Sunday, December 13, 2020

पहाटेची ताकद...

 

*तुम्ही सकाळी किती वाजता उठता?*

*हेल एरॉल्ड* नावाचं एक जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे, ते एक प्रचंड यशस्वी व्यावसायीक होते, मोठ्या जिद्दीने त्यांनी एका अपघातामुळे आलेल्या शारिरीक विकलांगतेवर मात केली होती.

पण २००८ च्या महामंदीत त्यांचा प्रचंड लॉस झाला, अब्जोपती हेल कर्जबाजारी झाला.पण तो हार मानणारा नव्हता, यातून बाहेर कसं पडावं, हे विचारण्यासाठी तो आपल्या एका यशस्वी मित्राकडे गेला, मित्राने त्याला काय सल्ला दिला असेल बरं?

*“हेल, तु सकाळी लवकर उठ!”* “बाकी सगळं आपोआप होईल”या चमत्कारिक सल्ल्याने हेल निराश झाला, त्याला काहीतरी आगळेवेगळे उपाय अपेक्षित होते,काही दिवस त्याने कसेबसे ढकलले, पण दिवसेंदिवस निराशा त्याला घेरत होती, मग नाईलाज म्हणुन *त्याने सकाळी चार वाजता उठायची सुरुवात केली,* आणि हेल सांगतो, त्याचं आयुष्यच बदलुन गेलं!

*पहाट आणि सुर्योदय इतके जादुई असतात का?*

इतक्या सकाळी उठुन काय करावं? ह्या प्रश्नावर हेल ने एक कोडवर्ड सांगितलाय.

*‘SAVERS’*

*ह्या आयुष्य बदलुन टाकणार्‍या सहा सवयी आहेत.*

१) *Silence – (ध्यान)*

- शांत बसुन स्वतःच्या आत डोकावणे, म्हणजे ध्यान!

- स्वतःच्या आतल्या चेतनेला स्पर्श करणे, म्हणजे ध्यान!

- मनाच्या कॉम्पुटरला फॉर्मेट करुन व्हायरस रिमुव्ह करणे म्हणजे ध्यान!

- मन प्रफुल्लीत आणि ताजतवानं करण्यासाठी आवश्यक असते ध्यान!

- माणसाच्या गरजा किती कमी आहेत, आणि सगळ्या चिंता किती व्यर्थ आहेत याची आत्मप्रचिती म्हणजे ध्यान!

- अफाट, अदभुत आणि आनंददायी विश्वशक्तीसोबत स्वतःला जोडून घेणे, आणि स्वतःच्या मन-शरीराचा कणकण प्रफुल्लित करवुन घेण्याची कृती म्हणजे ध्यान! 

२) *Affirmations – (सकरात्मक स्वयंसूचना)*

- अफरमेशन्स म्हणजे स्वसंवाद!

- स्वतः स्वतःला सुचना देणं,

- प्रचंड शक्तिशाली असलेल्या अंतर्मनावर आपण निश्चित केलेलं ध्येय कोरणं!

- येत्या पाच वर्षात, येत्या एक वर्षात, पुढच्या एका महिन्यात, पुढच्या एका आठवड्यात, आणि आज दिवस भर मी काय काय करणार आहे, याचं मनातल्या मनात पुन्हा पुन्हा रिव्हीजन करणे म्हणजे स्वयंसूचना!

*- स्वयंसुचनांमुळे कल्पना खोल अंतर्मनात झिरपतात, आणि नाटकीयरित्या सत्यातही उतरतात.*

- अंतर्मनाची शक्ती प्रचंड असल्यामुळे तिथे रुजलेला प्रत्येक विचार मग तो चांगला असो की वाईट, खराच होतो.

*- एखादी गोष्ट हजारो वेळा बोलली तर ती अंतर्मनात प्रक्षेपित होते, मग अशुभ कशाला बोलायचे?* 

- वाईट बोलुन विनाशाला आमंत्रण देण्यापेक्षा, ‘या सुखांनो या’!... 

३) *Visualize – (चांगल्या कल्पना मनात घोळवणे.)*

तीव्र इच्छा पुर्ण झाली आहे, अशी मनातून कल्पना करणं, ती पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करणं आणि मनःपटला वर तिला बारीक सारीक रुपात साकारणं, म्हणजे व्हिज्वलायजेशन!

*- कल्पनाशक्ती ही निसर्गाने माणसाला दिलेली सर्वात अनमोल आणि सर्वात प्रभावशाली भेट आहे.*

- कल्पनाशक्तीचा योग्य वापर केल्यास साधारण माणसाचं यशस्वी व्यक्तीमध्ये रुपांतर होतं.

- दररोज आपण आपली ध्येयं पूर्ण झाली आहेत, असं मनात घोळवलं पाहीजे.

पोहण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदकांची रास उभी करणारा मायकेल फेल्प्स म्हणतो. ज्यावेळी मला झोप येऊ लागते, तेव्हा मला जे नक्की करायचे आहे, ते मनातल्या मनात बघण्याचा मी प्रयत्न करतो.

- ऑलंपिकविजेती एथलिट लेन बीचले म्हणाली होती, मागचे चार वर्ष मी एकच निकाल डोळ्यापुढे आणत होते, ते म्हणजे, मी हातात विजेतापदक घेऊन उभी आहे, आणि माझ्यावर शॅंपेनचा वर्षाव होत आहे.

- मायकेस स्मिथ म्हणाला, मी मला हवे असलेल्या स्वप्नाचे रेखाचित्र कागदावर रेखाटतो, स्वप्नांबद्द्ल टिपण लिहतो, आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्याला डोळ्यांसमोर उभे करतो.

- प्रसिद्ध उद्योगपती अझीम प्रेमजींना त्यांच्या यशाचे रहस्य विचारले तर ते म्हणाले, *“यश दोनदा मिळते, एकदा मनात आणि दुसऱ्यांदा वास्तव जगात!”* 

४) *Exercise – (व्यायाम)*

*- शरीरातून आळसाला पळवून  लावण्यासाठी, शरीरातील उर्जा वाहती ठेवण्यासाठी, मनाने कणखर आणि आनंदी राहण्यासाठी आवश्यक असतो, व्यायाम!*

*- शरीर आळसावलं की मन भ्रष्ट झालंच समजा!*

*- व्यायाम, योगासने, प्राणायाम यांच्या माध्यमातून उर्जेला वळण न दिल्यास ती अतिरिक्त बाबीकडे वळते, आणि माणूस वासनांचा गुलाम बनतो.*

- वाईट सवयींचा गुलाम झालेल्या माणसातले चैतन्य हरपते, अशा व्यक्तीला एकाकी असल्याची जाणीव अस्वस्थ करते.  

- तो कशावरच एकाग्र होवू शकत नाही, आणि म्हणून तो आनंदी होवू शकत नाही, मनात एक अनामिक भय तयार होते.

- ह्या सगळ्या दुष्ट श्रंखलेला तोडण्याचा एकच उपाय, तो म्हणजे, व्यायाम करा, डिप्स मारा, सूर्यनमस्कार घाला, पुलअप्स करा, ट्रेडमिलवर घाम गाळा,प्राणायाम करा.  शरीरातले चैतन्य जिवंत ठेवा.

५) *Reading – (वाचन)*

*- पुस्तकं वाचणारी माणसं एका आयुष्यात अनेक आयुष्य जगतात.* 

- पुढच्याच ठेस, मागचा शहाणा, ह्या न्यायाने दुसर्‍यांच्या अनुभवाने शहाणे होणारे लोक जगावर राज्य करतात.

*- वॉरेन बफे, बिल गेटस, मार्क जुकरबर्ग हे सगळे आठवड्याला दोन पुस्तके वाचून पूर्ण करतात.*

६) *Scribing – (लिहिणे.)

*- लिहिल्याने तुमची तुमच्याशी नव्याने भेट होते.*

- लिहिल्याने मन रिकामे होते, दुःख नाहीसे होते, मनात नव्या उर्जेचा संचार होतो.

- लिहल्याने नवे रस्ते उघडतात, नव्या प्रगतीच्या वाटा खुलतात.

- संतानी सांगून ठेवले आहे, दिसामाजी काहीतरी लिहीत जावे.

*- लिहणं, हे सुद्धा स्वसंवादाचं प्रभावी साधन आहे.लिहिल्याने विचार पक्के होतात.*

*- सकाळी उठल्यावर आज दिवस भर मी काय करणार आहे, ते लिहावं,*

- एखादी समस्या छळत असेल तर ती लिहून त्याचे उपाय लिहावेत.

- मनाला स्वप्नांच्या आकाशात मुक्त पणे पाठवून कागदावर स्वप्ने रेखाटावीत.

- ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मी काय काय करणार आहे, त्याचं प्लानिंग, नियोजनही लिहावं,

-  रोज स्वतःला कामे नेमून द्यावीत, आणि पूर्ण झाली की स्वतःला विजयी घोषित करावं.

*- लिहिल्यानं मन मोकळं होतं, चिंतांचं ओझं हलकं हलकं होतं!*

- जवळच्या व्यक्तीला पत्रं लिहावीत, कधी प्रेरणादायक किस्से कहाण्या लिहाव्यात.

- अशाने अंतरंग फुलुन येतात, उर्जेचा स्रोत खळखळत वाहतो.

*ह्या सहा सवयींपैकी प्रत्येक सवय आयुष्य बदलून टाकणारी आहे. वरील सहा सवयींपैकी किती सवयी तुम्ही स्वतःला लावून घेतल्या आहेत.*? 

 आता आपल्यापैकी प्रत्येकाकडे भरपूर रिकामा वेळ आहे...तो वेळ नकारात्मक पोस्ट वाचून त्यावर चिंतन करण्यात वाया घालवावा की वरील पैकी कोणत्याही एका किंवा जमत असल्यास सर्वच गोष्टी अमलात आणण्यासाठी प्रयत्न करायचा हे सर्वस्वी आपणच ठरवायचे आहे.

कोणतीही गोष्ट अंगवळणी पाडण्यासाठी किमान 21 दिवसांचा सराव आवश्यक असतो...आणि आपल्याकडे आता कदाचित 21 पेक्षा जास्त दिवस रिकामे असणार आहेत..

तेव्हा या वेळेचा सदुपयोग करून भावी जीवनासाठी सशक्त मन आणि सशक्त शरीर बनवू....

अशी वेळ व संधी पुन्हा येणार नाही व ती येऊ ही नये.....

वेळ आहे स्वतःवर काम करण्याची....स्वतःसाठी जगण्याची.....आलेल्या परिस्थिती चा फायदा करून घेण्याचा.. 

*काळजी घ्यायची आहे, काळजी करायची नाही.*


Sunday, November 29, 2020

व्यक्तिमत्त्व विकास दिवाळी अंक 2020 प्रतिक्रिया

 नमस्कार,

   मी कवी सुरज अंगुले...

             व्यक्तिमत्व विकास दिवाळी अंक 2020 प्रकाशित करत असताना संपादक, उपसंपादक शब्द जुळवणे तसेच तुमची इतर सहकारी अतोनात प्रयत्न केलेत त्यामुळे तुमचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. कोरोनाच्या काळात आर्थिक अडचणीमुळे आपण प्रिंटेड अंक काढू शकला नाहीत म्हणून आम्ही समजून घेतो. 

         आतापर्यंत आपण कारकिर्दी केलेली सर्वोत्तम आहे, महाराष्ट्रामध्ये संपादक श्री. मंगेश विठ्ठल कोळी यांनी आमच्यासारख्या नव युवकांना किंवा नवोदित कवींना आपल्या अंकामध्ये संधी देऊन आमचा आनंद द्विगुणित केला म्हणूनच तुमचा सार्थ अभिमान कायमस्वरूपी आहे. तुमच्या सोबत खूप कलावंत, विचारवंत, साहित्यिक, पत्रकार, लेखक जोडले गेले आहेत हेच तुमचं भाग्य आहे. 

         आतापर्यंत आम्ही भरपूर ठिकाणी कविता लेखी चारोळ्या दिलेल्या आहे. परंतु तुमच्यासारखी सुविधा अद्यापपर्यंत आम्हाला मिळालेले नव्हती. एकंदरीत विचार जर केला तर, त्याचा खर्च पाहिला तर खूप आहे. परंतु तुम्ही निस्वार्थ केलात. त्यामुळे असा संपादक पुन्हा होणे नाही. असं माझं वैयक्तिक मत आहे. 

          प्रमाणपत्राची सजावट त्याची संकल्पना त्याचे चिन्ह त्यावर असलेल्या स्वाक्षरी पाहिल्यानंतर खूप खूप आनंद वाटला. तुम्ही अशा पद्धतीने काम करत आहात म्हणून आम्ही तुमच्या सोबत कायम आहोत. 

          पुढील कार्यासाठी मनापासून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा... असाच संपादक म्हणजे महाराष्ट्राला खरा लाभलेला अभिनेता आहे. तुमचे कार्यप्रणाली इतकी सुंदर आहे, मी ते शब्दात व्यक्त करू शकत नाही. 

        पुढील काळामध्ये माझ्याकडून साहित्य क्षेत्रामध्ये जेवढे योगदान देतो, ते फक्त तुम्ही विश्वासाला माझ्या पात्र असल्यामुळे मी देत आहे. ✍🏻🌷🌷🙏🏻

Saturday, November 21, 2020

ओवाळणी..!!

 

यावर्षी माहेरी जायला जमलं नाही म्हणुन.. घरी आलेल्या भावाला.. हॉलमध्ये पाट रांगोळी घालून नवऱ्यासमोरच औक्षण करुन तिनं त्याला ओवाळलं, तसा तो उठून उभा राहिला शर्टच्या खिशातून ओवाळणीचं पाकीट काढून हळूच तबकात ठेवत.. खाली वाकून चरणस्पर्श करीत त्यानं बहिणीला नमस्कार केला, अरे असू दे! तू बस! मी फराळाचं आणते!म्हणत तिनं औक्षणाचं तबक उचललं, तसा तो घाईघाईत म्हणाला, ताई फराळाचं राहू दे! तेव्हढा वेळ नाहीये! कामावर जायला उशीर होईल! पुन्हा येईल मी! असं बोलून तो दारापर्यत गेला सुद्धा..अरे! थांब जाऊ नकोस तसा.. थोडं फराळाचं देते! ते तर् घेऊन जा! आलेच मी... बहिणीनं त्याला थांबवलं होतं.....

बहिणीनं दिलेली फराळाची पिशवी घेऊन तो निघाला होता.. कांही अंतर गेल्यावर मोबाईलची रींग वाजली.. त्यानं पाहिलं.. ताईचा फोन होता.. बहिणीचा फोन येईल याची जणू त्याला अपेक्षा केली असावी.. रस्त्याच्या कडेला थांबून त्यानं.. मोबाईल कानाला लावला... गळ्याशी दाटलेला हुंदका कसातरी थोपवत.. बहिणीनं तिकडून कांही बोलायच्या आत कंठ दाटलेल्या आवाजात त्यानं बोलायला सुरवात केली...

ताई! माफ कर मला! तुला ओवाळणी घालायला माझ्या जवळ पैसे नव्हते.. तबकात ठेवलेल्या पाकिटात काहींचं नव्हतं! पुढचं बोलणं त्याला अवघड जातं होतं.. मोबाईल कानाला लावून तो तसाच उभा होता... अरे वेड्या! पलिकडून गहिवरून आलेल्या बहिणीचे स्वर कानी येतं होते.... खिशातलं पाकीट काढतांना थरथरणारा तुझा हात!तुझ्या चेहऱ्यावर दिसणारे भाव! निघण्याची केलेली घाई पाहूनच!तू काहीतरी लपवतो आहेस वाटलंच होतं! आत जाऊन फक्त खात्री केली! अरे! आता अनलॉक झालं असलं तरी तुझा गेलेला जॉब अजुनही तुला मिळालेला नाहीये! माहिताय मला!कामावर जायला उशीर होईल! हा बहाणा सुद्धा ओळखला होता! तुझी बहीण आहे मी...

ताई तू समजुन घेतलंस! पण तिथं बाजुला भाऊजी बसलेले!त्यांच्या लक्षात आलं असतं तर? नोकरी अभावी फार बिकट परिस्थिती झालीय गं आमची! कामावर परत बोलावण्याची आशा मावळल्या सारखं झालंय! बायको मुलांसह संपवावं सगळं ! असं वाटतं! नको असं जगणं...

शू! चूप बस्स! असं अभद्र बोलू नकोस! सगळं चांगलं होईल!असा धीर सोडू नकोस! अरे माझ्याकडे बघ! आम्ही सुद्धा कसबसं तोंड देतोय आल्या दिवसाला! नोकरी आहे पण अर्धाच पगार मिळतोय ह्यांना! तुला एक सांगू! भाऊबीजेला येण्याचं मुद्दाम टाळलं मी ! उधार उसनवार करुन तुम्ही केलंही असतं माझं सगळं! नाही पटलं ते मनाला! ह्यांनी सुद्धा माझा निर्णय योग्य ठरवला! उलट आपल्याकडून होता होईल तितकी मदत करूया! असं ठरवलं ह्यांनी! तुला संकोच वाटेल म्हणुन तुझ्याशी नाही बोलले हे! आता सुद्धा फराळा बरोबर तुझ्या ओवाळणीच्या रिकाम्या पाकिटात थोडे पैसे ठेवलेत ते नीट सांभाळ! आणि असा खचून जाऊ नको रे! आम्ही आहोत ना तुझ्या पाठीशी! सगळे दिवस सारखेच नसतात! आणि हो!या भाऊबीजेची ओवाळणी म्हणुन एक वचन दे मला! इथून पुढं कुठलाही वाईट विचार आणणार नाहीस मनांत! शांतपणे घरी जा! तुझे भाऊजी नेहमी म्हणतात ना! तसं म्हणते मी.......be happy.......

be positive........

बहिणीचं बंधूप्रेम आणि भ्रमण ध्वनीच्या सूक्ष्म लहरींनी खूप चांगलं काम केलं होतं आज..खचलेल्या एका भावाला नव्यानं उभारी देण्याचं..

(वरील लेख मी लिहिलेला नाही, सुंदर आणि कमी शब्दात भाऊबहिण नाते सांगण्याचा उत्तम प्रयत्न आहे. असे मला वाटते म्हणून मी आपणास वाचण्यासाठी पाठवत आहे. आवडल्यास इतरांनाही पाठवा)

Wednesday, November 11, 2020

व्यक्तिमत्व विकास दिवाळी अंक २०२०

व्यक्तिमत्व विकास दिवाळी अंक २०२० मोफत डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकचा वापर करावा ही नम्र विनंती...

Wednesday, August 26, 2020

तुमचं हक्काचं ठिकाण...

"अग तुझा चेहरा आज असा का दिसतोय?"

" काही नाही गं..."

" नाही कसं ? काय झालंय..बोल न .."

आणि मग मनात साचलेलं सगळं मळभ तिच्याजवळ रिकामं होतं..एखादी गच्च कोंबून भरलेली बॅग रिकामी करावी तसं आणि  मग जादूची कांडी फिरवल्यागत मन क्षणार्धात एकदम मोकळं होऊन जातं..

हेच.. हेच ते *हक्काचं ठिकाण.. My Happy Place !!* 

         फक्त आठवून बघा अशी कोणती  हक्काची ठिकाणं आपल्या जवळ आहेत ?? मनाला उभारी , खराखुरा विसावा देणारी .. एक एक आठवत चला.. एकदम फ्रेश वाटेल !! त्या व्यक्तीसोबतचे संवाद किंवा गमतीजमती एखाद्या सिनेमासारख्या तुमच्या डोळ्यांपुढून तरळून जातील..कुठल्या एखाद्या मैत्रिणीसोबत मन हलकं फुलकं होतं तर एखाद्या मित्रासोबत खळखळून हसल्या जातं , भावा सोबत बालपणीच्या आठवणी, चिडवाचिडवी..तर एखाद्या नातेवाईकांसोबत साहित्यिक चर्चा...sooo coool असं feeling देणारी ही ठिकाणं !!

              अशी मोजकीच पण हक्काची ठिकाणं प्रत्येकाच्या आयुष्यात नक्कीच असतात..आई वडील तर खास हक्काचेच.. त्याशिवाय मित्र ,मैत्रीण ,भाऊ ,बहीण,

भावजय,दीर,नणंद , cousins ,नातेवाईक .. कुणीही असू शकतं  तुमचं *हक्काचं ठिकाण , Your true Happy Place !!*

     जिथे आपुलकी, जिव्हाळा तर असतोच, पण सोबत असते संजीवनी.. मनाला जिवंत करणारी !! किंवा अगदी एखादा  *व्हॉट्सॲप ग्रुप* सुद्धा.. जिथे नुसतं डोकावलं, नुसता एक virtual  फेरफटका मारला तरी मन एकदम relax होतं !

           निसर्गरम्य ठिकाणी गेल्यावर एकदम फ्रेश वाटतं तसंच आपल्या या हक्काच्या ठिकाणी.. त्यांच्या सहवासात एकदम relax, fresh वाटतं.. मन  हलकं हलकं होऊन जातं.. अगदी मोरपिसासारखं !! तिथे कुठलाच आडपडदा नसतो  किंवा  show-off ही नसतो.. अगदी मनातलं हृदयातलं सहज बोलता येतं, व्यक्त होता येतं... कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे  तुमच्या अशा हक्काच्या ठिकाणी तुम्हाला समजून तर  घेतल्या जातंच पण महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ह्यांच्याकडून Judge केल्या जात नाही ! आणि म्हणूनच अशा व्यक्तींच्या सहवासात तुम्हाला अगदी निवांत.. मन मोकळं वाटतं..

*"तुमको देखा , तो ये खयाल आया*

*जिंदगी धूप , तुम घना साया !!"*

        ही हक्काची  ठिकाणंही अगदी अशीच..सावली देणारी ,विश्रांती देणारी.. थकल्याभागल्या  जीवाला आणि मनाला !!आणि गंमत म्हणजे अशी माणसं आरशासारखी असतात.. गुण आणि दोष दोन्ही दाखवणारी..म्हणून जास्तं विश्वास !! 

         अशी हक्काची ठिकाणं अगदी जीवापाड जपूssssन ठेवायला हवीत.. हिऱ्या माणकां पेक्षा जास्त !! ती हरवायला नकोत,आयुष्याच्या गडबडीत.. कारण यांची फक्त साथही लाख-मोलाची !! Loneliness किंवा एकटेपणा दूर करणारी..म्हणूनच *"तुझ्याशी बोलून खूssssप बरं वाटतं"* हे त्यांना नक्की सांगायालाच हवं .

       कुणाचीही आत्महत्या कानावर आली की वाटून जातं  की मन मोकळं करायला त्यांच्या जवळ असं एकही हक्काचं ठिकाण नसेल ? जिथे अगदी खरंखुरं व्यक्त होता येईल?कारण व्यक्त होणं ही प्रत्येकाचीच सर्वात मोठी गरज !! त्याशिवाय मोकळा श्वास कसा घेता येणार ? 

        आपण आपल्या आयुष्यातली सगळी हक्काची ठिकाणं तर जपावीच पण आपणही कुणाचं तरी हक्काचं ठिकाण नक्कीच असायला हवं... !! नाही का ?

*खूsssssप बरं वाटलं ना वाचून? मग friends आणि सर्व हक्काच्या ठिकाणांना  जरूर शेअर करा आणि सांगा 'खूsssप बरं वाटतं तुझ्यासोबत' !!*

Friday, July 24, 2020

कोरोनाची भीती नको...

कोरोना हा एक कॉमन कोल्ड आहे. कॉमन कोल्ड म्हणजे साधा सर्दीचा आजार! अनेक ग्रंथामध्ये त्याची ओळख कॉमन कोल्ड या नावाखालीच दिलेली आहे. हा आजार आतापर्यंत अनेकांना कितीतरी वेळा होऊन गेलेला असेल. आणि कित्येकांना लागण होऊनही काहीच लक्षणे न दिसल्याने आपोआप बराही झालेला असेल.
हे मी माझ्या मनाचे सांगित नाही. पद्मश्री डॉ. रमण खंडेलवाल यांची गेल्या चार दिवसापूर्वी माझावर मुलाखत घेतली होती. ते याच क्षेत्रात काम करतात. त्यांनी कोरोना विषयी खूप छान तथ्यात्मक माहिती सांगितली. त्यांच्या म्हणण्यानुसार कोरोनाच्या व्हायरसची जरी लागण झाली तरी 80 टक्के लोकांना काहीच लक्षणे दिसत नाहीत. तो आजार येतो आणि चार-सहा दिवसांमध्ये आपोआप निघूनही जातो. 15 टक्के लोकांना सामान्य उपचारांची गरज भासते. तेही साध्या उपचाराने बरे होऊ शकतात. पाच टक्के लोकांच्या बाबतीत मात्र कॉम्प्लेक्स निर्माण होऊ शकतो. पण हे पाच टक्के लोक म्हणजे जे वयोवृद्ध आहेत, ज्यांची प्रतिकारशक्ती अगदी मामुली आहे, ज्यांना डायबिटीस, हृदयविकार, टी.बी. किंवा तत्सम स्वरूपाचा पूर्वीचाच कुठला तरी आजार आहे. अशा लोकांपैकी काही लोक मरू शकतात. हे आहे कोरोनाचे सत्य. म्हणजे सुमारे 95 टक्के लोकांना कोरोनामुळे मृत्यू येण्याची शक्यता जवळ जवळ नगण्य आहे. साध्या उपचारानेही तो बरा होऊ शकतो.

*कोरोनाचा प्रसार*

कोरोनाचा प्रसार हवेतून होत नाही. त्यामुळे आपण एकटे असताना किंवा आपल्या आसपास काही फुटांवर कोणी माणूस नसताना तोंडाला मास्क बांधणे अवैज्ञानिक आहे. कोरोनाचा आकार आहे, शंभर नॅनोमिटर. आणि आपल्या फडक्याची छिद्रे किती मोठी असतात, आपणास माहीत आहेच. मित्रांनो! आपण नव्हतो, तेव्हाही लाखो व्हायरस होते आणि आपण नसल्यानंतरही व्हायरस राहाणार आहेत. या विश्वातील सर्व प्रकारचे पशू, पक्षी, प्राणी, किटक, जिवाणू, विषाणू हे सर्व निसर्गाचे अविभाज्य घटक आहेत. त्यांच्याबरोबरच आपणास आपले जीवन जगायचे आहे. या जगात सुमारे 2 लाख 30 हजार प्रकारचे व्हायरस आहेत. आपण त्यांना टाळू शकत नाही. तर आपण स्वतःला अधिक सामर्थ्यशाली, शक्तीशाली बनवावे लागते. त्याच्या काही पद्धती आहेत.

*डर का माहोल*

अनेक प्रकारच्या रोगांने मृत्यूचा आकडा पाहिला तर कोरोनापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. मात्र कोरोनाने झालेल्या मृत्यूचा स्फोट केला जातोय. जगात कुठेही कोणी कोरोनाने मेले तर लाखो-कोट्यवधी माध्यमांतून त्याची बातमी जगभर पसरवली जातेय. त्यातून एक फार मोठी भिती जनमानसामध्ये पसरली आहे. मरणाच्या बातम्या पुन्हा पुन्हा सांगितल्या जात आहेत. चांगले झालेल्या लोकांचे आकडे फोकस करून सांगितले जात नाहीत.

*भीतीचे परिणाम*

पूर्वी येऊन गेलेल्या साथीवर अनेक मानसशास्त्रज्ञांनी समाजातील लोकांचे सर्व्हे केले तेव्हा लक्षात असे आले की प्लेग, देवी वगैरे आजारांनी मेलेल्या लोकांपेक्षा नुसत्या भीतीने मेलेल्या लोकांची संख्या जास्त होती! कुठल्याही साथीला, आजाराला, परिस्थितीला सामोरे जायचे असते. भ्यायचे नसते. पूर्ण शक्तिनिशी त्याचा मुकाबला करायचा असतो. यातच माणसाचे मनुष्यपण आहे. पण आज जास्तीत जास्त भीतीचे वातावरण पसरवण्याचे काम जणू काय मुद्दाम केले जातेय असे वाटायला लागते. त्याच्या ब्रेकिंक न्यूजचा विषय बनवला गेलाय. सामान्य माणसाला इतर गोष्टींची माहिती नसल्याने भीतीने ते अगदी गांगरून जातात. ही भीती का पसरवली जातेय, त्याचे कारण आहे.

*डर का व्यापार*

जितकी भीत मोठी तितका मोठा व्यापार करता येतो. हे व्यापार कोण करतं, हे आजपर्यंतच्या इतिहासाने पुनःपुन्हा दाखवून दिलेले आहे. या जगातील सर्वांत मोठी बाजारपेठ जर कुठली असेल तर ती आहे, (हेल्थ इंडस्ट्री)आरोग्यसेवा व्यवसाय.

*सत्ता आणि सत्य*

विज्ञान हे सत्यावर आणि तथ्यावर चालत असते आणि सत्ता किंवा सरकार हे पर्शेप्शनवर चालत असते. तेव्हा विज्ञान काय सांगते, आजपर्यंत जे जे संशोधन झालेले आहे, ते काय सांगते त्याच्याकडे जरा डोळे उघडे ठेवून पाहायला हवे. वैज्ञानिक तथ्य जर समजून घेतले तर भीतीचे वातावरणही निवळेल आणि जगण्याचा सुंदर मार्गही सापडेल. स्वातंत्र्याच्या वातावरणात मुक्तपणे श्वास घेण्याचे सामर्थ्य निर्माण करणाऱ्या श्रद्धेला आपण जागे करूया. प्रेमाने प्रस्फुरीतच,प्रफुल्लित झालेले आणि ज्ञानाने दिग्दर्शित केलेले विवेकी जीवन आपण जगूया. हे भीतीचे वातावरण(डर का माहोल)योग्य नाही. तो वैज्ञानिक नाही. सत्यावर आधारित नाही. तो एक बाजारू फंडा आहे. सरकार काय सांगते आणि विज्ञान काय सांगते याचा विचार व्हायला हवा.

*माणसे का मरताहेत?*

कोरोना एक कॉमन कोल्ड आहे, तर इतकी माणसे का मरताहेत? असा स्वाभाविक प्रश्न विचारला जातोय.
1. त्याचे उत्तर असे की माणसे नेहमीच मरत असतात. ती जगभर मरतात. कोरोनाच्या नावावर जेवढी मरणे खपवली त्याच्यापेक्षा जास्त दुसऱ्या आजाराने मरताहेत. संपूर्ण जगातील आकडा इतर रोगांच्या मानाने फारच कमी आहे.
2. ज्या इटलीमध्ये जास्त माणसे मेली कारण इटलीत वृद्ध माणसांची संख्या जास्त आहे. म्हातारी माणसे काहीतरी निमित्त होऊन मरतातच.
3. सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे माणसे उपचाराच्या पद्धतीमुळे जास्त मरताहेत! कोरोना झालेल्या माणसांवर जे प्रोटोकॉलनुसार उपचार केले जाताहेत त्यामुळे माणसे जास्त मरताहेत. कारण त्याच्यावर नको त्या औषधांचा मारा केला जातोय. त्यामुळे जीवनशक्ती अगदी कमकुवत होऊन जाते आणि मग शरीर साथ द्यायची सोडून देते. म्हणजे इथे रोगापेक्षा उपाय भयंकर आहे.
गेल्या वर्षी इटलीमध्ये नुसत्या मलेरियाने दोन लाख लोक मेले होते. मात्र त्याच्या अशा बातम्या दाखवल्या नाहीत. त्याच्या ब्रेकिंग न्यूज आल्या नाहीत. म्हणून ते लोकांना माहीत नाही. ईश्वर ना करो, पण इटलीमध्ये अजून मरणाचा आकडा वाढू शकतो. कारण प्रत्येक वर्षी तिथे तेवढे लोक इन्फेक्शनने मरतातच. आय. एल. आय. म्हणजे इन्फ्लुएंझा लाईड इलनेस या आजाराने 20 हजारांहून लोक मेले होते.

*निसर्गाची व्यवस्था*

साथी येतात-जातात, दुष्काळ, महापूर, भूकंप इ. नैसर्गिक गोष्टी घडणे हा एक नैसर्गिक भाग आहे. महामारी हे एक निसर्गाची बॅलन्सिंग व्यवस्था आहे. जेव्हा कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होतो, अनेक गोष्टींमध्ये विषमता निर्माण होते, सृष्टीचक्रामध्ये काही वेगळ्या गोष्टी घडू लागतात, तेव्हा अशा घटना घडतात आणि त्याचे बॅलंसिंग साधले जाते. ही व्यवस्थासुद्धा नैसर्गिक नियमाचाच एक भाग आहे.
जन्म-मरण हे चक्र सातत्याने सुरूच आहे. निसर्ग काही आपल्या हातातील गोष्ट नाही. तो सातत्याने वेगवेगळ्या प्रकारची परिस्थिती आपल्यापुढे निर्माण करीत असतो. त्या परिस्थितीला आपण सामोरे कसे जातो किंवा तिचा मुकाबला कसा करतो, तिला प्रतिसाद कसा व काय देतो, याच्यावर आपले जीवन, जगणे आणि त्याचे परिणाम अवलंबून असतात.

*आपण व्हायरसला मारू शकत नाही*

व्हायरस हे जिवंत व्यक्तिमत्त्व नाही. त्यामुळे त्याला मारू शकत नाही. तो शरीरात गेल्यानंतरच जैविक लक्षणे दाखवतो. आपण व्हायरसपासून पळून जाऊ शकत नाही. घरात कोंढून घेतले तरी आपल्या घरात आपल्या आसपास हजारो-लाखो व्हायरस वावरत असतात! खरे तर व्हायरस हा आपला निसर्गातील एक सोबती आहे, सहचारी आहे. मग आपण काय करायचे? आपण जसे पडणाऱ्या पावसाला थोपवून धरू शकत नाही. तसे व्हायरसला थोपवू शकत नाही. मग पावसापासून संरक्षण करण्यासाठी आपण काय करतो? आपण छत्रीचा वापर करतो. नेहमीसाठी घर बांधून ठेवतो. जेव्हा लढायी सुरू असते तेव्हा आपल्यावर वार होऊ नये म्हणून आपण काय करतो? आपण ढालीचा वापर करतो आणि आलेला वार त्याच्यावर झेलतो. तसेच व्हायरसचा मार झेलण्यासाठी आपल्या शरीरात प्रतिकारशक्ती नावाची जी ढाल आहे, तिचा वापर करणे हाच याचा प्रथम आणि शेवटचा सर्वोत्तम उपाय आहे. हा उपाय कोण सांगू शकते? जनमानसापर्यंत कोण घेऊन जाऊ शकते? हे काम डब्ल्यू. एच. ओ. करणार नाही. हे काम इंडियन मेडिकल असोशिएशन करणार नाही. हे काम फक्त आयुष मंत्रालय करू शकते. आता फक्त एकच आशा भारतातील आयुष मंत्रालयावर आहे.

*Corona Is Conspiracy* (करोना एक कट कारस्थान,एक षडयंत्रच)

फरिदाबाद निवासी डॉ. विश्वरूपराय चौधरी यांनी जानेवारीमध्येच सांगितले होते, की कोरोना ही एक काँन्स्पीरसी,कुटील कारस्थान  आहे. आता तर निकारूग्वा, ब्राझील आणि मॅक्सिकोचे अध्यक्षही जाहीरपणे म्हणताहेत की, कोरोना हि काँन्स्पीरसी  आहे. ते एक षडयंत्र आहे!

*कोरोना एक हॉरर पिक्चर*

तुम्ही कधी भुताचा हॉरर सिनेमा पाहिलाय का? आपल्याला माहीत असते की पडद्यावरचे भूत येऊन आपल्याला काहीही करणार नाही. तरीही आपण घाबरलेले असतो. हृदयाचे ठोके वाढलेले असतात. तसे आपल्या घरातल्या टी.व्ही.वर हा कोरोनाचा हॉरर पिक्चर सुरू आहे. घरातल्या छोट्या पडद्यावर आता त्याचा क्लायमॅक्स होत आलाय. काही दिवसांतच त्याचा दी एन्ड होईल! कोरोना हा एक हॉरर पिक्चरसारखाच भाग निर्माण केलाय. लक्षात ठेवा, कोरोना हा एक कॉमन कोल्ड आहे. तो 80 टक्के लोकांना झालेला माहीतही होत नाही. साधा आजार आहे. भिऊ नका. दक्षता घ्या.

*जीवन आणि दक्षता*

फक्त कोरोनासाठीच नव्हे तर जीवनात नेहमीच दक्षता बाळगावी लागते. पदोपदी दक्ष राहावे लागते. थोडेसे लक्ष दुसरीकडे गेले तरी ठेच लागते किंवा खड्यात पाय जाऊ शकतो. दुर्लक्ष झाले तर अपघात होऊ शकतो. दक्षता ही जीवनभर नेहमीसाठी घेण्याची गोष्ट आहे. तशीच दक्षता घ्या. भीती नको. तुम्ही जर भीती बाळगली तर भीतीमुळे जीवनशक्ती म्हणजे प्रतिकारशक्ती कमी होते आणि नको तो आजार चिकटतो. त्यामुळे भीती सोडा आणि दक्ष व्हा!

औषधाने आजार बरा होत नाही

कुठलाही आजार हा औषधाने बरा होत नाही. कारण आपण औषधे खात नाही, म्हणून आजार होत नाही, तर आजाराची कारणे अन्यत्र असतात. शरीर स्वतःहूनच आजार बरा करीत असते. त्यासाठी शरीरातील प्रतिकारशक्ती रात्रंदिवस युद्धपातळीवर काम करीत असते. तिला बलवान बनवणे हे आपल्या हातात आहे. जर युद्ध जिंकायचे असेल तर सैनिकीशक्ती बलवान करावी लागते. तिला योग्य ती हत्यारे व रसद पुरवावी लागते. तसेच शरीराचे आहे. शरीरातील सैनिकी शक्ती बलवान बनवा.

*प्रतिकारशक्तीची त्रिसूत्री*

प्रतिकारशक्ती बलवान बनवण्यासाठी तीन सूत्री कार्यक्रमाचा अवलंब केला तर ती सबळ होऊ शकते.
1. प्राकृतिक आहार – यामध्ये शरीरातील पेशीला 40 प्रकारचे अन्नघटक लागतात. त्या सर्व घटकांची पूर्ती करणाऱ्या गोष्टींचा आहारात समावेश असावा. शरीरात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण करणारे जंक फुड, फास्ट फुड खाऊ नये. प्राकृतिक मौसमी फळे, भाज्या आणि धान्ये यांचा आहारात समावेश असावा. रोज पोट भरून फळे व भाज्या प्राकृतिक स्वरूपात म्हणजे कच्या स्वरूपात खावीत. नंतर तुम्हाला जे हवे ते खा. अन्न, पाणी आणि हवा याच्यावर आपले जीवन अवलंबून आहे.
2. योग्य तो व्यायाम – व्यायामामध्ये दम लागेपर्यंत चालणे, सूर्यनमस्कार, आसने, प्राणायाम (श्वासाचा व्यायाम) हा नित्य नियमाने व्हावा. प्राणायाम हा रोगनिवारणाचे कार्य करीत असतो. हवा ही एक दवा आहे.
3. पुरेसा विश्राम – शांत आणि गाढ झोप घ्यावी. अति आवाज, गोंधळ, यांने स्नायू तानलेल्या स्वरूपात राहातात त्यामुळे शरीराला विश्रांतीच मिळत नाही. शरीरातील पेशी-पेशींला विश्रांती मिळाली पाहिजे. ती रोज झोपेत मिळते. पण शांत झोपच लागत नाही. त्यासाठी योगनिद्रेचा अभ्यास करावा किंवा रोज न चुकता जेव्हा जिथे वेळ मिळेल तिथे ध्यान करावे. तुमचे जे आताचे वय आहे, तुम्हास जेवढी वर्षे झालीत तेवढे मिनिटे रोज ध्यान व्हायला हवे. ध्यान करण्यासाठी न हालता स्थिर बसणे आणि येणाऱ्या-जाणाऱ्या श्वासाकडे तटस्थपणे पाहात राहाणे एवढे जरी केले तरी पुष्कळ आहे.
मित्रांनो! आपण माणूस आहोत. माणसाने वेळोवेळी अनेक संकटाशी मुकाबला करीत स्वतःचे अस्तित्व इथंपर्यंत आणलेले आहे. आताही आपण एकोप्याने, एकदिलाने वागून एकमेकाला मदत करीत जगूया. माणसासी माणसाप्रमाणे जगणे आणि निसर्गाची होणारी लूट थांबवणे, एवढे जरी झाले तरी कोरोनाने शिकवलेला तो एक धडा आहे असे म्हणावे लागेल.
स्वस्थ रहो! मस्त रहो!! व्यस्त रहो!!!
(हा लेख मी लिहिलेला नाही.)

Sunday, July 12, 2020

"मानसिक शक्ती" जपून ठेवा.

     आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक घटनांमधून आपल्याला आपली मानसिक शक्ती निर्माण करण्यास मदत मिळत असते. परंतु बऱ्याच वेळा आपल्याकडून चुकून किंवा काही व्यक्तींच्या बाबतीत जाणीवपूर्वक मानसिक खच्चीकरण करण्याची अनेकांची सवय असते. या सवयीमुळे स्वतः च्या आणि इतरांच्या नजरेतून आपल्या विषयीचे मत मतांतर निर्माण होत असते. याचे एक सुंदर उदाहरण म्हणजे हे.
     थंडीचे दिवस होते, डिसेंबरचा शेवट आणि नवीन वर्षाची सुरुवातीचा काळ असावा. हाडे गोठवून टाकणाऱ्या एका कडाक्याच्या थंडीच्या रात्री, एक अब्जाधीश रस्त्यावर एका वृद्ध गरीब माणसाला भेटला. त्याने त्याला विचारले, "तुम्हाला बाहेर थंडी वाटत नाही का? तूम्ही तर थंडीचे स्वेटरही घातलेले नाहीये?"
     तेव्हा त्या गरीब म्हाताऱ्याने उत्तर दिले, "माझ्याकडे गरम स्वेटर नाही परंतु मला थंडीची सवय आहे." अब्जाधीश म्हणाला, "थांबा मी आता घरी जातो आणि तुमच्यासाठी एक चांगले गरम स्वेटर घेऊन येतो."
     थंडीपासून संरक्षण देणारे स्वेटर मिळणार या विचाराने तो गरीब म्हातारा खूप आनंदित झाला आणि म्हणाला की "साहेब खूप उपकार होतील." अब्जाधीश घरी गेल्यावर काही तरी कामात स्वेटर चे विसरून गेला.
     सकाळी त्याला त्या गरीब म्हातार्‍याची आठवण झाल्यावर तो स्वेटर घेऊन तो म्हातारा रात्री ज्या जागी भेटला तिथे गेला. परंतु म्हातारा जीवघेण्या थंडीने कडकडून मरण पावला होता.
   अब्जाधीश माणसाला त्याच्या प्रेताजवळ एक चिट्ठी दिसली. त्याने ती चिठ्ठी वाचली. त्यात लिहिले होते, “साहेब जेव्हा माझ्याजवळ गरम कपडे, स्वेटर नव्हते तेव्हा माझ्याकडे थंडीविरुद्ध लढण्याचे मानसिक शक्ती होती. परंतु जेव्हा तुम्ही मला गरम स्वेटर देण्याचे आश्वासन दिले तेव्हा आता थंडी पासुन संरक्षणासाठी एक छान गरम स्वेटर मिळणार या आशेने माझी थंडी विरुद्ध लढण्याची मानसिक शक्ती संपली."
     जर आपण एखाद्याला दिलेला शब्द, आश्वासन, वचन पाळू शकत नसू तर ते देऊ नका. दिलेला शब्द आपल्यासाठी जरी महत्वाचा नसला तरी तो दुसर्‍या एखाद्या गरीब, लाचार व्यक्तीसाठी बरंच काही असू शकतो. कोणाच्याही भावनांशी, अपेक्षांशी खेळू नका. एखाद्याच्या अपेक्षा पूर्ण करता आल्या नाहीत तरी ठीक आहे, परंतु समोरच्या व्यक्तीला अपेक्षेवर ठेवू नका.
- मंगेश विठ्ठल कोळी.
मो.- 9028713820

Friday, July 10, 2020

माणसं का कामवावीत....

माणसं कमावण्याची जबरदस्त नशा असते वयाच्या एका टप्प्यापर्यंत. आपल्यापैकी अनेकांना ती असते. माणसं जोडणं ही छानच गोष्टय, अनेकांसाठी ती एक अभिमानाची बाब असते. जरूर असावी. चांगला स्वभाव आणि उत्तम चारित्र्य याच्या जोरावर अनेक माणसं जोडावीत, जपावीत. (चांगला स्वभाव म्हणजे बुळेपणा नव्हे. स्वतःचा 'होयबा' करणे तर अजिबात नव्हे.) पण हे करताना ही जपलेली माणसं आपल्यालाही 'जपत' आहेत ना हे बघणं फार महत्त्वाचं असतं. अनेकदा आपल्याला वाटून जातं, अरे बापरे...! ही अमुक इतकी 'भारी' व्यक्ती आपल्यासोबत संपर्क ठेवून आहे. म्हणजे किती छान! त्या संपर्कामागे विशुद्ध भाव आहे ना, की पुढे जाऊन आपला 'स्टेपणी' म्हणून उपयोग केला जाणार आहे हे बघायला हवं. अशा अनेक अनुभवांतून आपण जात असतो, त्यामुळे 'हुरळून' जाणं टाळायला हवं.
    तुम्हाला माणसं जोडावीशी वाटतात हा तुमचा चांगुलपणा असतो, पण त्याला तुमचा भावनिक कमकुवतपणा समजणारे खूप लोक असतात. त्यामुळे आपल्या चांगुलपणाचं इतकंही प्रदर्शन करू नये की तो संशयास्पद वाटू लागेल. 
  अनेकदा एखादी व्यक्ती आपल्याला अत्यंत जवळची, जिवलग वाटत असते, आपली सुख दुःखं आपण तिला सांगत असतो. पण आपल्या वेदनांचा वापर पुढे ती आपलं मन:स्वास्थ्य उद्ध्वस्त करणारा दारुगोळा म्हणून देखील करू शकते. माणसांना इतकंही पोटाशी धरू नये की ते पुढे आपल्यावर लाडाने दुगाण्या झाडू लागतील. माणसं जोडताना कोणाला कोणत्या पायरीपर्यंत जवळ येऊ द्यावं हे ठरवून घ्यायला हवं. लायकी नसलेल्या एखाद्या व्यक्तीला फार जवळ केल्याचा अतोनात त्रास आयुष्यभर भोगावा लागू शकतो.
     लोक तुम्हाला खांदा द्यायला नसतात बसलेले, अनेकदा तुम्ही रडण्यासाठी त्यांचा खांदा जवळ करता, हे त्यांना एंटरटेनिंग वाटू शकतं. दुःखावर बांधावीत अशी माणसं फार विरळा असतात. मन मोठं करून समोरच्याला मदत करणं, त्याचं चांगलं व्हावं यासाठी प्रयत्न करणारी भली माणसं जगात आहेत, नक्कीच आहेत. पण भसाभस माणसं जमवण्याच्या नादात दाण्यांपेक्षा बणग्याच जास्त गोळा होतात. त्यातली एखादी आयुष्यभर कुसळासारखी टोचत राहते, असह्य वेदना देते.
    'भारावून जाणं' ही एक फारच भाबडी गोष्ट आहे. कोणाच्या एवढ्या तेवढ्या गोष्टीने भारावून जाणारी माणसं आपल्यात असतात. फार जवळ जाऊन बघितलं की समोरच्या माणसाचे पायही मातीचे हवेत हे लक्षात येतं आणि अतोनात निराशा वाट्याला येते. माणसांतलं चांगलं ते जरूर वेचावं, त्याचं कौतुक करावं, जमल्यास आचरणातही आणावं. पण आंबा आवडला म्हणजे लगेच झाड उपटून घरात आणण्याचा वेडेपणा आपण करू नये. आंबा खाण्याचा आनंद घ्यावा आणि आपलं 'आपलेपण' आपण टिकवून ठेवावं. आपणच आंब्याचं झाड होण्याचा प्रयत्न करू नये.
    काही माणसं समोरून फार छान वाटतात, आदर्श वाटतात. आपण त्यांना आपलं मनात राहतो, फॉलो करत राहतो. आणि एका विवक्षित क्षणी कळतं, की काहीही घेणं देणं नसताना ही माणसं आपल्यासोबत किती खोटं, कृतक वागत होती, मागे डावपेच करत होती.  मग जीव उबतो, त्या नात्याची शिसारी येऊ लागते. यावर पर्याय काय? 'माणसांच्या फार जवळ न जाणे'. लांबून जे दिसतं त्यात आनंद मानावा. माणसं आपल्या समोर जे वागतात, बोलतात ते आणि तेवढंच खरं मानून पुढे निघावं, फार खोलात जाऊन गोष्टी जाणून घेण्याचा हट्ट करू नये. अपेक्षाभंग वाट्याला येतो.
    माणसं कमावणं म्हणजे त्यांना आपल्या आयुष्यात हस्तक्षेप करण्याचे अधिकार देणं नव्हे. काही व्यक्ती आपलेपणाच्या हक्काने काही गोष्टी सांगत असतात. त्या नम्रपणे ऐकून घेण्याची क्षमता ठेवावी. चार कटू गोष्टी ऐकाव्या लागल्या तरी त्यातून पुढे आपला भलंच होणार आहे हे आपण जाणून असावं. अर्थात आपलं खरोखरच भलं व्हावं म्हणून स्वतःचा वेळ देऊन आपला कान पकडणारं कोण आणि आपलं भलं पाहून पोटदुखी होणारे कोण यातला फरक आपल्याला ओळखता यायला हवा. 
       माणसं जरूर जोडावीत, जपावीत, एकमेकांच्या मदतीनं आयुष्यात पुढे जावं, जीवन प्रवासाचा आनंद घ्यावा. पण उठून सुटून आपल्याला दुखावू शकेल इतके अधिकार कोणाला देऊ नयेत. जगायला माणसं लागतातच, पण 'आतल्या' वर्तुळात कोणती माणसे घ्यायची आणि 'बाहेरच्या' वर्तुळात कोणती माणसं ठेवायची याचं गणित एकदा जमायला लागलं की सोपं होतं जगणं. 
(हा लेख माझा नाही, सुंदर विचार आहेत म्हणून वाचनासाठी देत आहे.)

Friday, June 26, 2020

निंदा करतात हा शुभसंकेत...

तुम्ही गुरु नावाचा चित्रपट पाहिला आहे का? धीरूभाई अंबानींच्या जीवानावरील चित्रपट प्रत्येक उद्योजकाने पाहावा व त्यातील काही डायलॉग बारकाईने समजून घ्यावेत. *“जब लोग तुम्हारे खिलाफ बोलने लगे,* *समझ लो तरक्की कर रहे हो,”* *“अगर पैसा बन सकता है, तो मैने बनाया है,”* *“किस बात से नाराज हो आप लोग,* *मेरी तरक्कीसे या मेरी तरक्की के तेजी से?”* *“मै बापू नहीं हूँ, मै बस अपना धंदा करना जानता हूँ,”* *“मुझे गोल्फ खेलना नही आता, घोडे की रेस भी नहीं खेलता हूँ,* *मैं अपने धंदे का मजबूत खिलाडी हूँ”* हे सर्व डायलॉग धीरूभाईंच्या जीवनचरित्र व विचारसरणीवर आधारित आहेत.
ज्याला आयुष्यात यशस्वी उद्योजक व्हायचे आहे व पैसा कमवायचा आहे, त्यांनी त्या तत्त्वज्ञानाचा (फिलॉसॉफी) अभ्यास करून समजून घेतले पाहिजे. एखाद्या, समाजात, राज्यात, भाऊबंधकीत, नातेवाईकात एखादा जण यश संपादन करतो, पैसा कमवतो, नाव कमवतो, गाड्या घेतो, बंगले बांधतो तेव्हा अशा व्यक्तीबद्दल त्याचे जवळचेच लोक जे आज मागे पडलेले असतात ते वाईट बोलायला सुरू करतात. त्याच्या वैयक्तिक किंवा व्यवसायिक गोष्टी शोधून काढून त्याबद्दल चहाड्या, चुगली, गॉसिप करतात. हे होत त्यांच्या वैफल्यातून, कारण आपल्यातीलच एकजण इतका पुढे निघून गेला व आपण मागे पडलो हे त्यांना सतत बोचत असते.

स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी यशस्वी माणसावर टीका करणे हा सोपा व फुकटचा मार्ग हे लोक स्वीकारतात. जेव्हा तुमच्याबद्दल असे लोक वाईट बोलायला लागतात. तेव्हा तुम्ही आनंद साजरा करा, कारण तुम्ही जीवनात जबरदस्त यशस्वी होत आहात याचा तो शुभसंकेत आहे. जर तुम्ही इतरांबद्दल त्यांच्या पाठीमागे वाईट बोलत असाल, तर तत्काळ स्वत:चे विचार तपासा, कारण हा गुण स्वतःच्या प्रगतीला इतका बाधक आहे, की विचार करण्याच्या दृष्टीने तुम्ही आंधळे झालेले असता. जेव्हा तुम्ही यशस्वी व्यक्तीकडे संपूर्ण सकारात्मक दृष्टीने बघाल, तेव्हाच त्याचे गुण तुम्ही आत्मसात करण्याचा प्रयत्न कराल. जो वेगाने प्रगती करतो तो समाजातील पारंपरिक बाबींना छेद देतो. रूढी, परंपरा बासनात टाकल्यामुळे लोक त्याच्यावर टीका करतात. तुम्ही काही नवीन कराल तेव्हा लोक तुम्हाला वेड्यात काढतील; पण हे लक्षात ठेवा वेडेच इतिहास घडवतात शहाणे तर वाचतात.

*‘लोग तो कहेंगे लोंगो का काम है कहना’* एखाद्या क्षेत्रात जर पैसा असेल, तर तो तुम्ही कमवलाच पाहिजे. जणू काही तो तुम्ही तुमचा हक्कच समजायला हवा. चांगले चाललेल्याच्या घरात लोक काड्या टाकतात. समाजाचा जास्त विचार करत बसला तर आयुष्य बाराच्या भावात गेलेच म्हणून समजा.
(वरील लेख मी लिहिलेला नाही, प्रेरणादायी आहे म्हणून आपणास पाठवत आहे.)

Sunday, June 7, 2020

जे मनात, तेच तोंडात....

आपल्या मराठीमध्ये अनेक चांगल्या म्हणी उपलब्ध आहेत. बऱ्याच म्हणी आपल्याला नक्की काय म्हणायचं आहे हे कमीतकमी शब्दामध्ये सांगण्याचे काम करतात. जसे की, "ढवळ्या शेजारी बांधला पोहळा वाण नाही पण गुण लागला." "जे मन चिंती ते वैरी पण न चिंती." अशा प्रकारच्या म्हणी उच्चारताच आपल्याला नक्की काय म्हणायचे आहे ते समोरच्या व्यक्तीच्या लक्षात येते.
आपल्या आजूबाजूला जे वातावरण असते तसेच आपण घडत असतो. हे सर्वांनी ठाऊक आहे. आपण ज्या व्यक्तींच्या सानिध्यात राहतो किंवा बराच वेळ ज्या ठिकाणी काम करतो, त्याचा परिणाम आपल्या वागण्यातून, बोलण्यातून दिसून येतो. ज्या व्यक्तींच्या सानिध्यात आपण वावरतो त्यांचे बोलणे, चालणे, वागणे, त्यांचा मानसिक, वैचारिक परिणाम आपल्यावर देखील होतो. एखादी मुलगी सतत मुलांच्यामध्ये वावरत असेल तर मुलांच्या तोंडातून निघणारे शब्द त्या मुलीच्या तोंडातून आपसूकच बाहेर पडतात. (मग त्या शिव्या असोत, दादागिरी असो, उलट, उद्धट बोलणे असो वा इतर.) काही ठिकाणी मुलांच्या बाबतीत ही मुलींच्या वातावरणात राहिल्यास त्यांच्या तोंडातून येणारे अनेक शब्द मुलांच्या तोंडातून बाहेर पडतात. (मंजुळ आवाज, हावभाव, इतर.)
मानसशास्त्र सांगते की, आपल्या संगत आणि सोबत कोणाची आहे, यावर आपली वैचारिक शक्ती निर्माण होते. आपल्याकडे पाहण्याचा इतरांचा दृष्टिकोन निर्माण होत असतो. ते कसे हे आपण पुढील उदाहरणातून पाहूया.
एक बांगड्या विकणारे काका होते. गावोगावी फिरून बांगड्या विकायचे. त्यांच्याकडं एक मोठी बांबूची टोपली होती. टोपली डोक्यावर घेऊन इकडून तिकडे जायचे. त्यामध्ये ते बांगड्या अशा पद्धतीने रचायचे की वरचे कापड काढल्यावर सर्व प्रकारच्या बांगड्या ग्राहकांना दिसायच्या. हळूहळू बांगड्यांची विविधता वाढू लागली आणि टोपलीचा आकार वाढू लागला. आता सगळी विविधता त्या टोपलीत मावेना म्हणून त्यांनी एक गाढवी विकत घेतली. तिच्या पाठीवर ठेवता येईल अशी रचना बनवली. बांगडीवाले काका आणि राणी नाव ठेवलेली त्यांची गाढवी गावोगावी फिरताना दिसू लागले. यामध्ये असलेला सर्वात गमतीचा भाग म्हणजे काकांचे राणीशी चाललेले संभाषण. 
पुढे दगड दिसला तर ते म्हणायचे," राणी बेटी, पुढे दगड आहे, थोडे बाजूने चाल."
कधी ती खूपच हळू चालू लागली तर म्हणायचे," अग राणी, थोडे लवकर पाय उचल, गावोगावी माझ्या मुली माझी वाट पाहत आहेत."
राणी कधी वेगाने जाऊ लागली, जे फारच क्वचित व्हायचे तर म्हणायचे," काय बेटी, आज काय हरीण झालीस का? जरा जपून पाय टाक. बांगड्या फुटतील ना!" ते इतक्या प्रेमाने गाढवीशी बोलतात ते काय गाढवीला कळत असेल का याचे आश्चर्य सर्वांना वाटायचे.
एक दिवस एका आजीने त्यांना असे बोलत चालताना पाहिले आणि विचारले, "बाकीचे जे लोक गाढव पाळतात, ते हातात काठी ठेवतात, अधूनमधून गाढवाला मारतात, शिव्या देतात, ओरडतात हे आम्ही पाहिले आहे. पण गाढवीला राणी बेटी म्हणणारे, इतके गोड बोलणारे तुम्ही पहिलेच दिसता. असे कसे काय?"
"आजी, तुम्हाला सांगू का? माझा व्यवसाय आहे बांगड्या विकण्याचा आणि भरण्याचा. माझा संबंध येतो मुली आणि बायकांशी. मी जर राणीला गाढवी म्हणायला लागलो, शिव्या द्यायला लागलो तर माझ्या तोंडात तेच शब्द बसतील. एकदा कुठलाही शब्द आपल्या तोंडात बसला तर अनवधानाने तो कधी बाहेर येईल हे सांगता येत नाही. मग बांगड्या विकताना चुकून असे शब्द माझ्या तोंडातून बाहेर पडतील. मी चुकून असा शब्द गावातल्या मुलींशी, सूनांशी, बायकांशी बोललो तर गावकरी माझे काय करतील? म्हणून मी माझ्या तोंडातून कधीच चुकीचा शब्द येवू देत नाही. माझ्या तोंडाला, मनाला अशा शब्दांची सवयच लागू देत नाही."
ही गोष्ट फक्त धंद्यासाठीच नाही तर आपल्या सर्वांसाठीच अत्यंत उपयुक्त, आवश्यक आहे. आपण कोणतेही शब्द उच्चारत असताना ते शब्द आपल्या फक्त तोंडात असतात असे नाही तर ते आपल्या मनात, विचारात खोलवर कायमचे कोरलेले असतात. आणि कोणत्या तरी अशाच वेळ अनावधानाने ते बाहेर पडतात आणि आपली ओळख कायमची तशीच होते. त्यामुळे आपल्या आजूबाजूला कोण आहेत, त्यांचा वैचारिक आणि मानसिक दृष्टिकोन काय आहे हे नक्की पहा. काही व्यक्ती चुकीच्या वाटत असतील तर त्यांच्यापासून थोडंस दूर राहा. म्हणजे आपला दृष्टिकोन आपोआपच बदलले.
- मंगेश विठ्ठल कोळी.
- मो. 9028713820
- ईमेल mangeshvkoli@gmail.com

Wednesday, June 3, 2020

शिवाजी : नुसतच जय जय..

गेली साडे तीनशे वर्षे शिवाजी महाराजांच्या बाबत अनेक इतिहास संशोधक, जाणकार व्यक्ती, शिवाजी महाराजांच्या बद्दल अभ्यास करण्याऱ्या व्यक्ती यांच्याकडून वेगवेगळ्या गोष्टी ऐकत आलो आहे. त्याचप्रमाणे स्वत:ला पटेल, रुचेल, आवडेल अशा प्रकारे शिवाजी महाराज समजून घेतले जातात. परंतु शिवाजी महाराजांचा खरा इतिहास नक्की काय? त्यावर विविध अभ्यासकांचे एकमत आहे असे कुठेही वाचनास मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या बद्दल ठामपणे सांगणे आताच्या काळात शक्य नाही.
याचे एक चांगले उदाहरण द्यायचे झाले तर काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रचे दैवत मानणाऱ्या, अनेकांचे प्रेरणास्थान असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली. आपण ती आनंदाने उत्साहाने साजरी केली. परंतु दुर्दैव हे आहे की, एकाच माणसाची जयंती आज तीन-तीन वेळा साजरी केली जात आहे. (तिथीप्रमाणे, परंपरेप्रमाणे, तारखेप्रमाणे) महाराजांच्या जयंतीला मोठ्या प्रमाणात मिरवणुका काढल्या गेल्या. सगळ्यात मोठी लाजिरवाणी गोष्ट म्हणजे काही ठिकाणी जयंतीच्या मिरवणुकीमध्ये स्वत: शिवाजी महाराजांचे वारस समजणाऱ्या व्यक्ती बिनधास्तपणे वाटेल तशा गाण्यावर, संगीतावर, वाटेल तशा पद्धतीने नृत्य करताना दिसल्या. शरीरावर शिवाजी महाराजांचा पेहराव केलेला पहिला. परंतु आचरणात मात्र खूप मोठ्या प्रमाणावर विरोधाभासही जाणवला. हा एक प्रकारचा शिवाजी महाराजांचा अपमानच म्हणावा लागेल.
असो. आज पुन्हा तिच गोष्ट आपणाला दिसत आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन साजरा केला जाणार आहे. वरील गोष्टीं पुन्हा होऊ नयेत. एवढीच माफक अपेक्षा आहे. 
'हिंदू धर्मरक्षक' म्हणून शिवाजी महाराजांना बिरुदावली लावणाऱ्या आजच्या तमाम मतलबी धर्मांधांनी ही गोष्ट विसरू नये की, याच हिंदू धर्माने व याच धर्माच्या रक्षकांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायला विरोध केला होता व ४४व्या वर्षी मुंज आणि एकदा झालेला विवाह पुन्हा दुसऱ्यांदा करणे असल्या हास्यास्पद गोष्टी करविल्या होत्या.
अर्थात हिंदू धर्म मानणाऱ्या शिवाजी महाराजांनासुद्धा या काळाच्या आणि धर्माच्या मर्यादा होत्या. प्रत्येक थोर पुरुषाला काळाच्या मर्यादा असतात, परिस्थितीच्या मर्यादा असतात. तशा त्या शिवाजी महाराजांनासुद्धा होत्या.
शिवाजी महाराजांच्या समकालीनांपेक्षा किती लांब पल्ल्याचा विचार करी हे महत्त्वाचे. त्या परिस्थितीतही त्यांनी किती दूरदृष्टीचा विचार केला आणि त्या परिस्थितीतही त्यांनी किती प्रगतिशील पावले उचलली, राजा असूनही रयतेची कशी कदर केली हे महत्त्वाचे.
शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक रायगडावर शके १५९६ ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीस म्हणजे ६ जून १६७४ रोजी झाला हे बहुतेक सर्वांना ठाऊक आहे. परंतु शिवाजी महाराजांचा आणखी एक दसरा राज्याभिषेक झाला होता. तो पहिल्या राज्याभिषेकानंतर लगेच साधारणत: तीन महिन्यांनी ललिता पंचमीच्या दिवशी म्हणजे अश्विन शुद्ध पंचमीस झाला होता.
निश्चलपुरी गोसावी या नावाचा कुणी यजुर्वेदी तांत्रिक गोसावी होता. पहिल्या राज्याभिषेकानंतर तो शिवाजी महाराजांना भेटला. दरम्यान पहिल्या राज्याभिषेकानंतर १३ दिवसांनी शिवाजी महाराजांची थोर आई जिजाबाई यांचे निधन झाले होते. शिवाजी महाराजांचा सेनापती प्रतापराव गुर्जर वारला होता. शिवाजी महाराजांची एक पत्नी काशिबाई मृत्यू पावल्या होत्या. ह्या सर्व गोष्टी पहिला राज्याभिषेक करताना गागाभट्टाने चुका केल्या म्हणून घडल्या असे या निश्चिलपुरीचे म्हणणे होते. त्याने मुहूर्त बरोबर काढला नव्हता, उपदेवतांना संतुष्ट केले नव्हते, त्यांना बळीचे दान दिले नव्हते. त्यामुळे ह्या आपत्ती ओढवल्या असे त्यांचे म्हणणे होते.
शिवाजी महाराज व त्यांचे सल्लागार हे धर्मश्रद्ध व पापभिरू होते. त्या सर्वांना त्या काळातील जाणिवांच्या व ज्ञानाच्या मर्यादा होत्या. त्यांनी निश्चिलपुरीचे म्हणणे मान्य केले आणि मग पुन्हा दुसरा राज्याभिषेक झाला. पुन्हा उरल्यासुरल्या देवदेवतांना यज्ञ करून व दाने देऊन संतुष्ट केले गेले. ब्राह्मणांना पुन्हा दक्षिणा देण्यात आल्या.३९ एकाच व्यक्तीचे दोन राज्याभिषेक झाल्याचे कुठेच ऐकिवात नाही.
अर्थात दोन दोन राज्याभिषेक करून आणि दोन दोन वेळा देवदेवता व ब्राह्मण पुरोहितांना संतुष्ट करूनही उपयोग झालेला दिसत नाही. राज्याभिषेकानंतर स्वत: शिवाजी महाराजांना जेमतेम सहा वर्षेच आयुष्य मिळाले व तसे ते अकालीच मृत्यू पावले. काळाच्या व तत्कालीन जाणिवांच्या मर्यादा लक्षात घेऊनच या दोन राज्याभिषेकांकडे पाहायचे ऐवढेच तात्पर्य.
शिवाजी महाराज यांची दूरदृष्टी प्रत्येकाने पाहायला हवी, आत्मसात करायला हवी. शिवाजी महाराजांना लहानपणी ज्यांनी ज्यांनी घडविले. त्या सर्वांच्या कष्टाचे फळ म्हणजेच ते शिवाजी पासून छत्रपती शिवाजी महाराज झाले. त्यांच्या अंगी असणारे विविध गुणकौशल्य आजच्या पिढीने आत्मसात केले पाहिजे. कोणतेही कार्य करत असताना त्याचे विविध पर्याय शोधले पाहिजेत. एक पर्याय चुकीचा ठरला तर दुसरा आणि दुसराही चुकीचा ठरला तर तिसरा पर्याय आपल्याकडे उपलब्ध असावा. फक्त शिवाजी महाराज की, म्हटल्यावर “नुसतंच जय जय म्हणून काहीही उपयोग होत नाही, होणार नाही. हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे.
(या लेखात ठळक केलेल्या ओळी गोविंद पानसरेलिखित शिवाजी कोण होता?” या पुस्तकातील आहेत.)
- मंगेश विठ्ठल कोळी.
- मो. ९०२८७१३८२०
- ईमेल mangeshvkoli@gmail.com
(Mangesh Koli) माझे असे प्रेरणादायी विचार मिळविण्यासाठी व्हॉटसअप, फेसबुक, ट्विटर, ब्लॉग, टेलिग्राम, इन्स्टाग्राम चॅनेलवर फॉलो करू शकता.

Monday, June 1, 2020

रिकामा वेळ, नवीन संधी...

महाभारतात एक सुंदर कथा येते ती अशी की, जेव्हा पांडवाना बारा वर्षाचा वनवास होतो. पांडव आणि द्रौपदी अव्दैतवनात राहू लागतात. त्यांची विचारपूस करायला भगवान श्री कृष्ण वनात जातात.
त्यांची विचारपूस करत असताना भगवान भीमाला विचारतात तुम्हाला वनवास झाला आहे आता तु काय करणार भीमा. त्यावर भीम म्हणतो आता आमच्याकडे वेळच वेळ आहे मी खाणार आणि झोपणार, हे ऐकून भगवान कपाळावर हात मारतात आणि पुढे जातात.
भगवान झोपडीत जातात तिथे बसलेल्या द्रौपदीची विचारपूस करून तिला विचारतात ताई, नकुल सहदेव कुठे आहेत? द्रौपदी म्हणते ते पहा झाडाखाली बसलेत. भगवान त्यांच्याकडे जातात आणि त्यांना पाहतात तर हे दोघे सारीपाट खेळत असतात. भगवान त्यांना पाहून म्हणतात हौस फिटली नाही वाटत तुमची, या खेळामुळे तर ही वेळ आली आहे तुमच्या सर्वांवर ते दोघे लाजतात आणि भगवंताला प्रणाम करतात.
भगवान पुढे युधिष्ठिराकडे (धर्मराजा) जातात आणि म्हणतात काय हे धर्मा तुम्ही सर्व वेळ मिळाला म्हणून फक्त आराम  करताय हे बरोबर नाही.
त्यावर अर्जुन म्हणतो, "हे कृष्णा, काय करणार आम्हाला आता वेळच वेळ आहे."
हे या सर्वांचे विचार ऐकून भगवान विचारात पडतात आणि निर्णय घेतात व सर्वांना एकत्र करून  म्हणतात चला आपल्याला इंद्राकडे जायचं आहे.
तोच अर्जुन म्हणतो, "कशाला!"
भगवान म्हणतात तुला मृदंग शिकायचा आहे, धर्माला सल्ला कसा द्यायचा हे शिकायचं आहे, भीमाला स्वयंपाक, सहदेवाला घोडे राखायला, नकुलाला रथ चालवायला आणि द्रौपदीला झाडलोट करणं शिकायचं आहे. हे ऐकताच सर्व आचर्यचकित होऊन भगवंताकडे पाहू लागले.
धर्मराजा म्हणाले - भगवान आम्ही राजे आहोत, हे शिकुन काय फायदा? तुम्ही द्रौपदीचा तरी विचार करा ती भरतवर्षाची स्मरादिनी आहे.
भगवान म्हणतात जास्त विचार करू नका, वेळ आल्यावर कळेल सर्व. आणि हे सर्व इंद्र महालात जाऊन विविध काम शिकतात.
बारा वर्षांचा वनवास संपतो. पण एक वर्षाचा अज्ञातवास राहिला होता.  (कौरवांनी बारा वर्षाचा वनवास पांडवाना दिला होताच पण त्याबरोबर असा डाव पण केला होता कि जर वनवासानंतर एक वर्षात जर तुम्ही आम्हाला दिसला तर परत तुम्हाला वनवास आणि अज्ञातवास होईल).
आता सर्वांना कळेना की आपण एक वर्ष लपायच कुठे? त्यांनी भगवंतांना विचारलं.
भगवान म्हणतात हिच ती वेळ आहे. तुम्ही रिकाम्या वेळात जी इंद्राकडे जाऊन काम शिकलात ना, आता तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि भगवंताने त्यांना विराट राजाचा पत्ता दिला.
ते सर्वजण स्वतःची ओळख लपवून विराट राजाकडे सेवकाची काम करतात. यात धर्मराजा कंक नावाचा ब्राह्मण होतो आणि राजाला सल्ला देतो, भीम बल्लव नावाचा आचारी होतो, अर्जुन बृहन्नडा नावाचा मृदंग वादक होतो, सहदेव घोडे राखणारा, नकुल रथ सारथी तर द्रौपदी विराट राजाच्या रानीची दासी होते.
या प्रमाणे खाली वेळात शिकलेल्या कामाचा त्यांना अशा प्रकारे फायदा होतो.
*तात्पर्य -*  या कथेवरून हेच कळते की रिकामा वेळ मिळाला की झोपा काढण्यात आणि Games खेळण्यात वाया घालवायचा नसतो. तर या वेळात आपल्या बुद्धीला चालना मिळेल अशी कामं करावी.
व्यायाम, योग, घरगुती कामे, कोडी सोडवणे, विद्यार्थानी पुढच्या वर्षाचा अभ्यास, मुलामुलींनी दोघांनी वेगवेगळे पदार्थ करायला शिकणे, गावात असाल तर शेतीची कामे अशी खुप काम आहेत आपल्याकडे.
सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे आपल्या बुद्धीला मनाला चालना मिळण्यासाठी धार्मिक ग्रंथांचे अवलोकन, अध्ययन करणे आवश्यक आहे. कारण आपण MBA, CA, Advocate, M.Com, ME असे उच्चशिक्षित असाल पण या शिक्षणामुळे माणूस विवेकी तर होतो.
*पण तो विवेक वापरायला अध्यात्म शिकवते*
*धार्मिक ग्रंथ वाचून कोणाला पद मिळणार नाही. पण मिळालेल्या  पदावर अहंकाररहित कसं राहायचं याची चालना मिळेल*
*कोणाला धन मिळणार नाही. पण जवळ १० रूपये जरी असतील तरी त्यात समाधानी कसं राहायचं याची चालना मिळेल*
*कोणाला प्रतिष्ठा मिळणार नाही पण दुसऱ्याच्या संपत्तीला पाहून मनात आग लागणार नाही*
भगवंताला ज्ञानी भक्त खूप आवडतो. हिच वेळ आहे मायबाप, इतके ज्ञानी व्हा कि जसे तुकोबा म्हणतात,
*तुका सहज बोले जरी वाणी,*
*वेदांत वाहे त्याच्या घरी पाणी.*
रिकाम्या वेळेचा कसा वापर कराल, तसे भविष्य घडते.

Sunday, May 31, 2020

'कृष्ण' समजून घेताना...

*कृष्ण*,
नावातील एकही अक्षर सरळ नसणारा हा देव,
प्रत्येक शब्द हा जोडाक्षर,
जितकं नांव कठीण तितका समजायला कठीण,
पण एकदा समजला की जीवनाचा अर्थ समजलाच म्हणून समजा,
जीवन म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर कृष्ण समजून घ्यावा,
दशावतारी भगवंताचा आठवा अवतार म्हणजे कृष्ण,
सातवा अवतार प्रभू राम,
*राम* ही अक्षरे सुद्धा सरळ अन त्याचं वागणं ही सरळ, मर्यादेत,
म्हणून *मर्यादा पुरुषोत्तम*,
रामाने आपल्या जीवनात कधीच कोणतीच मर्यादा ओलांडली नाही,
तरीही काही जणांनी त्याच्यात दोष शोधले, त्याच्यावर टीका केली,
मग पुढच्या अवतारात प्रभू ने सर्व मर्यादा ओलांडल्या,
करा काय करायचं ते,
जीवनात आचरण रामसारखं असावं अन समजून कृष्ण घ्यावा,
कृष्ण आचरणात आणायच्या भानगडीत पडू नये,
कृष्ण म्हणजे *श्रीमदभगवद्गीता*,
जीवनाचं सार,
प्रभू रामाने जसा भर दुपारी मध्यानी अवतार घेतला तसा कृष्णाने पार मध्यरात्री अवतार घेतला,
जन्म झाल्याबरोबर त्याला ते ठिकाण सोडून गोकुळात जावं लागलं,
गोकुळात कृष्ण फक्त वयाच्या आठव्या वर्षापर्यंत राहिला,
म्हणजे राधा राणी फक्त तोवर कृष्णासोबत होती, कृष्ण 8 वर्षाचा होऊ पर्यंत,
जे राधा आणि कृष्णविषयी चुकीची चर्चा करतात त्यांनी या गोष्टीचा जरूर विचार करावा 8 वर्षाच्या बालकाचे कसल्या पद्धतीचे प्रेम संबंध असतील राधिकेशी,
ईतका कमी सहवास लाभून सुद्धा राधेचं नांव कृष्णाशी कायमचं जोडलं गेलं,
किंबहुना तीचं प्रेम इतकं नितळ, निस्सीम, निर्मळ होतं की तिचं नांव कायमचं कृष्णाच्या आधी लागलं,
कृष्ण-राधे कोई ना केहता, केहते राधे-शाम,
जनम जनम के फेर मिटाता एक राधा का नाम,
असं हे राधा आणि कृष्णाचं प्रेम,
किंबहुना प्रेमाचं दुसरं नांव म्हणजेच राधा व कृष्ण,
कृष्णाला 16 हजार 108 बायका,
त्याचा ही इतिहास,
ज्यांना त्याने मुक्त केलं त्या म्हणू लागल्या आता आम्ही आमच्या घरी जाऊ शकणार नाही तेव्हा त्याचा स्वीकार केला,
अन नुसता स्वीकारच नाही केला त्या प्रत्येकी सोबत त्याच्या सुख दुःखात सहभागी होता,
आज काही महाभाग म्हणतात कृष्णाने इतक्या बायका केल्या तर आम्हाला काय हरकत आहे,
अरे त्याने आग लागलेली 50 गावे गिळून टाकली होती,
तू जळता एखादा कोळसा गिळून दाखव की आधी मग कृष्णाची बरोबरी कर,
मी आधीच म्हटल्याप्रमाणे कृष्ण आचरणात नाही समजण्यात खरी मजा,
त्या साठी गीता समजून घेणं महत्वाचं,
गीतेमध्ये काय नाही?
तर गीतेत सर्व आहे,
जीवनातील कोणत्याही प्रश्नाचं उत्तर यात मिळेल,
आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे जीवन शास्त्र कृष्णाने अर्जुनाला युद्धभूमीवर सांगितलं,
यावरून अर्जुनाची सुद्धा योग्यता किती मोठी आहे हे समजतं,
अर्जुन या भूतलावर असा एकमेव मानव झाला जो या नाशवंत देहासह स्वर्गात 5 वर्षे राहिला व शस्त्र चालवण्याचं शिक्षण घेतलं,
या देशासह स्वर्गात जाता येत नाही पण अर्जुन एकमेव जो 5 वर्षे तिथे राहिला,
म्हणजे अर्जुनाची योग्यता काय आहे ते समजतं,
त्या अर्जुनाच्या डोळ्यांवर आलेलं मोह,माया याचं पटल दूर करण्यासाठी कृष्णाने गीता सांगितली,
गीता समजण्यासाठी अर्जुन किती तयार आहे हे आधी कृष्णाने आधीचे 9 अध्याय पाहिलं,
त्याची तयारी करून घेतली,
मग पुढे खरा गूढार्थ सांगितला,
विश्वरूप दाखवतांना सुद्धा त्याला
आधी दिव्य दृष्टी दिली,
त्याची तयारी करून घेतली,
मग त्याला दाखवलं की सर्व काही करणारा मीच आहे,
तू फक्त निमित्तमात्र आहेस,
असा हा कृष्ण,
त्याच्या विषयी किती सांगावं अन किती नको,
तो जितका अनुभवू तितका तो जास्त भावतो, जास्त आवडतो,
त्याला जितकं समजून घेऊ तितकं कमीच,
त्याच तत्वज्ञान म्हणजे संपूर्ण जीवनाचं सार,
ते समजून घेतलं की जीवन समजलं,
जीवन सफल झालं,
मनुष्य जीवनमुक्त झाला,
अशा या कृष्णाला वंदन,
*श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी,*
*हे नाथ नारायण वासुदेव,*
*प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ,*
*मुकुंद विष्णू भगवन नमस्ते*!!!

श्री कृष्णाला *समजून* घेण्यासाठी आपणाला श्री कृष्ण परमात्मा बुद्धी प्रदान करो हीच प्रार्थना.

(वरील लेख मी लिहिलेला नाही, वाचनास उत्तम आहे म्हणून पाठवत आहे.)

Wednesday, May 27, 2020

*Withdrawal होता आलं पाहिजे.*

आजच्या या तणावाच्या काळात सुद्धा अनेकजण मुक्तपणे जगण्याचा आनंद घेत आहेत. असे जगणे पाहून अनेक संकुचित बुद्धी असणारे लोक त्यांच्या अल्प विचार सारणीने नावे ठेवण्याचे काम करतात. हे देखील पाहायला मिळते. खरं तर माणसाने कोणत्याही परिस्थितीत मनासारखे जगणे हेच तर खरे जीवन आहे.

सहज, 'मित्रांशी बोलतांना निघालेल वाक्य' परंतु नंतर जेव्हा त्यावर विचार केला कायं खोट आहे?
जीवनासाठी ज्यांना हे करता येतं ते किती आनंदी जीवन जगतात, ज्यांना करता येत नाही ते गुंत्यात अडकुन गुंता वाढवून जगणं दुःखद करून घेतात.

साधं उदाहरण घ्या ना 'मुलाच लग्न झाल्यावर सुन घरात येते 'तरी आपण हयातीत उभ्या केलेल्या संसारातुन थोडं सैल होत नाही. हिंदी सिनेमात दाखवतात ना, सासूबाई आपल्या पदराला असलेली चावी सुनेला देत ,"बेटी अब तुम्हे संभालना है" असं हसत म्हणते मेलोड्रामाटीक असलं तरी जमलं पाहिजे.
*withdrawal होता आल पाहिजे.*

लग्न झाल्यावर मुलगी सासरी येते, ती कधिही माहेरच्यांना विसरू शकत नाही. नेहमीच तिचं मन आठवणीत रमलेलं असतं. पण त्यासोबतच माहेरची अस्मिता आणि सासरची जबाबदारी पेलवावी लागते.
कमी जास्त होणारच म्हणून प्रत्येक गोष्ट माहेरी सांगून संतूलन बिघडवायचं नसतं, तर माहेरी जे मिळालं ते इथे मिळेलच असे नाही, म्हणून तुलना करून दुःखी व्हायच नसतं.
 *तर थोडं-थोडं withdrawal व्हायचं असतं.*  

नोकरीत असणारे आपल्या कर्तव्यालाच प्रमाण मानून अतिमहत्वकांक्षेपोटी छोट्या- छोट्या आनंदाला मुकतात.   
सेवानिवृत्ती तर अटळ आहे, पण मन मात्र निवृत्ती स्वीकारत नाही.       

अधिकार गाजविण्याची वृत्ती निवृत्तीनंतरही कायम राहते इथेच माणूस फसतो. *Accept, Adjust आणि Avoid* जमतंच नाही, मन:स्थिती बिघडून शरीर आजाराच माहेरघर बनायला सुरवात होते, त्यासाठी *withdrawal होता आल पाहिजे.*

बऱ्याचदा आपल्याला खूप संधी मिळतात आपण स्वतःचा असा ग्रह करुन घेतो की माझ्याशिवाय दुसरं हे करू शकत नाही.

अशीपण वेळ येते जेव्हा ती संधी दुसऱ्याला मिळते व आपण जळफडाट करतो. पण आपण आपलं योगदान विसरून जातो, आपण केलेली कामगिरी विसरून स्वतःला केवळ त्रास करून घेतो, आज आपण आहोत उद्या कोणीतरी असेल, बघुन स्वीकार करता आलं पाहिजे. *withdrawal होता आलं पाहिजे.*

कधी-कधी असेही असते आपण पात्रं असूनही बऱ्याच गोष्टी आपल्या वाट्याला येत नाही. याचा अर्थ असा नाही की, आपण त्या व्यक्तीचा द्वेष करायचा, ज्याला ते मिळाले त्याचं कौतूक करता आलं पाहिजे. *withdrawal होता आलं पाहिजे.*
त्याची रेषा लहान करायची नसते, तर आपली रेषा मोठी करायची असते.
*Withdrawal होणं म्हणजे निवृत्त होणे नव्हे, अलिप्त होणं ही नव्हे तर थोडं स्वतःला move करणं व जिवनाचा आनंद घेणं होय.*

"गुंत्यात पडून आयुष्य रंगहीन करण्यापेक्षा, गुंता सोडवून उमेदीन जगता येणं फार कठीण नाही."
एखाद्या प्रसंगी आपल्याला कितीही बोलावसं वाटलं, राग व्यक्त करावासा वाटला तरी शांत राहायला जमलं पाहिजे, प्रत्येक वेळी बोलणचं महत्वाच नसतं तर *Neutral पणं राहता आलं पाहिजे.*
 *त्यासाठी थोडं थोडं withdrawal होता आलं पाहिजे.*

आयुष्याचं प्रत्येक वळण खूप सुंदर आहे. त्या प्रत्येक वळणावर थोडं थांबता आलं पाहिजे, वयाचा प्रत्येक टप्पा भरभरून जगता आला पाहिजे तरच आपण आनंदी राहू.

"आपलं व्यक्तिमत्त्व घडवणं आपल्याच हातात असतं." जगावे  असं की तुम्हाला बघून इतरांना तुमच्यासारखं जगावं वाटेल. तुमचं नाव निघताच तुम्हाला भेटायची, तुम्हाला जाणून घेण्याची इच्छा होईल. तुम्हाला कुणाला सोडून जायची इच्छा होणार नाही.
आणि हो गेला तरी दुःख करत बसायचं नाही, काही नात्यांचं आयुष्यही तेवढचं असतं. जे आपल्या जवळ आहे त्यात आनंद माना, जे सोडून गेलं ते आपलं नव्हतं म्हणून त्यावर जास्त विचार करू नका.

*पण त्यासाठी थोडं थोडं withdrawal होता आलं पाहिजे*

घरी रहा, सुरक्षित रहा, स्वतः आनंदी रहा, इतरांनाही आनंदी ठेवा.

-     मंगेश विठ्ठल कोळी.
-     मो. ९०२८७१३८२०
-     ईमेल mangeshvkoli@gmail.com
(Mangesh Koli) माझे असे प्रेरणादायी विचार मिळविण्यासाठी व्हॉटसअॅप, फेसबुक, ट्विटर, ब्लॉग, टेलिग्राम, इन्स्टाग्राम चॅनेलवर फॉलो करू शकता.

Wednesday, May 20, 2020

मी थँक्यू म्हणतो अन तुम्ही....



आज जगामध्ये सर्वात जास्त वापरला जाणारा शब्द म्हणजे थँक्यू. माणूस खूप व्यस्त आणि मोठ्या प्रमाणावर सेल्फिश झाला आहे. मला काही तरी मिळालेच पाहिजे या स्वार्थी आशेनेच इतरांना मदत करतो. स्वत:ची आवड, छंद विसरून फक्त तणावाचे जीवन जगत आहे. स्वत: आत्मपरीक्षण करून पहा, दिवसभरात मदत करणाऱ्या किती व्यक्तींना थँक्यू म्हणतो. लक्षात येईल की, काही बोटावर मोजण्या व्यक्तींनाच वरच्या मनाने किंवा मनाविरुद्ध थँक्यू म्हणण्याचे प्रमाण वाढत आहे.
परक्या व्यक्तींनी मदत केली तर लगेच थँक्यू म्हटले जाते. घरात सकाळपासून संध्याकाळपर्यंत किंवा दिवसभर काम करतो त्याठिकाणी थँक्यू म्हणत नाही. थँक्यू योग्य वेळी म्हटले पाहिजे तरच त्याचा उपयोग होतो, नाहीतर न म्हणालेले बरे. असे म्हणतात की, “उशिरा मिळालेला न्याय हा अन्यायासारखा असतो.” त्याचप्रमाणे “उशिरा म्हणालेले थँक्यू सुद्धा न म्हणाल्यासारखे असते.” परिवारामध्ये थँक्यू शब्दासाठी अनेकांचे मने आसुसलेली असतात. तरीसुद्धा त्यांना आपण थँक्यू म्हणत नाही.
जीवन शांतपणे जगण्यासाठी दोनच गोष्टींची आवश्यकता असते. एक म्हणजे, ‘माफ करा त्यांना ज्यांना आपण कधी विसरू शकत नाही.’ दुसरे म्हणजे, ‘विसरून जावा त्यांना ज्यांना आपण माफ करू शकत नाही.’
येथे एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते आहे. ही गोष्ट आहे एका व्यक्तीची. जो व्यक्ती ऑफिसमध्ये काम करत असतो. काम खूप असल्याने नेहमी ताणतणावात जीवन जगत असतो. घरी आल्यावर सर्व राग घरातील व्यक्तींवर, मुलावर व बायकोवर काढत असतो, त्यांच्याशी भांडत असतो. त्यामुळे घरातील व्यक्तींना कळत नव्हते की, ह्यांना नक्की काय झाले आहे.
दिवसभर त्याला वाटत होते की, आपण ‘जिवंत असो किंवा नसो’ काही फरक पडत नाही. पै-पाहुण्यांचे फोन येत होते. त्यांच्याशी तो व्यवस्थित बोलत नव्हता. ऑफिसमध्ये सुद्धा काही वेगळी परिस्थिती नव्हती. हीच गोष्ट त्याला सारखीसारखी तणाव निर्माण करत होती. या गोष्टींचा परिमाण म्हणून त्याला असे वाटू लागते की, ‘आपण कशासाठी जगतो आहोत, हेच त्याला कळत नव्हते.’
तो व्यक्ती खूप नकारात्मक विचार करत होता, तो स्वत: ला नेहमी कोसत होता, घरातील सर्व खर्च मला बघावा लागतो, काढलेले लोनचे हप्ते मलाच भरावे लागतात, इतर सर्व कामे मलाच करावे लागतात. मग ती ऑफिसमधील असो वा घरातील असो. त्यामुळे त्याच्यामध्ये एक नकारात्मक विचारातून न्यूनगंड निर्माण झाला होता.
आजच्या जीवन पद्धतीने तो कंटाळला होता. एकदा त्याचा मुलगा त्याच्या जवळ आला आणि म्हणाला, ‘पापा होमवर्क करण्यासाठी मदत करा.’ त्यावेळी त्याने दिवसभरातील राग त्या मुलावर काढला आणि त्याला स्वत:पासून पळवून लावले.
पुढे तो मुलाला म्हणाला, ‘मी काय तुझा होमवर्क करण्यासाठी बसलो नाही, मला खूप कामे आहेत.’
मुलगा शांतपणे निघून स्वत:च्या रूममध्ये जातो. थोड्या वेळानंतर त्या व्यक्तीचा राग शांत झाला. तो मुलाच्या रूममध्ये गेला आणि मुलगा नक्की काय म्हणत आहे. हे तरी पाहूया असे त्याला वाटले. मुलाच्या रूममध्ये गेला. पाहिले तर मुलगा झोपला होता. होमवर्कची वही मुलाच्या अंगावर तशीच पडली होती. मुलाच्या डोक्यावरून हात फिरवून अंगावरची वही काढून बाजूला ठेवू लागतो.
वही बाजूला ठेवता ठेवता त्याला वाटते. मुलाने नक्की काय लिहिले आहे ते तरी पाहूया. कोणत्या गोष्टीमध्ये मुलाला माझी मदत हवी होती. त्या वहीच्या पानाच्या सुरुवातीला लिहिले होते.
“ज्या गोष्टी आपणाला सुरुवातीला चांगल्या वाटत नाहीत, परंतु नंतर त्या चांगल्या वाटतात.” त्यावर त्या मुलाला निबंध लिहायचा होता. मुलाने काही ओळी लिहिल्या होत्या. तो व्यक्ती त्या ओळी वाचू लागला.
मुलाने लिहिले होते...
मी थँक्यू म्हणतो, “त्या फायनल परीक्षेला जी सुरुवातीला चांगली वाटत नाही, खूप अभ्यास करावा लागतो परंतु त्यानंतर सुट्ट्या पडतात, खूप खेळता येते.”
मी थँक्यू म्हणतो, “त्या कडू गोळ्यांना ज्या चवीला चांगल्या लागत नाहीत, परंतु नंतर आपण आजारातून बाहेर पडतो.”
मी थँक्यू म्हणतो, “त्या अलार्मच्या घड्याळाला जे आपल्याला सकाळी सकाळी उठवते. त्यानंतर आपल्याला कळते की, आपण जिवंत आहोत.
मी थँक्यू म्हणतो, “त्या देवाला ज्यांनी मला एवढे चांगले वडील दिलेत. जे सुरुवातीला चांगले वाटत नाहीत, माझ्यावर खूप रागावतात. परंतु नंतर मला बाहेर घेऊन जातात, फिरवतात, चॉकलेट आईसक्रिम, वेगेवेगळ्या खेळणी घेऊन देतात.”
पुढे जाऊन त्या मुलाने एक ओळ लिहिली होती.
मी थँक्यू म्हणतो, “त्या देवाला त्यांनी मला वडील दिले. कारण माझ्या एका मित्राला वडीलच नाहीत.”
वरील शेवटच्या ओळीने त्या व्यक्तीला हलवून सोडले. संपूर्ण शरीराला, मनाला सकारात्मक ऊर्जा निर्माण मिळाली. सर्व नकारात्मक विचार एकाच झटक्यात बाजूला गेल्याची भावना निर्माण झाली. तो व्यक्ती झोपेतून उठला, जीवनाचा खरा अर्थ समजला. तो स्वत:शीच बोलायला लागला. त्या मुलाने लिहिलेल्या गोष्टी बडबडू लागला.
हे देवा मी थँक्यू म्हणतो, “माझ्या जवळ घर आहे, काहींच्या जवळ घर सुद्धा नाही.”
हे देवा मी थँक्यू म्हणतो, “माझ्या जवळ बायको, चांगला मुलगा आहे, चांगले कुटुंब आहे. काहींच्या जवळ कुटुंबसुद्धा नाही.”
हे देवा मी थँक्यू म्हणतो, “माझ्या जवळ ऑफिस आहे, काम आहे, कामाचा ताण आहे. काहींच्या जवळ काम देखील नाही.”
हे देवा मी थँक्यू म्हणतो, “माझ्या जवळ अनेक गोष्टी आहेत, काहींच्या जवळ त्या देखील नाहीत.”
हे देवा मी थँक्यू म्हणतो, “तुम्ही मला चांगले जीवन दिले आहे. पै-पाहुणे दिले, मित्र दिले. काहींच्या जवळ ते सुद्धा नसतात.”
त्या व्यक्तीला त्याच्या जीवनाचा खरा अर्थ लक्षात आला.
वरील गोष्टीवरून एक लक्षात येते की, या कोरोना आजाराने अनेक गोष्टी, अनेक दिवस आपण करत नव्हतो, त्या करण्यासाठी वेळ मिळाला आहे. आपल्यातील अनेक नकारात्मक विचार बदलून सकारात्मक विचार जोपासले पाहिजेत. ज्या गोष्टीविषयी जीवनात भीती, नकारात्मक भाव, न्यूनगंड होता तो बदलण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे. आपल्यातील अनेक व्यक्ती परिवाराला वेळ देऊ शकत नव्हते, त्यांनी तो द्यावा. आपल्यातील शारीरिकदृष्ट्या असणारा कमकुवतपणा दूर करू शकतो. तसेच मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी या मिळालेल्या संधी बदल सर्वांनी एकमेकांना थँक्यू म्हणायला पाहिजे.
याही अडचणीच्या काळामध्ये जीवनाने आपल्याला जे दिले आहे, त्यात समाधान मानले पाहिजे. जे नाही त्याच्या पाठीमागे न धावता, जे आहे त्यात आनंद मानला पाहिजे. आनंदाने जे मिळाले आहे त्याचा स्वीकार केला पाहिजे. आपले जीवन मोठे केले पाहिजे. येथे प्रसिद्ध अभिनेते राजेश खन्ना यांचे गाजलेले एक वाक्य लिहावेसे वाटते. “जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नाही...”
- श्री. मंगेश विठ्ठल कोळी.
- मो. ९०२८७१३८२०
- ईमेल – mangeshvkoli@gmail.com
-      (Mangesh Koli) माझे असे प्रेरणादायी विचार मिळविण्यासाठी व्हॉटसअॅप, फेसबुक, ट्विटर, ब्लॉग, टेलिग्राम, इन्स्टाग्राम चॅनेलवर फॉलो करू शकता.