डॉक्टर, माझ्या लहानपणी माझी आई वारली, माझ्या जिवलग मित्राच्या आईनेच त्याच्याबरोबर मलाही सांभाळलं, दोन वर्षापूर्वी तो मित्र वारला हार्ट अकने, 92 वर्षाच्या त्याच्या आईला मी आणलं मग माझ्याच पत्र्यात. ती कुठं जाईल आता.

मी सुन्न झालो. या बाबाचे स्वतःचे सर्व हाल,  बायको अपंग, स्वतःला पाय नाही, घर धड नाही, जे होतं ते मुलानं विकलं. त्यात मित्राच्या म्हाता-या आईला सांभाळतोय.

बाबा मुलानं तुम्हाला रस्त्यावर आणलं, तुम्हाला राग नाही येत त्याचा

No no डॉक्टर, अहो ते त्याच्यासाठीच कमावलं होतं, घेतलं त्याने, काय चुकलं त्यात?

बाबा घेण्याची पद्धत चुकली त्याची, त्यानं ओरबाडुन घेतलं सर्व.

डॉक्टर, अहो आपले पुर्वज माकड होते, शेपुट गेलं तरी ओरबाडायची सवय जाइल का माणसाची?  असं म्हणुन हसता हसता तोंड फिरवलं. ते हसणं होतं कि लपवलेले हुंदके?

बाबा, कळलं मला 7000 मध्ये भागत नाही तिघांचं म्हणुन तुम्ही इथं येता, बरोबर

No you are wrong doctor. 7000 मध्ये मी सर्व मनेज करतोच सगळं, पण जी म्हातारी आई आहे मित्राची तीला डायबेटीस आणि ब्लड प्रेशर दोन्हीची औषधं चालु आहेत, ती मात्र मनेज होत नाहित या  सात हजारात.

मी येतो दोन तास इथे, कुणी दिलेलं अन्न मी स्विकारत नाही, पैसे कुणी दिले तर मात्र घेतो.... तीची महिन्याची  औषधं ओळखीच्या मेडिकल स्टोअर मधुन आधीच घेतो आणि रोज दोन तासात जे पैसे मिळतील ते पैसे मेडिकल वाल्याला रोजच्या रोज देतो.! 

या बाबाला त्याचा स्वतःचा मुलगा सोडुन गेलाय आणि हा बसलाय दुस-याची आई सांभाळत.

डोळ्यातुन पाणी येवु न देण्याचा आटोकाट प्रयत्न करुनही डोळे शेवटी मला  दगा देतातच.

बाबा, दुसऱ्याच्या आईसाठी तुम्ही इथं पैसे मागायला येता

दुसऱ्याची ? अहो माझ्या लहानपणी खुप केलंय तीनं माझं. आता माझी पाळी आहे इतकंच..! 

मी त्या दोघींना सांगितलंय 5-7 आणखी एक काम मिळालंय म्हणुन.

बाबा, आणि त्यांना जर कळलं तुम्ही इथे मागता म्हणुन तर

अहो कसं कळेल ? दोघीपण खाटेवर पडुन. इकडच्या कुशीवरुन तिकडं होता येत नाही त्यांना मी केल्याशिवाय...येतीलच कश्या त्या ?  हा...हा...द्या टाळी ! 

हुंदका लपवण्याची आता माझी पाळी होती पण बाबांइतका मी सराइत नव्हतो  या लपवालपवीत. 

ब-याच वेळानं लक्षात आलं टाळीसाठी दिलेला बाबांचा हात माझ्या हातात तसाच होता, तोच हात दोन्ही हातात घेवुन मी त्यांना विचारलं, बाबा तुमच्या आईला  मी डायबेटीस आणि ब्लड प्रेशरच्या गोळ्या कायम स्वरुपी दिल्या माझ्याकडुन तर  तुम्हाला इथं हे असं मागावं लागणार नाही right ? 

म्हणाले, no doctor, तुम्ही भिका-यांसाठी काम करता, तीला तुम्ही गोळ्या देणार म्हणजे एका अर्थी ती भिकारीच झाली ना? मी आहे अजुन समर्थ, तीचा मुलगा म्हणुन. मला कुणी भिकारी म्हणालं तरी चालेल पण तीला नाही.

OK Doctor, जावु मी आता ? घरी जावुन स्वयंपाक करायचा आहे अजुन.

बाबा भिका-यांचा डॉक्टर म्हणुन नाही, तुमचा मुलगा समजुन घ्या ना आज्जीसाठी औषधं.

हात सोडवत ते म्हणाले, डॉक्टर,  आता या नात्यात मला अडकवु नका  please, एक गेलाय सोडुन.

आज मला आशेला लावुन उद्या तुम्ही गेलात तर? सहन करायची ताकत नाही राहिली आता.! 

असं म्हणंत ते कुबड्यांवर निघाले सुद्धा. जाताना हळुच डोक्यावर हात ठेवला,  म्हणाले, काळजी घे बेटा स्वतःची.

शब्दातुन त्यांनी मी लावलेलं मुलाचं नातं नाकारलं, पण डोक्यावरल्या हाताच्या गरम स्पर्शातुन जाणवलं,  त्यांनी हे नातं मनोमन स्विकारलंय. या माणसाला पाठिमागुनच नमस्कार करण्यासाठी माझे हात आपोआपच जुळले. कोणत्याही व्यक्ती विषयी सर्व प्रथम सत्य जाणून घ्या मगच आपले मत व्यक्त करा.

Monday, August 21, 2017

चुकीचे संगोपन....

आज सकाळी मोबाईल पाहिला खूप सारे मेसेज आले होते. मेसेज वाचताना एक मेसेज खूप छान आणि आपल्या जीवनात प्रत्येकाने त्याचा अवलंब केल्यास फारच छान होईल. तो मेसेज पुढीलप्रमाणे... एका विज्ञानाच्या वर्गात झालेला कीस्सा. शिक्षकांचं वर्गात आगमन होताच वर्गातला गोंधळ गोंगाट एकदम शांत झाला. आज सरांनी आपल्या सोबत काहीतरी प्रयोगाचं सामान आणलं होतं. मुलं कुतुहलानी सरांनी आणलेली झाडाची फांदी आणि त्यावर असलेला फुलपाखराचा कोष बघायला लागले.  सरांनी आपला वर्ग सुरू केला.
" फुलपाखराचे जीवन चक्र " शिक्षकांचं शिकवणं सुरु झालं होतं, पण मुलांचं सगळं लक्ष त्या कोषाकडे होतं. त्यातलं फुलपाखरु नुकतच त्या कोषातुन बाहेर पडायच्या मार्गावर होतं. ते फुलपाखरु त्या बंद कोषातुन बाहेर पडायला झटत  होतं. त्याची ती धडपड, वेदना सगळी मुलं अगदी बारकाईनं बघत होते.
तितक्यात वर्गात परिचराने येऊन सांगितलं ..
" सर , तुम्हाला प्रिंन्सीपल सरांनी ताबडतोब बोलावलंय ऑफीसात .."
शिकवणं थांबवुन सर वर्गाकडे उद्देशुन म्हणाले," मुलांनो, मी जरा भेटुन येतो सरांना. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, फुलपाखरु कितीही त्रासात आहे  असं वाटलं,  तरिही ते त्याच्याच चांगल्यासाठी असणार आहे, तेव्हा तुम्ही त्याला कुठल्याही प्रकारची मदत करु नका. तुमची मदत त्याला हानीकारक होऊ शकते. " शिक्षक निघुन गेले. जसा सरांचा पाय वर्गाबाहेर पडला तशी सगळी मुलं पटापट येऊन त्या टेबला भोवती जमा झाले आणि त्याची ती लांबुन दिसणारी धडपड जवळुन पाहु लागले.
           आता  त्यांच्यात चर्चा मोठ्यानं सुरु झाली होती.  "ये बघ ना त्याला कीती त्रास होतोय." "अरे त्याच्या कोषाला थोडासा बाजुला कर ना." "बापरे, कीती दुखत असेल त्याला"
"काही होणार नाही त्याला, काढ तो कोष बाजुला," अशातच एका मुलाने पटकन हात समोर केला आणि कोष बाजुला केला. मुलांच्या अपेक्षेप्रमाणे फुलपाखराने पटापट पंख पसरुन उडुन जायला हवे होते. पण ते तसे न होता भलतेच झाले.
           फुलपाखराने पंख पसरवले पण ते नीट उघडले गेले नाही ,आणि त्यामुळे त्या फुलपाखराला नीट उडताही आले नाही. दुसर्‍याच क्षणी ते कोलमडुन पडले..
मुलं घाबरली, आता आपल्याला रागावणार सर,
शांत पणे जागेवर जाऊन बसली.
सर परत आले, वर्गात आपल्या गैरहजेरीत वर्ग इतका शांत बघुन त्यांना शंका आलीच की काहीतरी गडबड आहे, उत्तर समोरच दिसलं. फुलपाखरु अर्धमेलं होऊन पडलेलं होतं. शिक्षकांनी त्यात जास्त विचारपुस न करता एका वेगळ्याच रितीने मुलांना धडा दिला ते म्हणाले
"मुलांनो, जर तुम्ही फुलपाखराला त्याच्या स्वत:च्या  बळावर पंख पसरवु दिले असते तर आज ते उडायला सक्षम झाले असते. कारण ते कष्ट, त्या यातना त्याला ती सशक्षता देऊन जातात ज्यामुळे त्याला पुढंच जीवन जगायचं बळ मिळत जात असतं, जर त्याला ते आयतं मिळत गेलं तर त्याला स्वत:हुन जीवनातल्या बारिकसारीक गोष्टीही करता येत नाहीत ज्या की जगायला अत्यावश्यक असतात.
आयुष्यात सगळंच एकसारखं, सोप्प, सुंदर आणि मनाजोगं मिळेलच असं नाही, ते मिळालं नाही म्हणुनची निराशा मनात बाळगुन उदास होण्या पेक्षा त्यातुन मार्ग काढणं शिकायला हवं. जीवनातले कष्ट हे सुद्धा एकप्रकारचे जीवनामृतच आहे." ही गोष्ट मी कधीतरी ऐकलेली आहे, शब्दात मांडायचा प्रयत्न केलाय.
पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, की मुलांना आज आपण जे संगोपन देतोय ते काहीसं अशाच प्रकारचं आहे. सुरक्षितता आणि सुखसोई द्यायच्या नादात आपण त्यांचा कोष हातानेच काढु बघतोय.  बाहेरच्या जगात वावरताना मुलांना जी हुशारी, जी समयसुचकता, जो संयम  हवा आहे तो मुलांमधे कमी आढळतो. त्यामुळेच की काय मुलं थोडाश्या निराशेनी, अपयशाने खचुन जातात. सगळ्या वस्तु त्यांना सहज उपलब्ध झाल्याने त्यांना वस्तुंची किंमतही उरत नाही.
प्रत्येक वेळी एक आधारस्तंभ म्हणुन आपण त्यांच्या मागे आहोतच पण प्रत्येक क्षणी त्याच्या सोबत आपलं राहणं अशक्य आहे. म्हणून मुलांना त्यांच्या कोषातुन स्वत:च बाहेर पडु द्यावं . त्रास होईल पण तो हिताचा राहील त्यांच्याचसाठी. खरच खूपच काही शिकण्यासारख आहे यातून आणि अवलंब ही केला पाहिजे.
-       मंगेश विठ्ठल कोळी, मो. ९०२८७१३८२०

Sunday, August 20, 2017

आपलं ते प्रेम आणि दुसऱ्याच ते .....


आज प्रेम करणाऱ्या व्यक्तीला सर्वजण वेगळ्या नजरेने पाहतात. प्रेम करणे म्हणजे एखादा मोठा गुन्हा करणे असल्यासारखे झाले आहे. असे म्हणतात कि आपण केलेलं प्रेम असत आणि दुसऱ्यांनी केलेलं ते लफड म्हणून त्याचा प्रसार केला जातो. पण हे जग प्रेमाशिवाय कल्पना करणे अशक्य आहे. काही काल परवा एका मित्राने मला पाठवलेल्या मेसेज मधून खूप काही शिकण्यासारख आहे अस मला वाटल. तो मेसेज पुढील प्रमाणे, एका मुलाने एका मुलीशी लग्न केलं. ती मुलगी दिसायला खूप सुंदर होती. तो तिच्यावर खूप प्रेम करायचा काही काळाने त्या मुलीला कोणता तरी skin चा प्रॉब्लेम झाला, एका वेगळ्याच आजाराने ती त्रस्त झाली.
आजारामुळे त्या मुलीची सुंदरता हळूहळू कमी होत चालली, इकडे मुलीला हा आजार झाला तर लगेच मुलाला पण आंधळे पणा आला. असेच दिवस चालले. काही दिवसाने मुलगी खूप कुरूप दिसायला लागली पण नवरा आंधळा झाल्याने त्याला काही कळत नव्हते व तो तिच्यावर तसाच प्रेम करायचा जसा पहीले करत होता. त्या मुलीचा आजार वाढला व कालांतराने तिचा मृत्यू झाला. त्या मुलाला खूप वाईट वाटले त्याने त्या मुलीचा अंत्यविधी खूप प्रामाणिकपणे पार पाडला.
आता तो ते गाव सोडून दुसरीकडे स्थायिक व्हायचा विचार करत होता, तेवढ्ययात त्याला एका शेजारीने विचारले तू तरआंधळा एकटा कसा राहशील. त्यावर तो बोलला मी आंधळा कधीच नव्हतो, मी माझं अर्धे आयुष्य आंधळे पणाचं नाटक करत जगत होतो, कारण जर मी तस केलं नसत तर माझ्या बायकोला त्या आजारापेक्षा मला काय वाटेल व माझं तिच्यावरील प्रेम कमी होईल हेच जास्त दुःख झालं असत, ती खूप प्रेमळ होती व एक चांगली बायको होती. मला तिला आनंदी ठेवायचं होत.
काही वेळा आयुष्यात आनंदी राहण्यासाठी दुसऱ्याच्या शुल्लक गोष्टी दुर्लक्ष करा आयुष्य अजून सुंदर बनेल. समजून घ्या सोप्प आहे. मी एकटा स्मित हास्य करू शकतो, पण आपण सगळे जोरजोरात हसू शकतो. हेच तर मानवी नात्याचं सौंदर्य आहे. आपण एकमेकांशिवाय काहीच नाही, ब्लेडला खूप धार असते पण त्याने झाडं तोडता येत नाही. कुर्‍हाड मजबूत असते पण त्याने केस कापता येत नाहीत. प्रत्येकजण आपल्या जीवनात खूप महत्त्वाचं स्थान भूषवतात त्यांचा आदर करा, जीवन फार सुंदर आहे त्याला आणखी सुंदर करा.
-       मंगेश विठ्ठल कोळी, ९०२८७१३८२० 

Tuesday, August 15, 2017

रोजगार देणारे ‘हेल्थ टुरिजम’

काही दिवसापूर्वी शासनामध्ये नवीन पद भरती केली जाणार नसल्याच्या अफवांना पेव सुटले होते. परंतु नागपूर येथील इंडोयूके इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मेडीसिटी आययूआयएच (IUIH) यांनी हेल्थ टुरिजमकडे वाटचाल सुरु केली आहे. मेडीसिटीचे काम तीन टप्प्यात पूर्ण करण्यात येणार आहे. तीनही टप्पे कार्यान्वित झाल्यानंतर मेडिसीटीत ‘दोन’ लाख युवकांना रोजगार प्राप्त होईल. आययूआयएच ची पहिली मेडीसिटी देशात सर्वप्रथम नागपूर येथे स्थापन केली जात असून 1600 कोटी रुपयाची गुंतवणूक असलेली ही मेडीसिटी लंडनमधील किंग्ज कॉलेज हॉस्पिटलच्या सहकार्यानी विकसित केली जाणार आहे. भारत सरकारचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उद्योग मंत्रालयातील औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागाने पुरस्कृत केलेल्या इन्व्हेस्ट इंडिया या राष्ट्रीय गुंतवणूक प्रोत्साहन व मदत एजन्सीचे पाठबळ या प्रकल्पाला लाभले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोव्हेंबर 2015 मधील ब्रिटन दौऱ्यामध्ये करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनामध्ये इंडोयूके इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मेडीसिटी या उपक्रमाची घोषणा करण्यात आली होती. भारतात अशा प्रकारच्या अकरा नवीन भारत-ब्रिटन आरोग्य प्रतिष्ठाने स्थापना करण्याचा प्रस्ताव होता. नागपूर हे देशाचे मध्यवर्ती केंद्र असल्यामुळे अनेकांना उपचार घेण्यासाठी नागपूर हे ठिकाण सोयीचे आहे. मेडीसिटीचा पहिला टप्पा सन 2019 पर्यंत पूर्ण होणार असून तीन टप्प्यात मेडीसिटीचे काम पूर्णत्वास जाईल. सर्व टप्पे कार्यान्वित झाल्यानंतर दोन लाख लोकांना रोजगार प्राप्त होईल. मेडीसिटीमध्ये रुग्णांसाठी हजार खाटांचे रुग्णालय तर बांधण्यात येणारच आहे शिवाय मेडिकल कॉलेज, नर्सिंग कॉलेज तसेच रुग्णांना विविध क्रीडा प्रकार, प्राणायम, योगा यांच्या माध्यमातून सुविधा पुरविण्यात येणार आहे.
इंडोयूके इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मेडीसिटीच्या माध्यमातून रुग्णांना अत्याधुनिक सोयी सुविधा, योग्य उपचार माफक दरात पुरविण्यात येणार आहेत. याच धर्तीवर संपूर्ण देशात इंडोयूके इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मेडीसिटी आणि आययूआयएच क्लिनिक्स विकसित केली जाणार आहे. ब्रिटन मधील राष्ट्रीय आरोग्य सेवा संस्थांच्या मदतीने हे रुग्णालय चालविले जातील. ग्रेट ब्रिटनमधील राष्ट्रीय आरोग्य सेवा ही जगातील सर्वोत्कृष्ट आरोग्य सेवा समजली जाते. या रुग्णालयाखेरीज उपचार विषयक व प्रशिक्षण विषयक मार्गदर्शन केले जाईल. संशोधन, शिक्षण, तंत्रज्ञान, उत्पादन आणि आरोग्य सेवा यांच्यातील जागतिक दर्जाच्या संस्थांच्या सहकार्याने देशात एकात्मिक आरोग्य सेवा पूर्ण करण्याचा ब्रिटन आणि भारत या दोन्ही देशाचा मानस आहे.
-      मंगेश विठ्ठल कोळी, ९०२८७१३८२०

Monday, August 14, 2017

प्रिय आमुचा  राष्ट्रध्वज....

उद्या संपूर्ण देश स्वातंत्र्य उत्सव साजरा करणार आहे. परंतु अनेकांना आपला राष्ट्रध्वजाची परिपूर्ण माहिती नाही. या स्वातंत्र्य दिनी पूर्व संध्येला आपला राष्ट्रध्वजाची माहिती देण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न. भारतीय राष्ट्रध्वज 22 जुलै 1947 रोजी, भारत देशाला स्वातंत्र मिळण्याच्या 24 दिवस आधी, अंगिकारला गेला.  भारतीय राष्ट्रध्वजात गडद भगवा, पांढरा हिरवा ह्या तीन रंगांचे आडवे पटटे आहेत ज्यामुळे त्याला पुष्कळदा तिरंगा असेही संबोधले जाते.  मछलीपट्टणम जवळ जन्मलेल्या पिंगली वेंकय्या ह्यांनी तिरंग्याची रचना केली आहे.  भारतीय राष्ट्रध्वजाच्या लांबी उंचीचे प्रमाण 3:2 असे आहे, भारतीय राष्ट्रध्वजाच्या अथवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहे.
रचना- पिंगली वेंकय्या ह्यांनी रचलेल्या भारतीय राष्ट्रध्वजात गडद भगवा, पांढरा हिरवा हे तीन रंग आहेत.  पांढ-या रंगाच्या पट्टयाच्या मधोमध निळ्या रंगांचे अशोक चक्र आहे. भारताच राष्ट्रीय ध्वजात चार रंगाचा वापर केला गेला आहे. केशरी, पांढरा,हिरवा आणि निळा.खरे पाहता आपला राष्ट्रीय ध्वज, रंगाचाच विचार केला तर तिरंगा नसून चौरंगा आहे.  22 जुलै 1947 रोजी घटना समितीच्या बैठकीततिरंगी ध्वजभारताचा अधिेला गेला आहे. केशरी, पांढरा,हिरवा आणि निळा.खरे पाहता आपला राष्ट्रीय ध्वज, रंगाचाच विचार केला तर तिरंगा नसून चौरंगा आहे.  22 जुलै 1947 रोजी घटना समितीच्या बैठकीततिरंगी ध्वजभारताचा अधिकत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकत करण्यात आला.  त्या संबंधीचा ठराव पंडित जवाहरलाल नेहर यांनी मांडला.  एकाला एक लागून असलेल्या आडव्या समान प्रमाणाच्या तीन पट्टयांचा तो आहे.  वरती गर्द केशरी, मध्यभागी पांढरा आणि खालच्या बाजूला गर्द हिरवा, अशा क्रमाने हे तीन रंग आहेत.  मधल्या पांढ-या पट्टयावर निळ्या रंगाचे धम्मचक्र असून ते सारनाथ येथे आढळलेल्या सिंहमुद्रेवर असलेल्या अशोकचक्रासारखे हे. चक्राला 24 आरे आहेत.  डॉ.एस राधाकष्णन् यांनी भारतीय राष्ट्रध्वजाच्या एकूण रचनेचे महत्त्व चांगल्या प्रकारे विशद केले आहे.  ध्वजात तीन समान आडव्या पट्टयांची रचना करण्यात आली आहे.
वरच्या भागात गडद केशरी रंग आहे.  या रंगातून त्याग, धैर्य याचा बोध होतो.
मधल्या भागात पांढरा रंग आहे.  या रंगातून प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा शांती, सत्य पावित्राचा बोध होतो.
खालील भागात गडद हिरवा रंग आहे. हा रंगातून निसर्गाशी वा भ्ाूमीशी असलेले नाते दर्शवितो, निष्ठा समध्दीचा बोध होतो.
निळ्या रंगाचे अशोक चक्र हे सागराप्रमाणे  अथांगता, कालचक्राच त्यासोबत बदलत जाणा-या जगाचं सूचन करतो.  जीवन गतिमान असावे भारतीयांनी शांततापूर्णतेने आगेकूच करावी असे धम्मचक्र दर्शविते. मूलत: हे चक्र विश्वशांतीचा संदेश देणा-या बौध्द धर्माचे धम्मचक्र आहे.  त्यालाअशोकचक्रया नावाने ओळखले जाते.  त्यात भारतीय कला, तत्त्वज्ञान, इतिहास संस्कती यांचा सुरेख संगम झालेला दिसतो.  धम्मचक्र प्रवर्तनायहे घोषवाक्य भारतीय संसद सभापतीच्या स्थानाच्या शिरोभागी लिहिलेले आहे.
राष्ट्रध्वज फडकवण्याची नियमावली - देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातो. राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकावित असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही, यासाठी काही नियम करण्यात आले आहेत.  केंद्रीय गह मंत्रालयाच्या वतीने भारतीय राष्ट्रध्वज संहिता तयार करण्यात आली आहे.  ध्वज संहितेबाबत नागरिकांमध्ये जागती निर्माण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
राष्ट्रीय ध्वजाबाबत संहिता तयार करण्यात आल्याचे खूप कमी नागरिकांना माहिती असते.  संहितेनुसार महत्त्वाचे राष्ट्रीय कार्यक्रम, सांस्कतिक मैदानी खेळाच्या वेळी नागरिक कागदाचा झेंडा हातात घेउन फडकवताना दिसतात. मात्र, कार्यक्रम झाल्यानंतर तेच झेंडे जमिनीवर इतरत्र फेकलेले दिसतात.  ते टाळले पाहिजे.  प्लॅस्टिकपासून तयार करण्यात आलेल्या झेंड्यांचा उपयोग कर नये.
ध्वजसंहितांनुसार जेव्हा राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो तेव्हा त्याला सन्मानपूर्वक उच्च स्थान दिले पाहिजे.  राष्ट्रीय ध्वज अशा जागेवर फडकवला पाहिजे की, तो सगळ्यांना दिसला पाहिजे.  शासकीय इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवण्याची प्रथा आहे.रविवार अन्य सुटीच्या दिवशीही सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकवला गेलाच पाहिजे. प्रतिकूल हवामानातही ध्वज फडकवणे आवश्यक आहे.
स्ंहितेनुसार राष्ट्रध्वज नेहमी स्फूर्तीने फडकवला पाहिजे आदरपूर्वक ध्वज हळूहळू उतरवला गेला पाहिजे.ध्वज फडकवताना उतरवताना बिगूल वाजविलाच पाहिजे. ध्वज कुठल्याही इमारतीच्या खिडकी, बाल्कनी अथवा दर्शनी भागात आडवा तिरपा फडकवताना ध्वजातील केशरी रंगांचा पट्टा हा वरच्या बाजूला हवा. राष्ट्रध्वज सभेच्या वेळी फडकविताना अशा पध्दतीने फडकाविला गेला पाहिजे की, मान्यवराचे तोंड हे उपस्थिताकडे पाहिजे ध्वज हा त्यांच्या डाव्या बाजूला पाहिजे.  अथवा ध्वज भिंतीवर असेल तर मान्यवरांच्या मागे भिंतीवर आडवा फडकविला पाहिजे.  कुठ्लया पुतळ्याचे अनावरण असेल तर ध्वज सन्मानपूर्वक वेगळ्या पध्दतीने फडकविला गेला पाहिजे.  ध्वज गाडीवर लावताना गाडीच्या बॉनेटवर एक दंड उभा करावा त्यावर फडकवावा.
स्ंहितेनुसार राष्ट्रीय ध्वज कुठ्लया मिरवणूक किंवा परेडच्या व्यक्तीच्या उजव्या हातात ध्वज असावा.  जर इतरही ध्वज असतील तर त्यांच्या मध्यभागी राष्ट्रध्वज असला पाहिजे. फाटलेला, मळलेला ध्वज फडकविला जाता कामा नये.  कोणत्या व्यक्तीला अथवा वस्तूला वंदन करताना ध्वज जमिनीच्या दिशेने झुकवू नये.  इतर ध्वजांची पताका अथवा ध्वज राष्ट्रध्वजापेक्षा उंच लावू नये.
राष्ट्रध्वजाचा उपयोग वक्त्याचे व्यासपीठ झाकण्यासाठी अथवा ते सजविण्यासाठी कर नये.  केशरी पट्टा जमिनीच्या बाजूने ठेवून ध्वज फडकविला जाउ नये.  तसेच राष्ट्रध्वजाला माती पाण्याचा स्पर्श होउ देउ नये.  ध्वज फडकविताना तो फाटणार नाही, अशा पध्दतीने बांधला पाहिजे.  ध्वजाचा दुरपयोग थांबविण्यासंदर्भात स्पष्ट दिशा ठरविण्यात आली आहे.  त्यानुसार राजकीय व्यक्ती, केंद्रीय सैनिक दलाच्या संबंधित व्यक्तीच्या अंत्ययात्रेव्यतिरिक्त इतरत्र कोठेही त्याचा उपयोग कर नये.  ध्वज कुठलेही वाहन, रेल्वे,जहाजावर लावला जाउ शकत नाही.
ध्वजाचा उपयोग घराच्या पडद्यासाठी कर नये.  कुठलाही पेहराव करताना ध्वजाचे कापड घेता येणार नाही.  तसेच राष्ट्रध्वज गादी, रमाल अथवा नॅपकीनवर काढू नये. राष्ट्रध्वजावर कुठलेही लिखाण केले जात नाही किंवा त्यावर कुठलीही जाहिरात केली जात नाही.  ध्वज ज्या खांबावर फडकविला जातो त्यावरही जाहिरात लावता येणार नाही.
केवळ प्रजासत्ताक दिन स्वातंत्र दिन याच दिवशी ध्वज फुलांच्या पाकळ्या ठेवून फडकविला जातो.  राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिक कवायतीच्या सावधान स्थितीत पाहिजेत. शासकीय पोषाखात असलेले सरकारी अधिकारी ध्वजाला मानवंदना देतील.  जेव्हा ध्वज सैन्याच्या तुकडीतील जवानाच्या हातात असेल तो सावधान स्थितीत उभा राहिल.  सरकारी अधिका-याच्या जवळून ध्वज जात असताना त्यांनी ध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना दिली पाहिजे.  आदरणीय व्यक्ती डोक्यावर टोपी घालताही राष्ट्रध्वजाला मानवंदना देउ शकतात.
1.         1906 साली भारतीय ध्वजात तीन रंगांच्रा समावेश केला गेला.  सर्वात वरती गडद निळा रंगाचा पट्टा. त्यामध्ये 8 चांदण्या, मध्यभागी पिवळ्या रंगाचा पट्टा त्यामध्ये देव नागरी भाषेद वंदेमातरम लिहिले होते.  शेवटी सर्वात खाली लाल रंगाचा पट्टा त्यामध्ये एका बाजूला सूर्य दुस-या बाजूला चंद्र होता.
2.         1907 साली भारतीय ध्वज पुन्हा बदलून पिवळा रंग तसाच ठेवून सर्वात वरती हिरवा रंग त्यामध्ये 8 कमळ होते.  मध्यभागातील पिवळ्या रंगामध्ये वंदे मातरम लिहिले होते. शेवटी भगवा रंग वापरला गेला त्यामध्ये एका बाजूला चंद्र दुस-या बाजूला सूर्य असे चित्र ठेवण्यात आले.
3.         1921 साली भारतीय ध्वज बदलून सर्वात वरती केशरी, मध्यभागी पांढरा, शेवटी हिरवा रंगाचा पट्टा अशी मांडणी करन मध्यभागी असणा-या पांढ-या चरख्याच्या चित्राचा समावेश करण्यात आला.
4.         22 जुलै 1947 रोजी तिरंगीध्वज अशोकचक्र असलेला ध्वजाचा स्वीकार करण्यात आला.

- मंगेश विठ्ठल कोळी.
- मो. ९०२८७१३८२०